Friday, June 9, 2017

चांगली गाणी श्रोत्यांपर्यत पोहोचण्यासाठी व्यासपिठच नाही



कौशल इनामदार यांची खंत


काव्यगायक गजाननराव वाटवे जन्मशताब्दी निमित्त स्वरानंद प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या भावसंगीताची वाटचाल...काल, आज आणि उद्या याविषयीच्या चर्चेत सहभागी झाले होते कौशल इनामदार, आशुतोष जावडेकर, श्रीकांत पारगावकर, संगीता बर्वे आणि विनायक जोशी...
सुत्रसंचलन केले ते अरुण नुलकर यांनी...
गुरुवारी ( ८ जून ) हा कार्यक्रम पुण्यात नेहरू सांस्कृतिक भावनात रसिकांच्या उपस्थितीत रंगला.

 

कौशल इनामदार यांनी आजच्या संगीताविषयी मांडलेले विचारधन इथे शब्दात मांडला आहे.. तुम्हाला आवडेल अशी आशा करतो..
प्रतिक्रिया जरूर लिहा...स्वागत आहे..


लताबाई म्हणजे प्रश्नच नाही.. हे म्हटल्यावर लता बाईंंसारखी गायीका व्हायचे हे स्वप्न असते. पण जे उत्तम आहे त्याला प्रश्नच विचारत नाही..त्याला ईकडनं तिकडन न बघता त्याची परिक्षाच पहात नाही ..त्यात काय चांगलं आहे..काय़ वाईच आहे..काय भावलं नक्की याची पारखच करून घेत नाही तोपर्य़त त्या पिढीतल्या गायिकेला लता मंगेशकर होणं अशक्यच असतं. हे चांगलंच आहे, उत्तमच आहे ते तुम्ही बघत जाच..पण यामुळे नुकसान कसे झाले..ते संगीतकार कौशल इनामदार भावसंगीताच्या बाबतीतल्या चर्चेत सांगत होते..ते ऐकणे एक रसिक म्हणून फारच वेगळे होते..

तुम्ही अनेक कार्यक्रम मराठी संगीताचे ऐकले असतील..तेव्हा तुम्हाला असे लक्षात आले असेलच की प्रेक्षकवर्गाचे वय सातत्याने वाढत जात आहे. मी सुरवात केली काम करायला तेव्हा पंचेचाळीस ते पंच्चावन्न या वयोगटातले प्रेक्षक जास्त होते. त्याच कार्यक्रमांना पुढे पासष्ट ते पंच्च्याहत्तर हे प्रेक्षक यायला लागले.



टिकून रहाण्याची घडपड आज करावी लागते
आता थोडं विस्ताराने बोलतो म्हणून कौशल म्हणाला,
 पूर्वी आकाशवाणी हा एकच नळ होता. ज्याच्यातून पाणी यायचं. त्याच्यात आपण आपली घागर भरून घ्यायचो. आणि आनंद असायचा. आता तुम्ही कॅफे कॉफीडे मध्ये गेलात तर चार स्क्रीन असतात. एकावर एम टीव्ही चालू असतो. दुसरीकडे चॅनल व्ही सुरू आहे. तिसरीकडे व्ही एच वन सुरु आहे आणि चोथ्यावर इएसपीन सुरु आहे. जे संगीत लागलेलं असते..त्याचा या चारही चित्रांशी सुतराम संबंध नसतो. ते वेगळचं असते . आपण हे सारे एकत्र ऐकत असतो. आपला समाज इतका सिझोफ्रेनिक वातावरणात जगतो आहे.. की नवीन पिढी पुढे प्रश्व हा सर्व्हायवलचाच आहे. टिकाव धरून ठेवण्याचा आहे. तु्म्ही म्हणता जुन्या चाली घेतात आणि मोडतोड करतात. ही त्यांची टिकून राहण्याची धडपड आहे कारण गोष्ट जी रुजायला किंवा मुरायला जितका एक वेळ द्यायला लागतो..रसिकांनी सुध्दा तो देणे आता शक्यच नाही. मग मी त्यापुढे जुने काही घेऊन मला त्याच्यात पुढे जाता येते काय असं बघतो..याच्यात कुणाचाही अनादर करण्याचा हेतू नाही. उलट परंपरेचा आधार घ्यावा ही त्याच्यातली भावना चांगलीच असते. परंपरेच्या छायेत असलेला माणूस अत्यंत निर्धास्त बसलेला असतो. पण जिथे इतकी चॅनल्स आहे..माहितीचा स्फोट झालेला आहे तिथे तुम्हाला टिकून रहाण्यासाठी झगडा हाच उद्दीष्ट आहे. नवीन चाली बांधताना गाण्याच्या कॉम्पोझिशनमध्ये बदल झाला..उदाहरण दिले ते हा माझा मार्ग एकला..चे....लांब शांत.अनेक हरकती असेलेले हे धृवपद. 
हळू हळू वेळ कमी झाला. वेळेचा विचारच बदलला. मग गाण्याच्या फ्रेजेस छोट्या व्हायला लागल्या. 

