पुण्याच्या सौ. चारुशीला गोसावी यांच्या व्हायोलिन वादनाच्या शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमातून व्हायोलिन गाते म्हणजे नेमके काय होते याचा प्रत्यय आला.
आम्ही दस्तुरखुद्दंनी तिच्या कारकीर्दीला रसिकांरसमोर उलघडण्यासाठी चार प्रश्र विचारुन बोलते ठेवण्याचा प्रयत्न केला.
नोकरीच्या चक्रातही आपली वादन साधना त्यांनी अढळपणे कायम ठेवली. संसाराची घडी व्यवस्थित मांडताना सुरांशी नाते कायम नव्हे वाढवत ठेवले.
मध्यंतरी साम टीव्हीवरच्या मधुरा कार्यक्रमातून व्हायोलिन वादनाचे कौशल्य जाणवले. काही दिवसातच म्हणचे फेब्रुवारीत दूरदर्शनच्या एम टू-झी टू या वर्षा उसगावकरांच्या मुलाखतीमधून चारुशीला गोसावी छोट्या पडद्यावर दिसतील.
संगीत क्षेत्रात असे अनेक कलावंत सततची साधना करीत असतात. मला वाटते की, यांच्या साधनेला असा ब्लॉग मधून वाचकांपर्यंत आणि रसिकांपर्यत पोचवावे. हा वृत्तांत शनिवारच्या इ.सकाळच्या पुण्यतल्या लिंकमध्ये आपण वाचू शकाल.http://72.78.249.124/esakal/20100130/5379017872426454580.htm
पुणे - व्हायोलिनच्या सुरांतून "चांदणे शिंपीत जाशी', "ऐन दुपारी यमुना तीरी' या मराठीबरोबरच "आईऐं मेहरबॉं', "ये रातें ये मौसम नदी का किनारा' अशी लोकप्रिय हिंदी गीते सादर होत असताना हा श्रवणानंद लुटणाऱ्या रसिकांनी नकळत त्यात आपले स्वर मिसळले. चारुशीला गोसावी यांच्या गायकी अंगाच्या वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले आणि तीन दशकांची कारकीर्द उलगडताना "आम्ही चालवू हा पुढे वारसा' या काव्यपंक्तींची प्रचिती शुक्रवारी आली.
हिंदी, मराठी गीतांबरोबरच गोसावी यांनी सादर केलेल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विविध रचनांनाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निमित्त होते, भरत नाट्य संशोधन मंदिर सांस्कृतिक मंचातर्फे आयोजिण्यात आलेल्या "स्वरसाधना' या पं. भालचंद्र देव यांच्या कन्या आणि शिष्या चारुशीला गोसावी यांच्या व्हायोलिन वादन मैफलीचे. संगीत साधनेचा तीस वर्षांचा प्रवास त्यांनी व्हायोलिन वादन आणि गायनातून उलगडला.
गोसावी यांनी राग मारुबिहागने मैफलीला सुरवात केली. यानंतर पं. गजाननबुवा जोशी यांच्या वादन शैलीनुसार श्री रागातील रचना, पं. श्रीधर पारसकर यांची गोरख कल्याण रागातील आणि पं. व्ही. जी. जोग यांच्या वादन शैलीतील देस रागातील गत सादर करून रसिकांची दाद मिळविली.
मैफलीच्या दुसऱ्या भागात त्यांनी सादर केलेली लोकप्रिय मराठी आणि हिंदी गीते, लावणी, भावगीते आणि नाट्यगीतांना वन्समोअरची फर्माईश मिळाली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी गजानन वाटवे आणि मंदाकिनी चाफळकर यांनी संगीतबद्ध केलेली निवडक गीते सादर केली.
रविराज गोसावी यांनी तबल्यावर आणि दीप्ती कुलकर्णी यांनी संवादिनीवर साथसंगत केली.
सुभाष इनामदार यांनी चारुशीला गोसावी यांच्या साधनेच्या कारकीर्दीतल्या अनेक घटनांना आपल्या मुलाखतीमधून बोलते केले.
http://www.youtube.com/user/subinamdar#p/u/19/WDPXMpN0lLg