

वय अवघे ३६. प्रकाशनाच्या व्यवसायात सहा-सात वर्षे काम. दिल्लीत बुक फेअरचे काम करून विमानाने मुंबईत दाखल. पॉईंट-टू-पॉईंट पोचविणा-या प्रवासी कंपनीमार्फत नाशिककडे जाताना नेमका निषाद देशमुखचा अपघाती मृत्यू व्हावा. याला काय म्हणावे. नियती. काळ की नशीब.
गौतमी प्रकाशनातर्फे मराठी साहित्यातील पुस्तके केली. आणि तरूणांचे भवितव्य घडवायचे. त्यांना नव्या वाटा शोधायली मदत करायची म्हणून करीयर संधी सांगण्य़ासाठी करीयर पब्लीकेशनची पुस्तके काढायला घेतली. ज्यातून तरूणांचा उद्या चांगला उजडेल. काही मराठीत तर कांही इंग्रजी भाषेतली पुस्तके तयार केली. त्यासाठी लेखकाची व्याख्याने योजली. त्याला प्रतिसादही उत्तम होता. आत्ता कुठे स्वतःची ओळख पटविली जात होती.
एक मराठी प्रकाशक तंत्राच्या सीमांची पिरसिमा ओलांडत नव्याने नवी क्षितीजे धुंडाळत होता. वेगळेपण जपत प्रकाशनाचा पाया मजबूत करीत होता. पण हेच दुदैर्व ठरले. काळाने घात केला. जीवनातले यश पचविण्याच्या आतच अपघाती मृत्यू नियतीने लिहला होता.
चेह-यावर सतत स्मीत. नवीन करण्याची सतत चर्चा. एकेका पुस्तकासाठी दीडशेवर कंपन्यातील एच आरशी नाते जोडण्याची धडपड. आपला वाचक कोण. त्याला काय हवेय. काय द्यायला पाहिजे याची अचूक नाडीपरीक्षा. म्हणूनच करियर पब्लिकेशनचा आठवड्यापूर्वीचा प्रकाशन समारंभही त्याच भव्यतेत. त्यातही लेखक आणि वक्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे पॉवर पॉईटसह व्याख्यान. पुस्तकाचा लेखक स्वतः उत्तम बोलतो म्हटल्यावर आणखी काय हवे.
हे एक उदाहरण... असे कित्येक कार्यक्रम पुस्तकांच्या निमित्ताने केले गेले. तेही लक्षात रहातात. मराठी भाषेवर प्रेम करताना मराठी साहित्यात कांही नवे यावे यासाठी वेगळेपण जपून त्यांनी यत्न केला. भारती ठाकूर यांच्या न्रमदा परिक्रमाः एक अंतर्यात्रा- ह्या पुस्तकाने बेस्टसेलरचा मान मिळविला. गौतमी प्रकाशनाची नवीन पुस्तकांची भूक वाचकांना जागृत करणारी ठरली. मराठी बरोबरच इंग्रजी पुस्तकांचे दालन त्यांनी वाचकांसाठी खुले केले. विविधता आणि संस्कृतीशी नाते हे दोन मह्त्वपूर्ण विशेष त्यांच्या पुस्तकातून सतत दिसत होते. त्यांची जाण विलक्षण होती. कामात तप्तरता आणि नेमके वाचकांपर्यत पोचण्याचा आग्रह होता. तोच त्याचा विशेषही.
असा दूरदृष्टी असलेला. बाजारपेठेचा अभ्यास करून चाणाक्षपणे प्रकाशन व्यवसायात स्वःतची छाप टाकणारा. तरूणाचे डोळे अदिक व्यापकतेकडे नेणारा ई-मेल, फेसबूक आणि सा-या नवतंत्रांचा वापर करत प्रकाशन व्यवसायात आपले प्रभूत्व निर्माण करणारा निषाद देशमुख अवकाळी हरपला.
त्याच्या निधानाने प्रकाशक संघाचा आधार निसटला. सर्वाची साथ घेत मराठी पुस्तकांच्या दुनियेत आपली प्रतिमा निर्माण करणारा व्यवसायिक काळाच्या पडद्याआड गेला. वाईट झाले.
नियतीने फास टाकला. कायमचे व्यक्तित्व नष्ट झाले. आता केवळ आठवणी. ..त्याही जपूयात.
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
Mob. 09552596276