तस्वीर तेरे मनमे..ह्या ध्रुवपदात पाच स्वरवाक्य आहेत. 

आता काय झालंय. मला हॅमर करायला वेळ नाही..नंतर पुन्हा माझे गाणे लागेल याची खात्री नाही.. मग स्वरवाक्य. छोटी व्हायला लागली..रिपिट व्हायला लागली. दिल है छोटासा..असे दिल सारखे छोटेसे स्वरवाक्य. मग काय करा रिपिट करा.हे चार वेळा रिरिट केल्यावर तुम्ही विसरणार नाही ही माझा खात्री आहे.
याचा परिणाम काय झाला. तुम्ही सिझनचा पहिला आंबा खाल्लात तर तुम्हाला आनंद मिळतो..दुसरा आंबा खाल्ला तर आनंद मिळतो..पण महिल्याच्या तुलनेत कमी. मग भरमसाठ आंबे खाले्ले त्याच दिवशी तर एक वेळ अशी येते की नको आता आंवा..अशी वेळ येते.मार्जीनल युटिलिटी कमी कमी होत जाते. गाणी टिकाव धरत नाही याचे कारण हेच आहे..की एकाच गाण्यात छोटी छोटी स्वरवाक्य रिपिट होताना ऐकलीत. त्याचा कंटाळा तुम्हाला लवकरच येणार आहे. 


व्यासपिठच नाही.. 
यात चांगली गाणी होत नाहीत का तर भरपूर होताहेत. तुमच्यापर्यंत पोहोचताहेत का ..तर नाही पोहचत. का नाही पोहचत आहेत..कारण व्यासपिठच नाही.
 काय होतं..गाणं करायचा खर्च जो एकोणीसशे ऐंशी साली पस्तीस चाळीस हजारात व्हायचा त्याता आज खर्च आहे आठ लाख रुपये. पण लोक ऐकणारे कमी झालेत ऐकणारे. कारण घरी तुम्हाला फुकट मनोरंजन मिळतं. चोविस तास कार्यक्रम सुरु आहेत. लोक कार्यक्रमांना आले तरी मोबाईल सुरु असतात. त्य़ामुळे रसिकांची एकाग्रता मिळणे हेच आता कठीण होऊन बसले आहे. म्हणून मागच्या पिढी पर्यंत रसिकांना रसिक मायबाप म्हणतात ना..आज हे म्हणणं मला जिवावर येते..कारण समोरचा रसिक मायबाप व्हाटसॅप घेऊन बसलेला असतो.



 एकाग्र रसिक मिळणे आता अवघड

कारागिरापासून कलाकार होण्याची प्रक्रिया जेव्हढी खडतर आहे तितकाच श्रोत्यांपासून रसिकतेचा पर्यंतचा प्रवास खडतर आहे. रसिक तुम्हाला आता सहजासहजी मिळणार नाही. रसिकांनी खरे मायबाप होण्याची जबाबदारी घ्यावी असा अट्टाहास आमच्या पिढीचा तरी नाही.मी आजपर्य़त एकही गाणं रिमिक्स केले नाही तरी मी रसिकांची बाजू मांडतोय हे लक्षात घ्या. टिकून रहाण्याची धडपड ती सर्वांत अग्रगण्य आहे. त्यामुळेे छोट्या स्वरवाक्यांवर हूक लाईनचं तंत्र आलं.. एकच शब्द..एक ओळ पुन्हा पुन्हा म्हणायची..ते एका शब्दावर आलंय..उदाहरण म्हणून माऊली..माऊली..माऊली.. झिंग झिंग झिंगाट.. ढिपाली ढिपांग..परवर दिगार परवर दिगार.. हुक लाईनचं तंत्र अवलंबिणारी गाणी चालतात. कारण हिच गाणी सत्यनारायणाच्या मंडपात लागतात. हिच गाणी मोठया इव्हेंटमध्ये घेतात..सारेगमप मध्येही तिच गाणी लागतात.


 भावसंगीताची परंपरा खंडित होणे हे समाजालाही अपायकारक

मित्र दोन प्रकारचे असतात..एक खूप विनोद सांगतो, आवाज करतो..धमाल करतो..आणि दुसरा
मित्र असा लागतो..की ज्यांच्या ह्दयावर डोके ठेऊन .ये ह्दयीचे सांगावेसे वाटले पाहिजे..गाणी पण अशीच लागतात.. त्यामुळे भावगीताची परंपरा खंडीत न होणं हे फक्त संगीताला अपायकारक नाही आहे..ते समाजालापण अपायकारक आहे.

 ती गरज आहे..तुमच्या भाषेतली गाणी, तुमच्या आत्ताच्या परिस्थिताली, तुमच्या सामाजिक पर्यावरणातली गाणी तुमच्यापर्यत पोहोचणे ही जशी कलाकारांची गरज आहे तशी श्रोत्यांची गरज आहे..नाहीतर पुढची पिढी रूक्ष होत जाईल.



-सुभाष इनामदा, पुणे
- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276