Thursday, October 6, 2011
उद्या नवा सूर्य नवा
दिवस नवा धडा नवा
चिंता नवी प्रश्न नवे
अपेक्षा नवी विषय नवे
वाट नवी शोध नवा
गुरु नवा धारण नवे
संध्याकाळ नवी वारे नवे
जाणीव नवी उणीव नवी
कालचा नवा आजचाही नवा
शंका नवी उपाय नवा
भास नवा साधना नवी
काम नवे संदर्भ नवे
दृष्टी नवी धेय्य नवे
उद्या नवा सूर्य नवा
क्षितीज नवे रंग नवे
आनंद नवा बहर नवा
subhash inamdar
9552596276
subhashinamdar@gmail.com
Tuesday, October 4, 2011
सुचलेल्या ह्या शब्दातले अर्थ..
कधी दिसशी अधिरी...
कधी असशी पुरेशी..
नाजुकशा स्वरातून...
डोकाविशी कधीशी
------------------------
झरझर येतो..
भिजवत ठेवतो..
प्रेमातही येतो..
कधीतरी
----------------------------------
क्षण आनंदाचे विरतात
आठवणीत उरतात
फक्त स्मरत रहातात
निसटलेल्या क्षणांसारखे
-----------------------------
नाती असतात स्नेह वाढविणा-या असंख्यात रुजणारी
नाती असतात प्रेम करणा-या असंख्याच्या मनात साठणारी
नाती म्हणूनच असतात बळकट
नाती म्हणूनच केवळ नसतात रेशमाचे धागे
धाग्यातली धग असते ती दोन मनांच्या ओसंडून वाहणा-या रक्तामध्येच..
--------------------------------------
कधी दाटला ओलावा
कधी भेटला ओलावा
कधी नकोसा ओलावा
कधी हवासा ओलावा
==============================
नाही कमी होणार पत आपल्या मैत्रीची
जरी घसरली पत अमेरिकेची
--------------------------------------
येता हाती अक्षरे
मी लावतो रांग
एकापुढे एक ठेवता
होती अक्षरांची माळ
----------------------------------
कधी भेटीचा ओलावा
कधी संपता दुरावा
कधी मनीचा विसावा
तूच असशी
--------------------------
करूनी उपवास
खावे खास
मारू नका भूक
लागलेली
--------------------------
कामाचा ताण
नाही जिवनात राम
हवा आहे आराम
जीवनाला
-------------------------
दिसताना केस तुझे मुलायम भासतात
हाती येताना ते राठ का बरे असतात
----------------------------
घडणारे जर अटळ आहे...
तर
चिंतेला काय अर्थ आहे
----------------------------
नवे पाणी..नवा वारा
झाकोळलेले आभाळ.. गहिवरले डोळे
कुणी हैराण..तर काही चिंब
सारे वैगळे ..तरीही एका मातीतले
केव्हातरी.. कधीतरी..सुचलेल्या ह्या शब्दातले अर्थ..जर तुम्हाला भावले तर जरुर सांगा..
सुभाष इनामदार.पुणे
subhashinamdar@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)