Thursday, January 24, 2008

साहित्य संमेलनाने सांगलीला काय दिले ?



साहित्य संमेलनाने सांगलीला काय दिले ?
सांगलीत भरलेल्या साहित्य संमेलनाचे सुप वाजले.सारे पुन्हा आपापल्या कामात व्यस्त झाले. मात्र हा जत्रोत्सव अनेक अर्थाने वेगळा ठरला. राष्ट्रपती आल्या.भव्य मंडप गर्दीने फुलून गेला.साधुंनी हातकणंगलेकरांना पारंपारिक पध्दतीने सुत्रे दिली नाहीत.यशवंतराव चव्हाणांबद्दल साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ठाले-पाटील .यांचे विधान वादग्रस्त बनेले.त्यांनी त्याबद्दल जाहिर माफीही मागीतली.
हा झाला तुम्ही वाचलेला.पाहिलेला भाग.
मला म्हणायचे आहे ते. संमेलनाने सांगलीली काय दिले.
संमेलनाने सांगलीला स्वच्छ केले. अतिक्रमण हटले.पाण्याची शुध्दता पातळी उंचावली. शहरातले चौक सुशोभित झाले.
सांगली आणि आसपासच्या शाळकरी मुलांना संमेलन अनुभवता आले. त्यांना हवी असलेली मराठी पुस्तके घेता आली. भाषेची गोडी वाढली.
मराठीपण सांभाळले गेले.
खुल्या मंडपात सर्व कवींना व्यासपिठ मिळाले.
आनंद आणि भाषेचे प्रेम सांगलीत दिसले अणि पसरलेही.
भव्यता हा भाग सोडला तर मंडपाबाहेर सांगलीच्या चित्रकारांना.संगीत वाद्ये बनविणाऱ्या कारागीरांना.रांगोळीकारंना.आपला ठसा उमटवण्याची संधी मिळाली.
सांगलीचे रस्ते सुधारले.सांगलीतल्या नाट्य-पंढरीची उदोउदो झाला. सहकार,संस्कृतीची नाळ अधिक जोडली गेली.
पतंगराव कदम आणि आबा आर आर पाटलांचे राजकिय वर्चस्व अनुभवता आले. पहाताही आले.
सांगलीची हळद साहित्यात रंगली
रस.गंध आणि नादाला प्रतिसाद मिळाला.
मराठीचे कौतुके बोलू जागतिक स्तरावर उजळत गेला.

सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com