Saturday, July 24, 2010

गुरुपौर्णिमा निमित्ताने


"आई माझा गुरु, आई कल्पतरू (Mother is my Guru, gives me everything)
सुखाचा सागरू, आई माझी (She is an ocean of happiness)
प्रीतीचे माहेर, शांतीचे आगर (An abode of love, tranquility and peace)
मांगल्याचे सार, आई माझी" (the essence of sanctity, My Mother)
- साने गुरुजी.
-----------------------------

सार्थ त्या ओळी सामो-या आल्या आणि सारे आयुष्याचे सरलेले दिवस डोळ्यासमोर आले.

बालपणापासून संस्कार या नावाने जे काही झाले ते खरे तर आई नकळत करत असते. तिथे कुठेही आव नसतो.
ती असते केवळ माया. खरे प्रेम. आपल्या मुलाने चांगले व्हावे हे एकच उद्देश इथे असतो.
आई जे काही करते ते अगदी निर्व्याज.

आईसारखे दैवत लाभूनही किती जण त्या माऊलीला स्मरतात.

आठवणीत असते आई

साठवितही असते आई

मनात असते आई

ध्यानात राहते आई

काळजात सांभाळून पाहतो

कधीतरी हरवून जाते आई.


पुन्हा कधी न भेटण्यासाठी

कधीही न दिसण्यासाठी


आपण पडतो एकटे

अगदी एकाकी

खरे तर तिने केवळ जन्म दिला नाही

तर घडविले

अगदी कुंभाराच्या मडक्याला आकार द्यावा ना तसे.

शाळेत. हायस्कूलमध्ये

पुढे कालेजचा रस्ता पकडतो

कधी प्रेमातही पडतो

कधी नादावतो

कधी विसावतो

कधीतर मूग गिळूनही बसतो


आता ती बोलणे कमी करते

तुझ्या मनाला येईल तसे कर..म्हणते

मीही जिद्दी


तुझाच मुलगा ना

मग रागाला न जुमानता करतो

आईचा विचार न करता
.. मनाप्रमाणे जगतो..


आईचा विरह सहन होत नाही..

पुन्हा तिच्या आशिर्वादासाठी पायी हात लावतो..

तिही जवळ घेते..मोठा झालास..पण विसरला नाही म्हणते..


सरलेले सारे बोलून मोकळा होतो

मागतो फक्त तुझे हात
जे सदैव माझ्या पाठीवर फिरत राहतील


झाले.


आता ते सारे आठवतो.

मनात कोंडलेले सारे

बाहेर काढतो...


पण काय उपयोग

आता ती नसते..

केवळ आठवणीतच सारे..


जगाच्या पाठीवर कुठेही असलास तरी माझे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत.


सांगणारे शब्द.. कानावर पडतात..


आई,,खरी गुरू..जिवनाची तिच शिल्पकार




सुभाष इनामदार, पुणे


subhashinamdar@gmail.com
9552596276

Tuesday, July 20, 2010

पंढरीचा विठुराया


भक्तांचा स्नेहाळ मेळा आज पंढरपूरात जमलाय.विठुरायाच्या गजराजा गजर करीत वारकरी पांडुरंगाचे दर्शन व्हावे हिच ओढ मनी घेऊन दाखल झालेत. भाव भक्तिचा हा महासोहळा देहू-आळंदीच्या दिंडया फडकवत तुकाराम म्हाराज आणि ज्ञानेश्वरांच्या पादुकांचे जागरण उभ्या महाराष्ट्रात करून पंढरीच्या वीटेवर नतमस्तक होण्यासाठी आसुसला आहे.


सगळीकडे विठ्ठल नामाच्या गजर सुरू आहे. भावाच्या भुकेल्या पांडुरंगाने सावळी वस्त्रे परिधान करून भक्तांच्या दर्शनाला तयार होउन सजलाय.

पंढरीत जनसागर उसळलाय. संतांचे नाम. वारकरी पंथांचे भजन . वारक-यांच्या माळा. सा-यातून भावभक्तिचा सागर एकाच नामात दंग झालाय.


विठ्ठल...विठ्ठल गजरीचा घोष ...टाळांचा गजर होतोय...

आणि सारे एकाच सुरात गाताहेत

सुभाष इनामदार, पुणे.


subhashinamdar@gmail.com

9552596276