Tuesday, July 8, 2025

भक्तिरसात चिंब भिजविणारा. लय विठ्ठल..सूर विठ्ठल कार्यक्रम ..!

 


स्वर विलास..
तर्फे आयोजित..
लय विठ्ठल.. सूर विठ्ठल
यातून पंडित हेमंत पेंडसे यांची संगीतकार..गायक आणि शास्त्रीय संगीतातील बैठक याचे दर्शन या कार्यक्रमात झाले..
आषाढी एकादशीच्या दिवशी संत रचनांना ऐकण्यासाठी ..ती भक्ती कलावंतांच्या स्वरातून ऐकण्यासाठी रसिक अधीर झाल्याचे जाणवत होते..
सावनी शेंड्ये..साठ्ये.. प्रज्ञा देशपांडे..राधिका ताम्हणकर..तसेच पंडित शौनक अभिषेकी..या इ पंडित रघुनंदन पणशीकर यांनी पंडित हेमंत पेंडसे यांच्या विनंतीनुसार आपले योगदान देऊन स्वर.. लय यांच्या मैफलीत जिवंत भक्तीचा प्रभाव निर्माण केला.
याचे सारे श्रेय विलास जावडेकर यांच्या रसिकतेमुळे शक्य झाले..
एक उत्तम रचनांचा कार्यक्रम अतिशय ताल्लिन
होऊन ऐकता आला.



आरंभी रामकृष्णाचा गजर..नंतर
मन हे परसी हरी के चरण.. मीराबाईंची रचना
सावनी शेंड्ये..साठ्ये
अशी कार्यक्रमाची सर्वात सुंदर अश्या साथीदारांच्या एकरूपतेने झाली..
कार्यक्रम पुढे अधिक रंगत गेला तो
आधी रचिली पंढरी..मग वैकुंठ नगरी..
हेमंत पेंडसे
राम बरवा कृष्ण बरवा



सुंदर बरवा वाणी
- प्रज्ञा देशपांडे
सोयराबाई यांची रचना,. टाळ दिंडीचा गजर. विठ्ठल नामाचा उच्चार
राधिका ताम्हणकर
यांच्या सादरकरणातून ..!





सावनीची संगीत रचना..समर्थ रामदास यांची शब्द रचना.. गायली सावनी शेंड्ये..यांनी..
राम गावा राम घ्यावाराम जीवाचा विसावा




संत भार पंढरीत.. झलक हेमंत पेंडसे..यांनी सादर केली नंतर सावनी यांनी मैं गोविंद गुण गुणा.. ही रचना रंगवून सादर केली.
मध्यंतरानंतर..अभिषेकी.. बादल देख डरी..हो श्याम .. ही हेमंत पेंडसे यांनी संगीत दिलेली. गायली शौनक अभिषेकी यांनी.



अवघे गर्जे पंढरपूर... शौनक आणि रघुनंदन..
त्याला जोडून.. हेमंत पेंडसे यांनी सादर केलेला अभंग.
रंग रंग रंगीली ..त्याला जोडून अबीर गुलाल..याचे एकत्रित तिन्ही गायकांनी घडविलेले स्वरदर्शन रसिकांना चकित करणारे होते..
रघुनंदन पणशीकर यांनी गायलेली स्वतंत्र रचना.. संत जनाबाईचा अभंग
येरे येरे माझ्या रामा
मनमोहना मेघश्यामा
रघुनंदन..एकादशीच्या वेळी गुरु पौर्णिमा ..
असे आधीच सांगून.. रघुनंदन पणशीकर यांच्या त् गुरू किशोरी आमोणकर यांचा.. सादर केलेला उच्च लेकप्रियता पावलेला ..बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हा अभंग..
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर..



या लोकप्रिय असलेल्या अभंगाचे स्वर मंचावर प्रकाशमान झाले आणि लय विठ्ठल.. सूर विठ्ठल..कार्यक्रमाची गुंज रसिकांच्या मनावर पेरली गेली..
साऱ्या गायकांच्या मागे तितकाच त्यांचा शिष्यवर्ग मागे साथ देत असतो.. त्यात ऋषिकेश देशपांडे,
यश कोल्हापुरे ,अनिमिष गोसावी,करण देवगावकर, आणि प्रीती पंढरपूरकर जोशी..
यांचेही कौतुक करायला हवे.
राहुल गोळे,तुषार दीक्षित,अवधूत धायगुडे, मनोज भांडवलकर आणि प्रणव गुरव यांची उत्तम साथ असल्यानेच हा कार्यक्रम अधिक रसिकांना मोहित करीत होता.



स्नेहल दामले यांचे निवेदन एकूणच या अभंगांच्या कार्यक्रमाला अधिक प्रभाव देणारे आणि ओघवती भाषेची किमया साधून चाणाक्षपणे शब्द निवडून केलेले होते.

- Subhash Inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com