Saturday, September 17, 2011

असे कधी होईल का ?


आमच्या स्फूर्तिदेवतेला हा शब्दांचा खेळ करून स्वतःच्या मनातल्या भावनांना असे व्यक्त व्हावेसे वाटले...
त्यांची इच्छा..
त्यांच्याच शब्दात वाचा...जरूर वाटल्यास कांही तुम्हाही म्हणा...स्वागत आहे.

सुभाष इनामदार..
---------------------------------------------
अंतरीच्या कळीचे
फूल कधी होईल का.?
बोथट झाल्या भावना
धार त्यांना लागेल का?
काय करावे, किती करावे
गणित कुणी सांगेल का?
असंतोषाचे चेहरे किती
काही केल्या लपेल का?
राग-लोभ यांचे चक्र
काय केल्या थांबेल का?
दुष्टचक्रात फिरता फिरता
गुंतूनी बाजूला होशील का?
हातचे राखून ठेवीत
द्यायचे ते दिलेस का?
आता ऊरला अहंपणा की
तोही केव्हा जाईल का?
मंत्र गड्या य़शाचा
सांग तुला सापडेल का?



सौ. सरोज इनामदार, पुणे

Tuesday, September 13, 2011

भगवद्गीतेची शिकवण सिंगापुरात


भगवद्गीतेची शिकवण आजही आपल्या गतिमान जीवनात दीपस्तंभागत मार्गदर्शक आहे.

गीताज्ञानप्रसारासाठी सिंगापुरात १९९७ साली सुरू झालेला "गीता जयंती" हा उपक्रम आता खूपच विस्तारित झाला आहे. वर्षभर चालणा-या सत्रात ’हवन’, आंतरराष्ट्रीय गीता परिसंवाद, लहानथोरांसाठी गीतापठण, निबंधलेखन, चित्रकला व वक्तृत्वस्पर्धा, तसंच नाट्यनृत्यसंगीतमय विविध गुणदर्शन असे अनेक कार्यक्रम असतात.

या उपक्रमात सुमारे ३५ निरनिराळ्या संस्था ’हिन्दु एन्डॊमेन्ट बोर्ड’च्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून २०११-१२ सालासाठी या सा-या संस्थांचं नेतृत्व करण्याचा बहुमान "महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर"ला मिळाला आहे.

विश्वबंधुत्वाचं ध्येय समोर ठेवून सिंगापुरातील विविधभाषिक स्थानिक व परदेशी जनांना एकत्र आणण्याच्या "गीता जयंती"च्या सत्कार्यात आपला सहभाग मिळेल अशी आशा करतो.

http://www.facebook.com/pages/GitaJayanti/111361895634669

आपला..

माधव भावे

The story and legends of Lord Krishna is resplendent with innumerable parables and events rich with diverse forms of dance and music. The Hindu philosophy itself has placed dance and music on a high pedestal with the status of an Upa Veda - a subsidiary Veda. Many great saints, sages and philosophers are closely linked to Music and dance.

Even the word "Gita" literally means a song and not a treatise or philosophy.

Many of Indian classical dance forms are so deeply influenced by the stories of Krishna from Srimad Bhagavatam and other Puranas and Ithihasas that art performances such forms such as Bharata Natyam, Kathakali, Manipuri or Odissi is almost never found found without them.

The story and legends of Lord Krishna is resplendent with innumerable parables and events rich with diverse forms of dance and music. The Hindu philosophy itself has placed dance and music on a high pedestal with the status of an Upa Veda - a subsidiary Veda. Many great saints, sages and philosophers are closely linked to Music and dance.

Even the word "Gita" literally means a song and not a treatise or philosophy.

Many of Indian classical dance forms are so deeply influenced by the stories of Krishna from Srimad Bhagavatam and other Puranas and Ithihasas that art performances such forms such as Bharata Natyam, Kathakali, Manipuri or Odissi is almost never found found without them.


Programme: To be announced




Date : 08 October 2011 (Saturday), Venue : Global Indian International School Auditorium
1 Mei Chin Road , Queenstown, Singapore 149253
Time : 6:00 pm

Admission is through tickets of $15 tickets (inclusive of dinner). Limited Patron tickets are also available.

भक्तिची नशा


सोमवार सकाळी १० ची वेळ... अनंतचतुर्थी निमित्त रविवारी सुरू झालेली गणपती विसर्जनाची मिरवणूक अद्याप सुरूच होती. मी टिळक रोडवरच्या स्पीकरच्या भिंतींनी हादरून गेलो. लांब उभे राहून नुसती नजर टाकली तर मिरवणुतील सजावटीच्या मखरात बसलेला श्री मंगलमूर्ती शांतपणे मांडी घालून ठामपण बसलाय.. माझ्या हाती काही नाही .कार्यकर्ते नेतील तसा मी पुढे सरकतो आहे,...असे सांगत.

अनेकांना ऑफिस गाठायची घाई. कुणाला दुकान सुरू करायची..तर कुणाला काही...पण या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्याचे काय....

प्रत्येक गणपती मंडळाच्या ट्रॅक्टरमागे विजपुरठा करणारे जनरेटर लावलेले होते. एका गाडीत डीजे गाण्य़ांची निवड करून ठोका असणारी गाणी निवडत होते. लय आणि तालात धुंद होऊन मंडळी नाचत होती. अंगविक्षेप करीत होती. अंगात बळ आल्यासारखे त्यांचे अंग तालावर जणू थिरकत होते..

सा-या वातावरणाचा ताबाच जणू या मंडळाच्या कर्णकर्कश ( योपेक्षा दुसरा शब्द सापजत नाही) आवाजाने घेतला होता. वास्तविक श्री गणेशाचे विसर्जन अनंतचतुर्थीच्या दिवशीच पूर्ण व्हावे असे शास्त्र सांगते.... नंतर सुरु होतो पितृपंधवडा... तो अशुभ मानतात...पण त्याचे कोणाला काय....

