डॉ. भास्करराव आव्हाड यांचे आवाहन
`ज्या लोकमान्यांनी निर्भिडपणे विचार करा
आणि वागा. जे
कळतय ते निर्भिडपणे
बोला हे टिळकांनी
शिकवलं. त्यांच्या स्मृतिदिनी सदगुणी
लोक जे आज
कोपऱ्यात बसलेत. त्यांना बाहेर
काढण्याची गरज आहे
हे ध्यानात ठेवावं.
बिघडलेला सुधारेल हे समजण्याची
गरज नाही.जो
उद्यासाठी आश्वासन देतो त्याच्यावर
विश्वास ठेवायची गरज नाही.
कालपासून जे सांगत
काय होता ते
बघा. आणि त्याच्याकडे
सामाजिक नेतृत्व द्या. राजकीय
नेतृत्वाला कमी किंंमत
द्या. कारण
नेता असा असला
पाहिजे जो समाजमन
घडवितो. आज
समाजात शांतता आहे पण
शांती नाही सापडत
. ती शांती समाजात
येण्य़ासाठी आम्ही गुणग्राहक झालो
पाहिजे. आणि त्यासाठी
आम्हाला सामाजिक
नेतृत्व भल्या माणसांच्या हाती
दिलं पाहिजे. आणि
घाबरून जी गुणी
माणसं बसलीत त्यांनी
राष्ट्रीय कर्तव्य समजून या
समाजकारणात भाग घेतला
पाहिजे, राजकारणात भाग नका
घेऊ. कारण आजच्या
राजकारणात पक्ष नाही..कारण पक्षाला
धेय्य धोरण ठरलेलं
असते. आजच्या राजकारणात
एकच ठरलेलं आहे
की कुणाच्याही गळ्यात
गळा घालू पण
दोघेही खूर्चिवर जाऊन बसू.
एवढं झालं म्हणजे
उद्दीष्ट संपलं. समाजासाठी, राष्ट्रासाठी
काय करणं हा
उद्देश नाहीच आहे. आम्ही
मालक आहोत. मग
ती दरी आम्ही
सांधणार आहोत. ती सद्बुध्दी या
निमित्ताने आम्हीला द्यावी हिच
प्रार्थना`.
`लोकमान्यानी
इंग्रज सरकारविरूध्द वैर धरले.
हिमम्त धरून ते
लढले. त्यांच्या स्मृतिदिनी
आम्हाला एवढं जरी
कळालं की, मी
भारताचा नागरिक आहे. मला
भारतिय राज्यघटनेने ह्या सगळ्या
पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, जिल्हा
परिषदचे कोण असतील
ते यांच्यापेक्षा मला
मालक म्हणून मला
अधिक अधिकार दिले
आहेत. ते अधिकार
मला वापरले पाहिजेत.
आणि हे सरकार
जनतेच्या हितासाठी चालविता आलं
पाहिजे याशिवाय चालणार नाही`.
`अग्रलेखकार
लोकमान्य टिळक` ..ह्या डॉ.
विश्वास मेहेंदळे लिखित पुस्तकाच्या
नव्या आवृत्तीच्या निमित्ताने
१ ऑगस्टला पुण्याच्या
मसापमध्ये उत्कर्ष प्रकाशनाच्या वतीने आयोजित
कार्यक्रमात ख्यातनाम विधीज्ञ डॉ.
भास्करराव आव्हाड आजच्या परिस्थितीवर
आपले परखड मत
व्यक्त केले. पुस्तकाचे प्रकाशन
सिंबायोसिस या संस्थेचे
संस्थांपक डॉ. शां.
ब. मुजुमदार यांच्या
हस्ते झाले. यावेळी
अध्यक्षपदी सावित्रिबाई फुले पुणे
विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. नितिन
करमळकर होते.
त्याकाळी सदाशिव पेठेत रहाणारे
विष्णुशास्त्री चिपळूणकर असतील. बाळ
गंगाधर टिळक असतील.
गोपाळ गणेश आगरकर
असतील. शिवराम महादेव परांजपे
असतील. भालाकार भोपटकर असतील.
या सगळ्या मंडळींची
कामे पुसून टाकण्याची
किंवा कुठल्याही प्रकारची
त्यांना काही किमंत
द्यायची नाही अशी
भुमिका समाजामध्ये काही विशिष्ठ
वर्ग घेताना दिसतो
आहे. म्हणून मला
असं वाटलं. की या
निमित्ताने पुस्तकात त्यांचा नामोल्लेख तरी
रहावा या उ्द्देशाने
आपण हे पुस्तक
प्रकाशित करण्याचा प्रयत्न केल्याचे
डॉ. विश्वास मंहेंदळे
सांगतात.
आज शिक्षण क्षेत्रात क्रांती
होण्याची वेळ आहे.
कौशल्याने शिक्षण देण्याची आज
गरज आहे.केवळ
पदवी देणारी ही
शिक्षणपध्दती बदलण्याची गरज आहे.
रोजगारभिमूख शिक्षण देण्याची पध्दती
शिक्षण क्षेत्रात येण्याची गरज डॉ.
मुजुमदार यांनी अधारिखित केली. पदवी
घेणारे विद्यार्थी जेव्हा शिपायाच्या
जागेसाठी जेव्हा अर्ज करताना
दिसतात तेव्हा वाईट वाटते.
हे शिक्षणाचे अवमुल्यन
आहे असे वाटते.
प्रत्येक पदवीधराकडे पदवी घेण्यापूर्वी
कोणते ना कोणते
कौशल्य असलेच पाहिजे असे त्यांना
वाटते.
एकमेकांच्या विद्यापिठातले चांगले
घेण्यासाठी कुणालाही कमी न
लेखता शिक्षण क्षेत्रातला
संवाद वाढण्याची गरज
आहे. त्यसाठी
एकमेकांच्या हातात हात घालून
जर काम केले
आणि विद्यापिठांना स्वायत्तता
मिळून उत्तम कौशल्याधिष्ठीत शिक्षण
पध्दती अवलंबीली तर उद्याचा
पदवीधर रोजगारासाठी भटकणार नाही
याची खात्री डॉ.
करमळकर यांनी दिली.
प्रास्ताविकात
उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा
जोशी यांनी आपले
हे तीन हजारावे
पुस्तक असल्याचे सांगून आपल्या
आजोबांनी टिळकांच्या बरोबरीने काम
केल्याचे सांगितले.
या सगळ्या कार्यक्रमाला सूत्रबद्धरित्या
सांभाळून एक सुंदर
विचारांचा कार्यक्रम यशस्वी करण्यात
समीरण वाळवेकर यांनी
उत्तम भूमिका वठविली.
- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com