Tuesday, May 14, 2013

वसंतात उडून गेली सारी मागिल वर्षे






खरं नसलं..तरी हे खरेच आहे...आता तुम्ही पन्नाशी गाठलीत.
आयुष्याच्या वळणावरं  लागणारे आहे सुवर्णपान !..

सोनेरी किनार लाभलेलं
अनेक अनुभव गाठी असलेलं
पुढच्या मार्गाकडे चाललेलं
एक सुंदर नावं.....
पन्नाशी !

दोन घरांचा दुवा असलेलं
दोन पंखात बळ देणारं
दोन्ही नात्यांना खुलविणारं
दोन्ही हाताना धन्य वाटणारं..
एक सुंदर ठिकाण..
पन्नाशी !

अगदी बालपणापासूनचा सारा आठव
कालपरवा घडल्यासारखा
डोळ्यासमोर येतो..
अनेकविध आठवणींची पानं अलगद
सामोरी येतात...
काळजावर कोरली जातात..

नातं केव्हा जडलं त्या सुरांशी
बाबांनी हाती दिला कोका
त्याला साथीला घेऊन
सूरही मनात भिनले...
संगत झाली ..गट्टीही जमली..

शिशूशाळा, बालवाडी मग शाळेत
पुढे महाविद्यालयात नातं जडलं शिक्षणाशी...
आणि उमटू लागले सूर
व्हायोलीनच्या `बो`मधून...

अलगद एका क्षणी पाहयला आले `ते`
हरखून गेले...देवा-ब्राम्हणांच्या साक्षीने
आंतरपाट बाजुला झाला..
देवांचे घर झालं माहेर
सासरी आले गोसावी बनून...

संसाराच्या सारीपटावरच्या सोंगट्या
अगदी अचुक पडल्या
घरात ...नेमक्या विसावल्या..
दोन रत्ने पदरी आली..
दोन मनांची कामना तेव्हाच पुरी झाली...

नोकरीच्या निमित्ताने जाळे `संचार`ले
वायरीच्या जंजाळांत `अर्थ` हाती आले
सरली कित्येक वर्षं..
झाली साकार नोकरी...
य़ेणार आता घरी एक सुंदरशी छोकरी...

सासरच्या घरच्यांनी दिला मानसिक आधार
मुलीसारखे केले प्रेम अपार..
नाही तुटला बंध..नाही विरले धागे
माहेर-सासरचा आज एकच झालाय बंध..

आयुष्याच्या पन्नाशीत सारे काही लाभले
संसाराच्या रथात सूरही सूत्रधार झाले
व्हयोलीनच्या गीतांनी मनही आनंदी राहिले
रसिकांच्या टाळ्यांनी तेही सुखी जाहले..

आशा-निराशेचा खेळ..
वाटे आता संपला..
सुवर्णाचा क्षण
आज दारी रंगला...

आशीश तुमचे आम्हावरी लाभो
दीर्घायुष्य असाया शरीरी साथ लाभो

 हे लडीवाळ सूर
मनात आळवावे
जनात रुजवावे
असंमंती....






-सुभाष इनामदार,पुणे