संगीताचा वारसा जपणारी परंपरा आता पुढे जाणार
याची खात्री पटविणारा एका कलावंत आजींचा डॉ. ज्योती ढमढेरे यांया कार्यक्रम अनुभवला आणि खरोखरीच
भारावलेल्या अवस्थेत बाहेर पडलो.. खरं तर मी त्यांना पुण्यातल्या भरत नाट्य
मंदिराच्या समोरच्या डॉ. ढमढेरे वाड्यात शास्त्रीय संगीत, गझल शिकणा-या आणि कायाकल्प मधून स्त्रीयांवर उपचार करणारे क्लिनिक
चालविणा-या कलावंत राहतात हे ओळखत होतो.. कट्यार
मध्ये छोटा सदाशिव असलेला जयदीपची आई..हे ही ओळखत होतो..हो आणखी एक सुमारे दोन
वर्षापूर्वी त्यांच्या मुलीने अनुपमाने `नेसली निळी पैठणी.`.ह्या आईच्या लावण्यांवर कार्यक्रम करुन त्यांच्या काही लावण्यांची झलक
दाखविली..सीडीही प्रकाशित केली..तीही
सुलोचना चव्हाण यांच्या हसते. हे ही स्मरते.
पण आज परंपरा..या रंगमंचावरील कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. ज्योती ढमढेरे यांच्यातल्या कवीला..गीतकाराला , संगीतकाराला,गुरुला आणि प्रसंगी स्वरचित बंदिशींतून जेव्हा १३ जुलैला रविवारी संध्याकाळी पडदा वर गेल्यावर ज्या रुपात त्या भेटल्या त्यातून त्यांच्याविषयी आदर वाढला..आपोआपच अरे आपल्याला हे सारे का नाही आजपर्य़त कळाले याचे वाईट वाटले..आणि आपल्यालाही असे जमेल काय..यासाठी आशीर्वाद मिळावा असी प्रतिभा त्यांच्यामध्ये आहे याची खात्री पटली...आणि म्हणूनच या नव्या रुपाची ओळख करुन घेतली.
खरं तर १२ जुलैला गुरुपौर्णिमा
होती..हा कार्यक्रम १३ जुलैला होता..म्हणजे घरच्या गुरुची ही पूजाच होती जणू...
रवींद्र खरे यांनी त्यांच्यातल्या अनेक पैलूंची ओळख पटवून दिली..खरं तर आपल्या
घरातली अशीच एकादी व्यक्ति असते..जिच्यापाशी अनेक गुण असतात..तीही गुरुच असते..पण
आपण तिचे ऋण असे जाहिरपणे फारसे मानत नसतो...घरच्या जबाबदा-या सांभाळून केलेली ही
गुणांची पूजा या निमित्ताने बांधली गेली आणि आपल्यासारख्या असंख्य मातांना..त्यांच्या
कर्तुत्वाला ती समर्पित केली गेली..
स्वतःबरोबर घरातल्यांना
मोठं करणारी ही कर्तुत्ववान महिला महिला म्हणूनही त्यांची ओळख नव्याने करुन द्यावी
लागणार आहे..आज त्यांचे वय ७० आहे..पण बालपणीचा श्रीरामपुरातला गावचा
संस्कार..पुण्यात आल्यावर झालेला नवा परिचय..यातून स्वतःची संगीताशी वेगळी ओळख
करुन..खॉंसाहेब महोम्मद हुसेन..यांचेकडे घेतलेले शास्त्रीय संगीताचे धडे..काही काळ
संजीव शेंडे नंतर असिफ खान आणि मग बाळ माटे यांचेकड़ून भजनाचे घेतलेली तालिम
सा-यांची मोट बांधून आपल्या मुलीला जी `सप्तक` नावाची संगीताची संस्था काढून त्याव्दारे
संगीताचे शिक्षण अमेरिकेत देते आहे..आपल्या मुलाला जयदिपला आणि पुढे ते सई, आनंद
आणि सायली दलाल या मुले आणि नातवांपर्यंत पोहचविले..आणि संगीताची
परंपरा...साकारली..
