यंदा शंकर जयकिशन
जून १७ च्या जागतिक व्हायोलीन दिवसानिमित्ताने पुण्यातल्या `व्हिओलिना` या चार व्हायोलीन
वादकांनी सुरु केलेल्या उपक्रमात यंदा शंकर जयकिशन यांच्या कारकीर्दीतल्या वीस गीतांना रसिकांच्या मनात रुजी घालणा-या सदाबहार गीतांना पुणेकरांच्या साक्षीने सादर करुन टाळ्य़ा आणि वहावाचा पाऊस पाडला..सलग आठ वर्षे ही कलावंत मंडळी एकत्रीतपणे दरवर्षी व्हायोलीन दिवस साजरा करतात..दरवर्षी नवी थीम घेऊन व्हायोलीनमधून अनेकविध स्वरांचा सदाबहार नजराणा देतात..
चारुशीला गोसावी, अभय आगाशे, निलिमा राडकर आणि संजय चांदेकर यांनी सादर केलेल्या गीतांना उत्तम वाद्यमेळाच्या संगीतीने सुरेलपणाने सादर केले.
वैशाली जुनरे यांनी निवेदनातून शंकर जयकिशन यांची कारकीर्द सांगताना त्यांच्या महत्वाच्या चित्रपटांचीही दखल घेतली. मनोज चांदेकर, अविनाश आणि विनित तिकोनकर यांनी तबला-ढोलक आणि रिदमची साथ केली. दर्शना जोग यांनी सिंथेसायझवर गीतामधला भरणा विविध वाद्यांच्या संगतीत सादर करुन..भारलेले वातावरण तयार केले.अनुजा आगाशे आणि ओंकार चांदेकर यांनीही वाद्यांचा मेळ ऐकत रहावे असा मांडला.
`जिस देशमे गंगा बहती है`च्या शिर्षक गीताने सुरवात करुन `बरसात`च्या गीताने एकापेक्षा एक गीतांना रसिकांसमोर सादर केले.
ओ बसंती.याद न आए, रसिक बलमा, एहसान होगा तेरा, वो चाॅंद खिला, अकेले एकेले कहॅां जा रहे हो, पंछी बनू, पान खाए सैय्या हमारे, परदेमे रहने दो, जिया बोकरार है असी किती नावे सांगू..सुमारे २० गीतांतून शंकर जयकिशन यांच्या सुरावटीचा मोहमयी सुरल प्रवास सादर करुन पुन्हा त्या गीतांना व्हायोलीनच्या स्वरातून जीवंत केले
रसिकांच्या पसंतीला पुरेपूर उतरतील अशी एकसे बढकर एक सुरेल गीते रसिकांना पुन्हा ऐकावीशी वाटत होती...पण वन्समोअरचा आग्रह टाळण्याचे भान निवेदिकरेने केल्याने कार्यक्रम किती आवडतो याची जाणीव कलावंतांनो होत होती...
अर्थात विनामूल्य कार्यक्रमाला असाच प्रतिसाद लाभतो..त्यातही आवडीची गीणी असल्यानंतर काही विचारूच नका..तेच प्रेक्षक तिकीट लावून कार्यक्रम केला तर त्याकडे पाठ फिरवितात ही वस्तुस्थितीही नाकारून चालत नाही...असो.
रसिकांची पसंती इतकी की सारे प्रेक्षागृह अपुरे पडावे...पुन्हा पुन्हा ऐकावी अशी अवीट गोडीची गाणी ऐकायला केवळ एका जाहिरातीवर पुणेकर सभागृह अपुरे पाडले..हिच याची पावती..
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
No comments:
Post a Comment