Saturday, April 22, 2017

चंद्रशेखर महामुनी `कलादीप` पुरस्काराने सन्मानीत




चंद्रशेखर महामुनी या सत्तावीस वर्ष हिंदी चित्रपटातली रफी, मुकेश, किशोर, मन्नाडे यांच्या आवाजातली सदाबहार गीते सादर करून रसिकांना आपल्या देवानंद स्वरूपातल्या वेषभुषेतून सादर करणारा कलावंत..आज शनिवारी त्यांना साहित्यदिप प्रतिष्ठानचा पहिला कलादीप पुरस्कार ज्येष्ठ संगीत संगीत संयोजक आणि मेलडी मेकर्सचे संस्थापक सुरेंद्र अकोलकर यांच्या हस्ते देण्यात आला.

.या प्रसंगी जेष्ठ्य व्यंगचित्रकार आणि संगीताचे कान असलेले  मंगेश तेंडूलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार दिला गेला..तेव्हा पत्रकार संघाच्या छोट्या सभागृहात दाटीवाटीने एकत्र आलेल्या रसिकांनी टाळ्यांचा कडकडात करून महामुनी यांना आपला आगे बढो..असा शुभाशिर्वाद दिला..





आपल्यावर या पुरस्कारान अधिक जबाबदारी आली असून ती पार पडण्याचे बऴ मिळण्याची प्रार्थना रसिकांसमोर चंद्रशेखर महामुनी यांनी केली 

. तर अशा गाण्यात आपला आवाज ओळखून निष्ठेने काम करणारा हा कलावंत..असून त्याला शुभेच्छा दिल्या त्या सुरेंद्र अकोलकरांनी..आणि इतर गायकांच्या आवाजातली गाणी गाताना आपला आवाज जपत जाण्याचे आवाहन केले ते मंगेश तेंडूलकर यांनी..त्यांची गाणी आपण ऐकली आहेत..ते गातात सुंदर..मनासापून पण त्यांच्या आपला आवाज त्यांनी आता रसिकांसमोर वेगळ्या पद्धतीने साकार करावा आणि गाण्यात वेगळा टप्पा सादर करण्याची विनंती तेंडूलकरांनी केली..




गेली सात वर्षे साहित्यदिपने पंच्याऐंशी कार्यक्रम केले ते वाचकांच्या रसिकांच्या प्रतिसादाने..आज चंद्रशेखर महामुनी यांना हा पहिला पुरस्कार देताना..कवी, साहित्यिक आणि आता गाण्याच्या प्रांतात आपला ठसा उमटविणारे महामुनी यांना हा पुरस्कार देतान संस्थेला आनंद झाल्याचे आपल्या प्रास्ताविकार साहित्यदिप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे यांनी सांगितले.

प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कवी अनिल कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.. 


व्यासपिठावर धनंजय तडवळकर हेही उपस्थित होते..




चंद्रशेखर महामुनी यांची सदाबहार हिंदी गीतांची मैफील.. हम राही है प्यार के
 


पुरस्कार वितरणानंतर चंद्रशेखर महामुनी यांनी रेवा तिजारे यांच्या साथीने हिंदी चित्रपटसृष्टीतील्या


 


राजकपूर, शम्मीकपूर, राजेश खन्ना आणि देवानंद यांच्यावर चित्रित झालेल्या सदाबहार गीतांना आपल्या तेवढ्य़ाच कमावलेल्या आवाजात ध्वनीचित्रफितीच्या सहाय्याने रसिकांसमोर पेश करून ..


.ये दिल अभी अभी भरा नही ची पावती..रसिकांकडून मिळविली..महामुनी यांनी पडद्यावर ती गीणी दाखवून ..हुबेहुब तशीच गाणी आपल्या आवाजात त्या संगीताच्य़ा ध्वनीद्वारे गाऊन..सादर केली.




त्या गाण्यांची ती नक्कल नव्हती..तर तो अस्स्लपणाचा भासच होता..यातच महामुनी यांचे कसब स्पष्टपणे रेखांकित होते..




त्यांच्या या कार्यक्रमाची तेवढीच सुरेख निवेदनाची गोडी अनुभवायला मिळाली ती डॉ. अमित त्रिभूवन यांच्या शब्दामधून.





संपूच नये असा आनंद या गीतांनी दिला..प्रेक्षकांनीही तासभर हा सारा प्रेमाचा पिसारा अनुभवला..तो हम है राही प्यार के..च्या पेशकशीमधून.

तुम्हालाही निषादच्या या कार्यक्रमांना कधी जाता आले आणि चंद्रशेखर महामुनी यांची गाणी ऐकता आली..तर जरूर जा. तुमचा वेळ पुन्हा त्या गुजरा हुवा जमाना पुन्हा याद करता येईल.







-सुभाष इनामदार, पुणे
9552596276

Sunday, April 16, 2017

सुमनताई तुम्ही गात राहिले पाहिजे

लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या नंतर कुणा गायिकेने भावगीत.चित्रपटसंगीतात स्वतःचे नाव केले ते सुमन कल्याणपूर...मात्र १९९५ सापून त्यांनी आपले जाहिर गाणे बंद केले..कारण काय...काहीही असो..पण आजही त्यांच्या आवाजात ती जादू आहे..जी रसिकांना भुलविते.

पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते जेव्हा त्यांना आज पुण्यात माणिक वर्मा पुरस्कार देण्यात आला..त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधताना मंगला खाडीलकर यांनी त्यांच्याकडून काही गाण्याच्या ओळी गुणगुणून घेतल्या..त्यावरुन आजही तो आवाज तेवढाच सुंरेल असल्याचे रसिकांच्या ध्यानी आले..
त्यांच्या मुलाखतीच्या शेवटी तर सर्व रसिकांनी उभे राहून त्या व्यासपीठावरुन जाईस्तोवर उठून त्यांना मानवंदना दिली...
सुमनताई आजुनही तुम्ही गात रहा....तो सूर आम्हाला तेवढाच आनंद देणारा ठरणार आहे..