Tuesday, June 17, 2014

गरजा कमी करा समाधान लाभेल..श्री टेब्ये स्वामी

 
माणगावच्या टेंब्ये स्वामीं महाराज यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट संपूर्ण राज्यात २७ जून रोजी प्रदर्शित होत असल्याचे दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी पुण्यात नुकतीच एका पत्रकार परिषदेत दिली.


२८ जुनला त्यांच्या निर्वाणाला शंबर वर्ष पूरी होत आहेत...बरोबर एक दिवस आगोदर हा चित्रपट सर्वत्र पदर्शित होत आहे..हा ही एक योग आहे. तुम्ही गरजा कमी करा समाधान आपोआपच लाभेल..असे सांगणारे त्यांचे विचार आजच्या काळातही तेवढेच उपयुक्त असल्याचे निर्माते सांगतात.


श्री योगी चित्रपटातून कुठल्याही प्रकारचे चमत्काराचे क्षणचित्रे नाहीत. १८५६ ते १९१३ या काळात टेंबे स्वामींच्या खडतर जीवनाचा प्रवास व खडतर जीवनाला कसे सामोरे गेले आहेत या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. आजच्या तरुणाईला अशा चित्रपटाची गरज असून त्यांनीही कुठल्याही प्रसंगाला, समस्याला लगेच हतबल न होता श्रद्धा, भक्तिभावाने अडचणीच्या वेळी कार्यक्षम असणे गरजेचे आहे असा बोध चित्रपटातून घेणे गरजेचे असल्याचेही दिग्दर्शक आवर्जुन सांगतात.
चमत्काराद्वारे नमस्कार करायला लावणारे खूप आहेत. पण चमत्कारापेक्षा संत साहित्याद्वारे जनतेला संतत्वाची प्रचिती देणारे फार कमीअशांमध्ये टेंब्ये स्वामी महाराज हे नाव अग्रगण्य मानलं जातं. याति वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये असं नाव असलेले हे महात्मे त्यांच्या शिष्यगणांमध्ये टेंब्ये महाराज स्वामीया नावाने प्रचलित आहेत. दत्त सांप्रदायाचे पायिक असलेले तळ कोकणातील सावंतवाडी माणगाव येथे जन्माला आलेल्या टेंब्ये स्वामी महाराजांची महती वर्णन करणारा श्री योगीहा चित्रपट खर्‍या अर्थाने आजच्या युगातील तरुणांसाठी आदर्शवत ठरवा असा आहे. कारण टेंब्ये स्वामींनीच मूळात आपल्या जीवनकार्यात चमत्कारांना कधीच थारा दिला नाही. 

संत साहित्याच्या अभ्यासाद्वारे जगाला दैवी शक्तीची अनुभूती करुन देणे हा जणू टेंब्येस्वामी महाराजांचा मूळ मंत्र असल्याने त्यांनी केवळ संत साहित्याच्या निर्मिती आणि प्रसारावरच कायम भर दिला. स्वामी दत्तात्रयांना प्रिय असलेला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’…,हा मंत्रसुध्दा टेंब्ये स्वामी महाराजांच्या साहित्यवाणीतून आकाराला आलेला.

माय माऊली निर्मितीच्या बॅनरखाली तयार होणार्‍या श्री योगीचे निर्माते आहेत माऊली (उत्तम) मयेकर. दिग्दर्शक चंद्रकांत लता गायकवाड यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणार्‍या या चित्रपटात एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले टेंब्ये स्वामी महाराज आपल्या तल्लख बुद्धीमत्तेच्या आणि दत्तात्रयांवर असलेल्या निस्सिम श्रद्धेच्या बळावर प्रपंच आणि परमार्थाची अचूक सांगड घालून योगीपदापर्यंत कसे पोहोचले याचं चित्रण या चित्रपटात पहायला मिळणार आहे. टेंब्येस्वामी महाराजांच्या जीवनात चमत्काराला थारा नसल्याने अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा एकही प्रसंग या चित्रपटात नाही. रसिकांचे हात जुळतील ते केवळ आणि केवळ श्रध्देपोटीच.