सहजपणे त्यांना काव्य
स्फूरते..ते मनात साठते..मग कागदावर उमटते...तसेच काहीसे..यातून गझल..रागांच्या
बंदिशी, भावगीत, भजन, भक्तिगीत, लावणी..सारेच शब्दांचेबंध त्यांच्याकडून होत
गेले..आणि मग काय हा नाजूक मोग-याचा फुलांचा निट गुंफलेला हार त्यांनी मुलांच्या
नातवांच्या मुखातून रसिकांसमोर सुगंधित केला...
अगदी मनोगतातून व्यक्त
झालेल्या त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे...दर दहा वर्षींनी माझ्या
आयुष्यातल्या रंगाची छटा बदलत गेली..त्यात नवे रंग मिसळत गेले. ह्या स-या
रंगंछटांचा एक सुंदर गोफ तयार झाला..तेव्हा प्रथम या सप्त रंगाचा मला साक्षात्कार
झाला. या रंगातील एक रंग सुरांचा, लयींचा, तालाचा, उपज आणि बंदिशींची. मला आठवत
तसं. मी सुरांच्या संगतीत आहे. ती संगत आई-वडीलांनी स्वतः पाणी घालून सशक्त केली.
शब्द उशीरा साथीला आहे..पण साहित्यकला आणि संगीत हे माझ्या प्रेमाचे..
आज हे मोग-याचे इवलेसे रोपटे मी न लावताच माझ्या दारात सजले, वाढले आणि घमघमले..या गगनावेरी गेले..माझी तिन्ही मुले आणि नातवंडं गानप्रमी आहेत...केवळ प्रेमीच नव्हे तर गानवेडी आहेत..हे तुम्हाला समजेलच..
आज हे मोग-याचे इवलेसे रोपटे मी न लावताच माझ्या दारात सजले, वाढले आणि घमघमले..या गगनावेरी गेले..माझी तिन्ही मुले आणि नातवंडं गानप्रमी आहेत...केवळ प्रेमीच नव्हे तर गानवेडी आहेत..हे तुम्हाला समजेलच..
जसजसा कार्यक्रम फुलत
गेला..
तसतसा कन्या..तीची मुलगी यांनी सादर केलेली रागदारी..नातीचा..सुरेल
स्वराविष्कार...जयदिपचा लागलेला आवाज..त्याचे हळुवार सादरीकरण...मुलीची ठसकेबाज लावणी...सईने
सादर केलेले गीत..आणि नातू आनंदने गीटारीच्या संगतीत म्हटलेले भावगीत...सारेच मग
अनमोल संगीत पचविलेल्या आजीच्या बटव्यातून बाहेर येत येत..उपस्थित रसिकांच्या
टाळ्यांनी पसंतीस उतरत होते...
खरं तर..त्यांनी एक गीतात
सांगितल्या प्रमाणे..
कठीण कठीण मार्ग तरी रमत
गमत चालले
मिटुनि सुख नेत्र मी हसत
हसत चालले...
अशी अवस्था होत गेली..
पती डॉ. दिनकर ढमढेरे यांची
८०व्या वर्षींची साथ..सून उज्वला हिची घरातली मदत..अनुपमाने संगीताची सेवा करण्यासाठी
निवडलेली स्वरमयी वाट...आणि जयदिपच्या सोज्वळ,निर्मळ स्वरातून फुलविलेला हा
संगीताचा पिसारा...इथे फुलत..नव्हे डुलत होता..
घरातल्या सा-यांचे हे कौटुंबिक नाते...संगीताच्या बंधनात एका धाग्यात गुंतलेले पाहताना..मन भरून येते..आणि तृप्त पावते..
तिनपिढ्यांची ही संगीत परंपरा राजेंद्र साळुंके, नरेंद्र चिपळूणकरआणि राजू जावळकर यांच्या साथिने उपस्थितापर्यंत पोहोचली आणि आवडीलीही
हा नेहमीचा पारंपारिक कार्यक्रम नाही...पण परंपरेची किंमत सांगणारा आणि इतरांना परंपरेचे महत्व पटविणारा नक्कीच होता.म्हणूनच..वेगळा...आगळा.
-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276