आपल्याच मस्तीत नाचणारे इतके मश्गुल असतात की ठेका हेच त्यांचे लक्ष... आणि अंगाला हिसके देउन नाचणे हा त्यांचा धर्म.

गणपती बाप्पा मोरया... या निनादात बुध्दीचे हे आराध्य दैवत .. स्पिकरच्या भिंतीत अडकून गेले आहे. इथे नशा दिसते ती भक्तिची नाही तर आवाजाच्या नशेची.

खरं सांगतो..मी तर टिळक रोडवर चाललेल्या एका ट्र्रक्टरच्या मागे काही कार्यकर्त्यांच्या हातात दारूची बाटली बघीतली. ते सर्वजण अगदी त्यांचा डीजेही आस्वादात मग्न होता... ते काही मंडळी इतर कार्यकर्त्यांना आत बोलावित होता. आता ही खरी नशा चालू होती..

तसे पाहिले तर नाचणा-या तरूणांच्या डोळ्य़ात ती धुंदी कशाची आहे ते दिसत होते. त्यांचे पाय थिरकतच होते... अंग वळतच होते... हे सारे कुणासाठी... का ही संधी साधून हे सारे भक्त आपल्या दैवतासमोर हा आगळा खेळ करण्यातच धन्यता मानतात... (देवा गजानना पाहतो आहेस ना... हे काय चाललयं ते...)

पोलिसांचे एक पथक या मंडळींना पुढे येण्यासाठी सतत सांगत होते.. पण ते तात्पुरते ऐकत...पालिस पुढे गेले की लयीत..संथता आलीच.. एक पोलिस चौकात डीजेला स्पीकरचा आवाज कमी करायला सांगत होता. काही काळ लोटला की डीजे पुन्हा आवाजाची बटने वाढविताना दिसत होते...

हे सारे पाहिलेले तुम्हापर्यत पोचवावे वाटले. तुम्ही ते अनुभवलेलेही असेल..पण मला ते सांगावेसे वाटते... या माध्यमातून...

खरच...आपण सारे यातून काय मिळवितो.. समाधान..शांती..आराधना...भक्ति की नुसतीच नशा..भक्तिची.....


सुभाष इनामदार, पुणे
9552595276
subhashinamdar@gmail.com

Sunday, September 11, 2011

खरचं हे सारे आपण का करतो....



एक मुक्त चिंतन


आयुष्याच्या एका वाटेवर हा प्रश्न कदाचित मला आज पडला असेल...पण तुम्हालाही तो केव्हातरी पडला असेल ना...
खरं सांगा, आपण जगतो कुणासाठी...
खरा आनंद कुठे मिळतो...
समाजाबरोबर वावरत.. की वाहावत जातो..
स्वत्व उरत नाही... आपण आपले नसतो..कुणाच्यातरी तालावर नाचत असतो...कधी त्यांची मर्जी म्हणून तर कधी आपण काही गोष्टींबरोबर अंधानुकरण करत असतो म्हणून...
अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला सापडत नाहीत.. ती शोधायचा आपण प्रयत्न करतो... सापडतात...छे ..छे ...तरीही दुसरे करतात म्हणून ती गोष्ट आपण करीत रहातो... का...कुणासाठी ..कुणाचे बंधन हे....
तुम्हाला वाटत असेल..याला काय करायचं आहे...
आपण जागतिकीकरणाच्या गोष्टी करतो..पण आपल्या घरात जे आपण करतो...ते का.... हे आपण सांगू शकतो काय....
तुम्ही देवाची पूजा करता...किंवा घरातल्या देवांना नमस्कार करता ना...
तो तुम्हाला काय देतो... आत्मविश्वास की निव्वळ श्रध्देपाटी...
खरं. सांगा,,, तुम्हाला देवाची आठवण होते तेव्हा तुम्हाला काही प्रश्न पडतात.. काही दुखतं. खुपतं...तेव्हाच ना...
तुमच्यातला तो दुबळा बनतो..मग तुम्ही तुमचे संकट दूर व्हावे म्हणून प्रयत्नाचाच एक भाग म्हणून देवाशी...किंवा देवापाशी नतमस्तक होता...
तुम्हाला लहानपणी भरवलं जातं.. देवाला नमस्कार कर. त्याच्याजवळ माग मला चांगली बुध्दी दे...मला मोठं करं...
हो ना....
तुमच्या एक लक्षात येते काय..तुम्ही माणसातल्या देवत्वावर म्हणजे तुमच्यावर विश्वास न ठेवता कुणीतरी आपल्या काही तरी देईल..मग आपले चांगले होईल..आलेले संकट दूर जाईल...आपण चिंतामुक्त होऊ.....
आजकालची पिढी हे सारेपासून दूर जातेय...
ती प्रॅक्टिकल बनत चालली आहे...ती अधिक विचार करून जगायला शिकली आहे..ती श्रध्दाळू आहे.. पण तिचा विश्वास आहे...स्वतःवर..आपल्यातल्या गुणांवर..
एक खरे जर त्यातूनही ते चुकले तर स्वतःची चूकही ते कबूल करायला मागे पुढे पहात नाहीत....
आता आपणही विचार केला पाहिजे जे करतो...ते का...याचा....
हे आपण का करतो याचा...पैसा आणि तुमचा आत्मविश्वास दोघेही एकत्र आले..तर उद्याची पहाट नक्कीच तुमची आहे.


सुभाष इनामदार,पुणे.
..९५५२५९६२७६...
subhashinamdar@gmail.com