अभिनेता आनंदा कारेकर टेंब्ये स्वामी महाराजांची भूमिका साकारत असून त्याच्यासोबत रविंद्र महाजनी, अरुण नलावडे, गिरीश परदेशी, शर्वरी लोहकरे, यतीन कार्येकर, उदय टिकेकर, उमा सरदेशमुख, अभिजीत चव्हाण, किशोर चौगुले, डॉ. विलास उजवणे, अमोल बावडेकर, नारायण जाधव, आसित रेडिज, तृप्ती गायकवाड यांसारख्या मराठीतील आघाडीच्या कलाकारांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 



श्री योगीचे पटकथा-संवाद प्रविण दवणे आणि चंद्रकांत लता गायकवाड यांनी लिहिले आहेत. प्रविण दवणेंच्या गीतरचनांना नंदू होनप यांनी संगीत दिलं असून पार्श्वसंगीत सोहम पाठक यांचं आहे. सुरेश वाडकर, रविंद्र साठे, अजीतकुमार कडकडे आणि वैशाली सामंत या मराठीतील नामवंत गायकांच्या आवाजात श्री योगीच्या गीतरचना स्वरबद्ध करण्यात आल्या आहेत. सुमित पाठक कलादिग्दर्शक असून दिनेश सटाणकर हे छायालेखक आहेत. भाऊसाहेब लोखंडे हे संकलनाची जबाबदारी सांभाळत आहेत .


Monday, June 16, 2014

व्हायोलीनमधून स्वरांचा सदाबहार नजराणा



यंदा शंकर जयकिशन

जून १७ च्या जागतिक व्हायोलीन दिवसानिमित्ताने पुण्यातल्या `व्हिओलिना` या चार व्हायोलीन
वादकांनी सुरु केलेल्या उपक्रमात यंदा शंकर जयकिशन यांच्या कारकीर्दीतल्या वीस गीतांना रसिकांच्या मनात रुजी घालणा-या सदाबहार गीतांना पुणेकरांच्या साक्षीने सादर करुन टाळ्य़ा आणि वहावाचा  पाऊस पाडला..सलग आठ वर्षे ही कलावंत मंडळी एकत्रीतपणे दरवर्षी व्हायोलीन दिवस साजरा करतात..दरवर्षी नवी थीम घेऊन व्हायोलीनमधून अनेकविध स्वरांचा सदाबहार नजराणा देतात..

चारुशीला गोसावी, अभय आगाशे, निलिमा राडकर आणि संजय चांदेकर यांनी सादर केलेल्या गीतांना उत्तम वाद्यमेळाच्या संगीतीने सुरेलपणाने सादर केले.


वैशाली जुनरे यांनी निवेदनातून शंकर जयकिशन यांची कारकीर्द सांगताना त्यांच्या महत्वाच्या चित्रपटांचीही दखल घेतली. मनोज चांदेकर, अविनाश आणि विनित तिकोनकर यांनी तबला-ढोलक आणि रिदमची साथ केली. दर्शना जोग यांनी सिंथेसायझवर गीतामधला भरणा विविध वाद्यांच्या संगतीत सादर करुन..भारलेले वातावरण तयार केले.अनुजा आगाशे आणि ओंकार चांदेकर यांनीही वाद्यांचा मेळ ऐकत रहावे असा मांडला.
`जिस देशमे गंगा बहती है`च्या शिर्षक गीताने सुरवात करुन `बरसात`च्या गीताने एकापेक्षा एक गीतांना रसिकांसमोर सादर केले.


ओ बसंती.याद न आए, रसिक बलमा, एहसान होगा तेरा, वो चाॅंद खिला, अकेले एकेले कहॅां जा रहे हो, पंछी बनू, पान खाए सैय्या हमारे, परदेमे रहने दो, जिया बोकरार है  असी किती नावे सांगू..सुमारे २० गीतांतून शंकर जयकिशन यांच्या सुरावटीचा मोहमयी सुरल प्रवास सादर करुन पुन्हा त्या गीतांना व्हायोलीनच्या स्वरातून जीवंत केले




रसिकांच्या पसंतीला पुरेपूर उतरतील अशी एकसे बढकर एक सुरेल गीते रसिकांना पुन्हा ऐकावीशी वाटत होती...पण वन्समोअरचा आग्रह टाळण्याचे भान निवेदिकरेने केल्याने कार्यक्रम किती आवडतो याची जाणीव कलावंतांनो होत होती...









अर्थात विनामूल्य कार्यक्रमाला असाच प्रतिसाद लाभतो..त्यातही आवडीची गीणी असल्यानंतर काही विचारूच नका..तेच प्रेक्षक तिकीट लावून कार्यक्रम केला तर त्याकडे पाठ फिरवितात ही वस्तुस्थितीही नाकारून चालत नाही...असो.





रसिकांची पसंती इतकी की सारे प्रेक्षागृह अपुरे पडावे...पुन्हा पुन्हा ऐकावी अशी अवीट गोडीची गाणी ऐकायला केवळ एका जाहिरातीवर पुणेकर सभागृह अपुरे पाडले..हिच याची पावती..










- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276