Saturday, October 18, 2025

ज्याचा त्याचा विठ्ठल..भारावणारी कलाकृती..!

 



आज १८ ऑक्टोबर २५ ..

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह..

रूपक निर्मित..

मधुराणी गोखले.. अमित वझे आणि  गजानन परांजपे यांनी डॉ. समीर वसंत  कुलकर्णी यांनी  वारी विठुराराच्या वारीतून नेमका विठ्ठल कसा अनुभवायला मिळतो ते अतिशय आध्यात्मिक पातळीवर लिहिलेल्या प्रयोगाचा साक्षात्कार घेतला..

दिग्दर्शक..अमित वझे यांनी त्यातली तरलता..

संगीत.. प्रकाश.. आणि मोजकेच पण परिणामकारक नेपथ्य मंचावर उभे करून अतिशय गांभीर्याने तो प्रयोग रसिकांना मोहित करणारा सादर केला..

यातल्या अभंग रचना.. ज्या उत्कटतेने पार्थ उमराणी आणि अंजली मराठे गातात..त्यातून त्याची परिणामकारकता अधिक वाढत जाते..

परदेशात झालेल्या रक्तरंजित घटनेचा परिणाम झालेल्या महिलेच्या आयुष्यात वारीत सहभागी होऊन जो आत्मिक आनंद मिळाला..त्यातून जगण्याचे बळ कसे मिळत गेले.. याची कथा डॉक्टर  कुलकर्णी यांनी वारीच्या दिंडीत नेहमी सहभागी होणारे बुवा..यांच्या नेमक्या ..आणि सहज विचारून मनातला गोंधळ कमी होऊन आपल्याच आयुष्यात असा अनुभव का येतो..याची मनातली शंका..वारीतील  घटना आणि त्यात येणारे प्रसंग ..यातून तिला अनेक गोष्टी कळत गेल्या...!

इथे अभिवाचन असले..तरीही त्यात अभिनयाचा आविष्कार तेव्हढ्याच तयारीने मधुराणी, गजानन परांजपे आणि समीर बनलेले अमित वझे आपल्या कसदार सादरकरणाने प्रेक्षकांना बांधून ठेवतात..

पार्थ उमराणी..आणि अंजली मराठे..या दोन्ही गायकांनी त्यातली गंभीरता.. भाव..आणि अर्थ याला उत्तम समजून सादर केलेले संगीत गायन प्रयोगाला अधिक समृद्ध करत जाते..





मधुराणी त्यात हळूहळू  गुंतत जाऊन..पुढे त्यातीलच एक कशी होते..हे प्रत्यक्ष अनुभवल्या  शिवाय कळणार नाही..

बाबा..आणि बुवा..यांच्या साध्या पण सोप्या भाषेत गजानन परांजपे ज्या सहजतेने विठ्ठलाचे  स्वरूप विस्तारून वर्णन करतात..त्याचीही अनुभूती घ्यायला हवी..

समीर ..एक जिवाभावाचा मित्र..  आणि आयुष्यात पुन्हा उभा  करण्याचा प्रयत्न करणारा.. अमित वझे उभा करतात..

आणि ती सौदामिनी.. जिने आपल्या अमेरिकेतील त्या रक्तरंजित घटनेमुळे आत्मघात करण्याचा प्रयत्न करणारी..पण नंतर त्यातून सावरण्यासाठी 

भारतात  येऊन वारीचा प्रवास नाईलाजाने  सुरू करणारी ही सौदामिनी..समीर आणि बाबांच्या सल्ल्यानुसार वारीत प्रवास करते..एकेक अनुभव घेते आणि त्या विठ्ठलाच्या छायेत  गुंतून जाते..

मधुराणी गोखले यांचा सौदामिनीचा सारा प्रवास अतिशय सुंदर ..आणि सहज ..अभिनयाचे आगळे भूमिकेचे पदर पाहण्यात खरा आनंद मिळतो..



पडद्या मागे काम करणारे ..प्रतीक गुरव ( ध्वनी),  सुजय भडकमकर, आदित्य देशपांडे ( प्रकाश),

नेपथ्य श्याम भुतकर , वेशभूषा..मानसी वझे, 

संगीत.. निनाद सोलापूरकर, जयदीप वैद्य.. साऱ्यांनी उत्तम साथ दिली होती.


शिवाय मिलिंद मुळीक यांनी आपल्या चित्रातून उभी केलेली विलक्षण वारीची परंपरा..आणि त्यातला अनुभव मंचावर साकारून वातावरण भारून टाकतो..

डॉ. समीर कुलकर्णी..यांची लेखनात असलेली संवेदनशील शक्ती रसिकांना मोहित करते..


मध्यंतर नसलेला सलग दोन तासांचा हा अनुभव ज्याने त्याने  एकदा तरी घ्यावा हे आवर्जून आग्रहाने सांगावेसे वाटते..

- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com 

No comments: