मला वाटते
तुझ्या निळाईमध्ये विरावे, ' 'एक रंगीत पक्षी येतो माझ्या
अंगणात', 'दवभरल्या रानात ऊन मधाळ हसते ', 'जा दूर दूर मेघा ', 'गेलीस कुठे चिमणबाय' या सगळ्याच अगदी सोप्या
शब्दांच्या आणि पाणी, पक्षी, डोंगर, पाऊस, झाडे ही निसर्गातली प्रतीके वापरून
केलेल्या कविता..आपल्या रोजच्या जगण्याचे प्रतिबिंब त्यात होते. त्यामुळे
लोकांना ते भावत होते. त्याला जोड होती आकर्षक नृत्याची. विदुला कुडेकर यांनी
केलेल्या नृत्यदिग्दर्शनात अगदी साध्या, पण डौलदार हालचाली करणार्या मुलींनी
शब्दातला अर्थ नेमकेपणाने प्रेक्षकांपर्यंत पोचवला.
साध्या शब्दातून पर्यावरणाची होणारी होनी मोठ्यांपासून अगदी लहानांपर्यत व्हावी..तिही कवीतेमधून ही किमया साधली ती गुरुवारी १२ जुनला पुणे मराठी ग्रंथालयातल्या रानफुले या कार्यक्रमात...
'मला वाटते व्हावे फूल, मला वाटते व्हावे झाड' किंवा 'पानावरती थेंब वाजती, माती मधूनी कोंब फुटती. ' अशा साध्या सोप्या शब्दांतून
पर्यावरणाचे महत्त्व सांगितले जात होते. आणि ऐकणारे लहान मुलांपासून थोरांपर्यंत
सगळेच त्यात अगदी रमून गेले होते. ठेक्याने कवितांना साथ देत होते.
त्यातले शब्द तेही उत्तम संगीतकारांच्या संगीत संयोजनातून फुलत गेले..सोबत होता एक सुंदरसा आणि सहज नृत्याविष्कार...कुठेही आपण वेगळे करतोय याची जराही जाणीव नव्हती..ते सारे सहजी घडत गेले आणि सभागृहातला सारा रसिक अगदी उस्फूर्तपणे टाळ्यांचा गजर करत ती ऐकत होता...त्यातली ती भाषा मनापर्यत घेत रसास्वाद टिपत होता..म्हणूनच तो वेगळा होता..
पर्यावरणाच्या
र्हासामुळे जग किती बदलते आहे, याची चर्चा नेहमी होते. पण, यातील गंभीरता जाणवली नाहीये
असेच वाटत राहते. या सगळ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा व लहानांपासून थोरांपर्यंत
सगळ्यांना कळेल अशा सोप्या भाषेत पर्यावरणाचे महत्त्व सांगणारा 'रानफुले'हा कार्यक्रम नुकताच सादर झाला. डॉ. संगीता बर्वे यांची
संकल्पना, काव्य आणि दिग्दर्शन असलेला हा कार्यक्रम
रंगला तो त्यातल्या अर्थगर्भ शब्दांमुळे, ते पोचवणार्या छोट्या कलाकरांमुळे आणि
त्यांना साथ देणार्या नृत्यांगनांमुळे. वाघाने केलेली काळविटाची शिकार
सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवून गेली. तेही फक्त चेहर्यावरील हावभावांनी.
आदित्य लेले, पूर्वा घोटकर, प्रांजली बर्वे व रेवा
चित्राव या कलाकारांनी कविता अतिशय समजून, उमजून सादर केल्या. विशेषत: रेवाचा ठसका
उल्लेखनीय होता. या सगळ्यांना रोहन भडसावळे याने तबला आणि प्रतीक भडसावळे याने
सिंथसायझरवर छान साथ दिली. साध्या पण अतिशय आत्मीयतेने सादर केलेल्या कार्यक्रमाने
पोचवले असे म्हणावे लागेल.
प्रभाकर जोग, आनंद मोडक, सलील कुलकर्णी, राजीव बर्वे, ऋषिकेश रानडे या संगीतकारांनी चालींना ओघवती स्वरमयी ..गुणगुणावी अशी ..म्हणूनच हा कार्यक्रम हे निसर्गायन रुजवित ,,मनात रुंजी घालत गेला...
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276