
सूर मुळातच प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. अगदी जन्मापासून. जन्माचे वेळीही त्याचा टाहो ऐकायला यावाच लागतो. मुलाची आर्तता त्याच्या पहिल्या रडण्यातूनच बाहर येते
आई मुलांना शब्दाचे ज्ञान देते. शब्द तयार होतात तेही स्वर आणि व्यंजनातून. एकत्रित स्वराचा समुच्चय म्हणजे शब्द. नादाच्या विविध लहरीतून शब्दाची उत्पत्ती होते.
हळ हळू तो गाणी बोबड्या शब्दातून गाऊ लागतो. आईच्या तालावर ठेका धरून त्याला लय समजते. लयींची आवर्तने वाढली की वाक्यांची उच्चारणी सुरु होते.
शब्दांनीच गुंफलेल्या संवादाला सूरांची संगत-सोबत वातावरणातून मिळते. पक्षी-प्राणी-निसर्ग, नदी-नाले सारेच खळाळणारे आणि नादविणारे स्वर अवकाशात पसरवत असतात. हा निसर्गनादच सूरांची गुंफण करतो.
मोठेपणी मग मनात गाण्यांची, त्या सूरांची आळवणी सुरु होते. आजुबाजूच्या गोंगाटातही त्याला सूर सापडतो.
स्पतरंगी सूरांच्या नादमयतेतून निर्माण झालेली गाणी त्याला आपलीशी वाटतात. तो सहज सूरांकडे आकर्षीत होतो.
आकाशवाणी-दूरदर्शनच्या कार्यक्रमातून तो सूर-शब्दातले संगीत साठवतो. त्याला ती आपल्या स्वराशी जवळची वाटतात.
सूरांचा भुकेला माणूस आयुष्याच्या अखरपर्य़त सूरांशी समरस झालेला आढळतो.
सूर-शब्द आणि स्वरांशी त्याचे नाते अखेरच्या श्वासापर्य़त आबाधीत राहाते.
माणसाच्या आयुष्यात सूरांचे सामर्थ्य़ अबाधीत आहे. सूरांना स्वतःचे स्वत्व नसते.
ते उमलतात, फुलतात आणि हेलावतात देखिल...
सुभाष इनामदार,पुणे
No comments:
Post a Comment