Tuesday, June 19, 2012

पैसा आहे..पण स्वास्थ्य हरवले...



आपल्या आयुष्यातली कसरत सतत चालू असते. जेव्हा पगार कमी होते तेव्हा आपोआपच खर्च बेतासबात होता. पण जेव्हा मध्यमवर्गीय म्हणून आपण गणले जातो, तेव्हा एकेक व्यसने लागतात. आणि ती एकदा लागली की सुटत नाही...ही व्यसने तसली नाही...

घरात वीज नव्हती तेव्हा इतरांचा हेवा वाटायचा...पण आज घरोघरी वीज आली..मग वीजेवरची उपकरणे आली. टी.व्ही. फ्रीज, वॉशिंग मशीन, संगणक, मोबाईल, फोन.... पुढे या सगळ्याची इतकी सवय झाली की वीज पाच मिनीटे गायब झाली तरी बेचैन व्हायला होते. मग त्यासाठी इनव्हर्टर आला. चोवीस तीस वीज...

तीच गोष्ट घराची. भाड्य़ाच्या घराची घरमालकाची कटकट नको म्हणून स्वतःचा फ्लॅट आला. आता त्यासाठी कर्ज आले. ते फेडायचे म्हणून घरातल्या सर्वांनी नोकरी करायची..

बाहेर जायचे मग स्वतःचे दुचाकी वाहन हवे.... बस वगैरे...छे छे...नको रे बाबा! आता पेट्रोल...दर विचारु नका..८० रु. लिटर...

पूर्वी आंबा रायवळ..गावरान चालायचा..आता लागतो हापूस..तोही रत्नागिरी बरं.. आता मग तो रत्नागीरी समजून आपल्या गळ्यात व्यापा-याने मारल्यावर दोष कुणाला?

परिस्थितीमुळे खाण्याची आबाळ..आता..सतत..जे हवे ते..मिळते.. ते ही केव्हाही ,,कुठोही खात येते...मालिका पाहतानाच खाणे ही तर सवय...मग मालिकेकडे लक्ष..खाणे चाऊन खाणे.दूर..मग पोटाच्या तक्रारी सुरु...
लवकर निजे..लवकर उठे..तया आरोग्य संपत्ती भेटे.... आता कुठे..उशीरा झोपे..सावकाश उठे.... सर्रास सुरु.. पित्त, पोटाच्या तक्रारी..सारे आले...

डॉक्टर आले...पण ते आता मल्टीस्टोरेज हॉस्पिटल मध्ये...फॅमिली डॉक्टर..कमी झाले. त्याचा खर्च वाढला...
पैसा आहे..पण स्वास्थ्य हरवले...असे जीवन झाले आहे...सारे जण पळताहेत...रस्त्यावर जाताना अपघात झाला तरी त्याकडे डोळेझाक करुन आपली गाडी ऑफिस पकडण्यासाठी धावतोय..

असे जीवन..अशी सवय.... अनेक सांगता येईल..पण इथे थांबणे योग्य!



( खरं तर हे सारे मी अनुभवतो आहे..तेच नोंदविले...ही तशी व्यक्तिशः नोंद आहे इतकेच...सगळेच यात सहमत रहातील असे नाही...)



सुभाष इनामदार, पुणे.

Monday, June 18, 2012

गेल्यानंतर सांगायला एक शब्द पुरेसा होतो...



जगायला आयुष्य अपुरे वाटते...
गेल्यानंतर सांगायला एक शब्द पुरेसा होतो...

हासत हासत आयुष्य घालविणारी..चेह-यावरचे हास्य न मावळणारी..माझ्यावर कौतुकाची थाप देऊन आशीर्वादाचे चार शब्द मनसोक्त देणारी माझी मामेबहिण अचानक गेली..कुणाला न कळवता.. न बोलता..कुणालाही न त्रास देता...आपले दुःख उराशी बाळगत तिने देह ठेवला..वयाची ८० वर्षे होतानाही ..पतीच्या निधनानंतरही घराला घरपण देणारी आणि जुने ते घर सांभाळणारी ही बहीण...आज तिच्या आठवणीने मन गलबलून गेले.

पुण्यात मी आलो..तिचा आधार होता..जोगेश्वरीजवळच्या देव वाड्यातले तिचे जुने वाड्यातले घर जपून ठेवले...ओल..खड्डे..अपुरा प्रकाशातही तिने गेली ६० वर्षें जागा जपली..

कित्येकांचा तो एक आसरा होता...पुण्यात आल्यानंतर तिच्या घराची ओढ प्रत्येकाला असायची...
जसे जमेल तसा पाहुणचार करुन शिष्टाचार सांभाळून तिने घर जपले..वाढविले..

तशी ती माझ्या आईवर माया करणारी..वडिलांनाही.आधार वाटणारी...पैशाची श्रीमंती नसली तरी मनाची बोलकी..चार सल्ले मनापासून देणारी ....

आज तिच्या दोन मुली तिचा वारसा सांभाळणार आहे...जावई,नातू आहेत. भाऊ बहिणी आहेत...पण तिचे जाणे चटका लावणारे...
तशी तिली गाण्याची आवड...डेक्कनवरच्या घाटेंच्या गायन क्लासचा वारसा होता तिच्याकडे...गाणे शिकायचे होते...पण ते राहिले...पण आवड जबरदस्त....

सासू, दिर,नणंद सा-यांची काळजी घेऊन...आपल्या पतीच्या आजारपणात जीवाचे रान करणारी ती बहिण आज न सांगता...काहीही न बोलता..अबोल झाली....हिच खंत आणि हिच श्रध्दांजली...


जाणारा मागे ठेऊन जातो आठवणींचा खजीना..
त्यावर तर जपत जातो आपला सारा जमाना..





सुभाष इनामदार, पुणे

Sunday, June 17, 2012

माझे वडील




हाफ खाकी पॅन्ट आणि वर पांढरा शर्ट अशा साध्या पोशाखात माझे वडील पिठाच्या गिरणीत जायचे. त्यांचा तो पोटापाण्याचा व्यवसाय होता. आपल्या मुलांना दोन वेळची भ्रांत पडू नयो म्हणून ते नियमाने सकाळी चार तास आणि दुपारी चाक तास गिरणी चालवायचे. मिळकत फार नव्हती..पण आलेल्या पैशातून घराची किरकोळ खर्चाची हातमिळवणी व्हायची...

पुढे पुढे..गिरणीतली कमाई कमी झाली..गिरणी विकून टाकली..वडील घरी सातरच्या भावे सुपारीवाल्यांच्या पुड्य़ा भरण्याचे काम करायचे...

वय वाढले तसे ते थकले...काम होईनासे झाले..पण कधीही चेह-यावरचा आनंदी भाव कमी झाला नाही...जे मिळेल ते आनंदाने ...समाधानाने झेलायचे...

पुढे त्यांच्या ओषधांचा खर्च अधिक व्हायला लागला.. आणि आपण तर काही मिळवित नाही याची खंत त्यांना सतत बोचायची... पण वडिलांच्या चेह-यावरचे समाधान विरघळले नाही...अखेर पर्यंत..


यातून एकच शिकलो..कामाला मागे हटायचे नाही..
आहे या परिस्थितीत समाधाननाने रहायचे....आज ते नाहीत...

पण तिच माझा पुंजी आहे....

ही एक ओळख करुन द्यायला आवडेल..
पण ते आता सारे कुठे लिहता येते...
जे मनात दाटते ते तिथेच गाठते...
मागे केवळ स्मृतीच..
त्याच त्या घेऊन..जीवनाची पुढील दिशा होत आहे.