Wednesday, January 25, 2012

सुरांची संगत



सूर मुळातच प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. अगदी जन्मापासून. जन्माचे वेळीही त्याचा टाहो ऐकायला यावाच लागतो. मुलाची आर्तता त्याच्या पहिल्या रडण्यातूनच बाहर येते

आई मुलांना शब्दाचे ज्ञान देते. शब्द तयार होतात तेही स्वर आणि व्यंजनातून. एकत्रित स्वराचा समुच्चय म्हणजे शब्द. नादाच्या विविध लहरीतून शब्दाची उत्पत्ती होते.

हळ हळू तो गाणी बोबड्या शब्दातून गाऊ लागतो. आईच्या तालावर ठेका धरून त्याला लय समजते. लयींची आवर्तने वाढली की वाक्यांची उच्चारणी सुरु होते.

शब्दांनीच गुंफलेल्या संवादाला सूरांची संगत-सोबत वातावरणातून मिळते. पक्षी-प्राणी-निसर्ग, नदी-नाले सारेच खळाळणारे आणि नादविणारे स्वर अवकाशात पसरवत असतात. हा निसर्गनादच सूरांची गुंफण करतो.

मोठेपणी मग मनात गाण्यांची, त्या सूरांची आळवणी सुरु होते. आजुबाजूच्या गोंगाटातही त्याला सूर सापडतो.
स्पतरंगी सूरांच्या नादमयतेतून निर्माण झालेली गाणी त्याला आपलीशी वाटतात. तो सहज सूरांकडे आकर्षीत होतो.
आकाशवाणी-दूरदर्शनच्या कार्यक्रमातून तो सूर-शब्दातले संगीत साठवतो. त्याला ती आपल्या स्वराशी जवळची वाटतात.
सूरांचा भुकेला माणूस आयुष्याच्या अखरपर्य़त सूरांशी समरस झालेला आढळतो.

सूर-शब्द आणि स्वरांशी त्याचे नाते अखेरच्या श्वासापर्य़त आबाधीत राहाते.

माणसाच्या आयुष्यात सूरांचे सामर्थ्य़ अबाधीत आहे. सूरांना स्वतःचे स्वत्व नसते.
ते उमलतात, फुलतात आणि हेलावतात देखिल...



सुभाष इनामदार,पुणे

Tuesday, January 24, 2012

स्वातंत्र्याचा झेंडा मिरवत आम्ही आता जयघोष करणार


स्वातंत्र्याचा झेंडा मिरवत आम्ही आता जयघोष करणार
भान नाही याचे की कुणी आमचाच बांधव देशासाटी लढतोय
गाण्यातून निनादणारा तो आवाज त्याच्यापर्यंत पोचेल काय
त्याच्या देशप्रेमाच्या वेदना तुमच्या-आमच्यापर्यंत पोचतील काय

वाटेल कधी खंत कुणाला
आम्हीही पारतंत्र्यात आहोत
राजकारणात खूर्चीत बसलेत
त्यांना आहे भान आमचे..
की नुसतेच मिरवतात तिथे
जगतात मस्त...

महागाईचा क्रुर काळ
जिवंतपणी मरणप्राय यातना देतोय आम्हाला
जाणीव आहे का त्यांना..
जरा ओरडून सांगा त्यांना
नाईलाज म्हणून आम्ही स्पर्धत धावतोय
जेव्हा देह फुटून त्याची लक्तरे वेशीवर येतील
ओळखेल का तुला तो..
हा आपला मतदार होता...

चला जागवूया एकच नारा
सारा भारत हमारा....





सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com

आशा-निराशेचा खेळ हे आयुष्य




वाटेकडे डोळे लावले
आशेने पहात आलो
निराशाच हाती लागली
मोठ्या धाडसाने काही नवे
थोडे वेगळे करायला
बळ एकत्र केले....
ऐनवेळी मांजर आडवे आले
आशा-निराशेचा खेळ हे आयुष्य
जिद्द साठवताना थोडी अवहेलना
तीही सहन केली
पण अखेरीस...
कधी होणार माझ्या मनासारखे...
एकच प्रश्न मी स्वतःला विचारत
दाही दिशांतून आगदी आगतीकतेने
विचारतो आहे......
रे विधात्या....हे भगवंता...



सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276