पुन्हा एकदा नाटकावरुन चित्रपट तयार करुन केदार शिंदे चित्ररसिकांना वेगळ्याच अनुभूतीची करामत पडद्यावर दाखविणार आहे.
१९९८ साली `श्रीमंत दामोदरपंत` हे नाटक गाजले ते वेगळ्याच पध्दतीने..त्याच्या सीडीची प्रचंड विक्री झाली. केदारच्या यानाटकाच्या सीडी भराभर घरोघरी दिसायला लागल्या ..नाटकानेही लेकप्रियतेचे नवे उच्चांक प्रस्थापित केले. ...आता मात्र केदार शिंदे यांनी ओंकार मंगेश दत्त यांच्याकड़ून आपल्या या नाटकाचे विस्तारलेले रुप आकारात आणत पुन्हा एकदा नाटक विसरुन याचा चित्रपट तयार केला आहे.
अतिशय गंभीरपणे हा चित्रपट तयार केला आहे..मला खात्री आहे..ज्यांनी नाटक पाहिले आहे आणि ज्यांनी पाहिले नाही अशा सा-यांना श्रीमंत दामोदरपंत नक्की आनंद देईल...यात कोणताही उपदेश वा काही सांगण्याचा प्रयत्न केला नाही..केवळ अनेक समस्यांनी ग्रासलेल्या मध्यमवर्गींयांन दोन तास करमणूक देणे एवढाच उद्देश ठेऊन चित्रपट बनविल्याचे केदार शिंदे सांगतात.
माहेरची साडी...सारख्या हमखास स्त्रीयांच्या डोळ्यातून अश्रू काढणा-या भावनाशिल चित्रपटांची नायिका म्हणून ...अलका कुबल ....यांची प्रतिमा बदलण्याचे काम या चित्रपटाने केले आहे..त्या सुध्दा या चित्रपटातून आपल्या नव्या भूमिकेचा रसिक कसा आस्वाद घेत आहात हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
याचे सारे श्रेय त्या केदार शिंदे यांना देतात..त्यांच्या दिग्दर्शनाचे कौतूकही करतात..आणि सांगातात.....`केदार शिंदे यांना टायमिंग सेन्स आणि बिटवीन द लाईन्स वाचायची खूप चांगला समज आहे. त्यांच्यातला मास्तर ते नेमके अचूक हेरतो..`
रंगमंचावर जे शक्य होत नाही ते अशा सिनेमातून दाखविता येतं...आणि काळानुरुप बदल करून ती कलाकृती सादर करता येते..केदार याबाबतीत चांगली संकल्पना राबवित आहे. नाटाकाला सिनेमाच रुप देऊन ती कलाकृती अजरामर करण्याची केदारची संकल्पना भरताला खूप आवडली..यामुळे भावीपीढीला इतिहास समजेल.
श्रीमंत दामोदरपंत २६ जुलै पासून प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने पुण्यात कलाकारांच्या उपस्थितीत केदार शिंदे यांना पत्रकार परिषद घेऊन आपल्या चित्रपटाबाबत माहिती दिली..
`कॉट्सटाऊन पिक्चर्स`..च्या बॅनरखाली तयार झालेल्या चित्रपटात विजय चव्हाण , भरत जाधव, अलका कुबस, पियुष रानडे, चेत्राली गुप्ते, मृणास दुसानील, अभिनय सावंत आणि खास खलनायक शोभावा असा सुनिल बर्वे यांच्या भुमिका आहे.
वैशाली सामंत आणि कमलेश भडकमकर यांनी संगीत देलेल्या चित्रपटाचे छायालेखन संजय मेमाणे अनिल कचके यांनी केले असून खरोखरी श्रीमंतीपट वाटावा असा देखावा दिसून हिंदीच्या तोडीचे सेट वापरून चित्रपट नटविला आहे.
सध्या प्रमोशनचा धुमधडाका सुरु असून काही दिवसातच त्याचा परिणाम चित्रपटगृहात दिसून येईल. केदार शिंदे हे यापुढेही जुन्या गाजलेल्या नाटकावरून चित्रपट बनविण्याच्या कामात व्यस्त रहाणार हे आता नक्की झाले आहे.
-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276