Wednesday, August 31, 2016

रसिकहो नमस्कार...मी आनंद देशमुख आपले स्वागत करीत आहे



सवाई गंधर्व सोहळ्याच्या व्यासपिठानजीकच्या खास बनविलेल्या निवेदकाच्या माईकमधून पंचवीस वर्षापूर्वी एक भारदस्त पण तेवढाचे भावनिक आवाज घुमला..
 रसिकहो..नमस्कार...

आज त्या निवेदकांच्या निवेदन क्षेत्रातल्या या कारकीर्दीचा सलाम करण्यासाठी त्यांच्यातल्या त्या रसिकतेला दाद देण्यासाठी आणि साध्या सोप्या पण जामखेडला लहानपण गेले तरी पुणेरी स्पष्ट भाषा ज्यांच्या वाणीतून बोलली जाते..ते आनंद देशमुख...त्यांना भाउसाहेब पाटणकरांच्या नावाने दिला जाणारा जिंदादिल पुरस्कार जेव्हा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या व्यासपीठावरून संगीत क्षेत्रातले दिग्गज कलावंत आणि काही दिवसांपूर्वी पुण्यात स्थायिक झालेले पं. उल्हास कशाळकर य़ांच्या हस्ते मंगळवारी ३० ऑगस्टला संध्याकाळी दिला गेला..तेव्हा पुन्हा एक तशीच रसिक-वाचकांची टाळ्यांची दाद मिळाली...





यावेळी व्यासपीठावर त्यांचे कौतुक अनुभवायला..आणि पाठीवर थाप द्यायला होते ते ज्येष्ठ निवेदक  सुधीर गाडगीळ आणि सवाई गंधर्व भिमसेन महोत्सवाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी.

आणि उपस्थितात आकाशवाणीतून बाहेर पडून आपली चौफेर कारकीर्द करणारे कलावंत जयराम कुलकर्णी आणि  हास्यपंचमीचे उद्गाते बंडा जोशी..इतर मान्यवर पुणेकर रसिक- वाचक सभागृहात गर्दी करून एकत्रित झाले होते.. आनंद देशमुख यांच्या मागे खंबीरपणे साथ देणा-या सुविद्य पत्नी सौ. कुंदा देशमुख यांचाही सत्कार कशाळकरांच्या हस्ते इथे केला गेला.





जामखेड सारख्या सहाहजार वस्तीच्या गावात बालपण घालविलेल्या..आनंद उर्फ नंदू ..यांच्या वाणीवर संस्कार झाले..ते आई-वडीलांच्याकडून..वडीलांना द्ष्टी कमी होती..पण ते पेटी उत्तम वाजवत..तर आपल्या वडीलांना  मराठीतल्या कादंब-या मोठ्यांदा वाचून दाखविण्याची कामगिरी नंदूवर आली..त्यामुळे वाचताना ते इतरांना समजेल..आवडेल असे कसे वाचावे याते प्रशिक्षण बालपणीच मिळाले..तिच गोष्ट आईची..श्रावण महिन्यात लिहिता वाचता न येणा-या आईला..कहाण्यावाचून दाखवायच्या तेही तिच्या मैत्रीणींच्या समूहाला..त्यामुळे कहाण्यातले ते आटपाट नगर तोडपाठ झाले..पण बोलण्यातली खुबी..वाचनातली  गंमत मनवर बिंबत गेली..त्या सा-याच्या उपयोग आपल्या निवेदनात झाल्याचे ते सांगतात..



निवेदनाविषयी काही मूलभूत गोष्टी त्यानी आपल्या मनोगतात सांगितल्या...त्या म्ङणजे...तिथे मंचावर तुमची अलंकारिक शैली..उगाचच कवीतांचा ..इतर दृष्टांताचा उल्लेख टाळणे...रसिकांना त्यांच्यातला एक वाटेल असे सोपे पण प्रवाही सांगणे..वाक्यातले चढउतार, उद्गार, स्वल्पविराम सारेच न सांगता कळायला हवेत...

आणि सर्वात महत्वाचा मंत्र जो भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी सवाईत दिला..तो म्हणजे..देशमुख  तुम्ही चांगले बोलताय आणि कमी बोलताय....हे उत्तम...

निवेदनाच्या कारकीर्दीत आकाशवाणीचा अनुभव खूप मिळाल्याचे ते नमूद करतात..कलावंताकडून योग्य ती माहिती काढण्याचा सराव झाला..ती योग्य वेळी आणि अचूक शब्दातून रसिकांपर्य़त पोहचविण्याचे कसब त्यांनी आपल्या निवेदनातून पुढच्या निवेदकांच्या पिढीला सांगितले..


तुम्ही कमी बोलता..तेही योग्य...तुमच्या निवेदनाचा मीही चाहता असल्याचे सांगत सुधीर गाडगीळ यांनी आपल्या क्षेत्रात आनंद देशमुख करीत असलेल्या कार्याची पुणेरी पोचही आपल्या भाषणातून व्यक्त केली.. त्यांनी संगीत क्षेत्रात आनंदने भक्कम तयारीनिशी आपले स्थान पक्के केल्याचेही ते म्हणाले.



पं. उल्हास कशाळकर यांनी देशमुख यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या..


रंगत-संगत प्रतिष्ठानचे प्रमोद आडकर आणि श्यामची आई फाऊंडेशनचे भरत देसरडा 
यांच्या संयुक्त सहकार्याने पुण्याताल हा सोहळा श्रवणीय झाल्याचे समाधान 
उपस्थितांच्या चेह-यावरून दिसत होते..



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276