Monday, December 3, 2018

मेहनत, ध्यास, निष्ठा कमी होत आहे- अशोक पत्की




स्वर ताल साधनाचा रौप्यमहोत्सव साजरा




असा कार्यक्रम  सहजासहजी हल्ली तरी  बघायला मिळत नाही. त्याच्यामागची मेहनत , ध्यास, निष्ठा हल्ली गायब झाल्यासारखे झाले आहे. कारण सगळे सहज उपलब्ध झाले आहे. रेडिमेड संगीत झाले आहे. पूर्वी एखादे गाणे करायला तीन चार दिवस असायचे. विचार असायचा. आता पाच दहा मिनिटात सगळे मिळते. आपण बनविल्याचा आनंद मावळत चाललाय. आज संजयजींची आणि मुलांची मेहनत दिसते. ती सोपेी नाही. संजयजी पंचवीस वर्षे सातत्याने मेहनत करताहेत. त्यांची वाटचाल अशीच चालत राहू देत हिच शुभेच्छा..




संगीतकार अशोक पत्की यांनी आपल्या भाषणात सर्वांचे भरभरून कौतूक केले आणि सर्वच कलावंताना आशीर्वाद दिले.




स्वर ताल साधनाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात केले होते. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनीही व्यासपीठावर संजय करंदीकर यांना शतकी वाटचालीच्या शुभकामना दिल्या.





यावेळी व्यासपीठावर प्रमोद मराठे, अशोक पत्की, संजय करंदीकर यांचे गुरू पं. विवेक जोशी, पं.शौनक अभिषेकी,डॉ. विकास कशाळकर, डॉ. चैतन्य कुंटे आणि स्वर ताल साधनाचे सर्वेसर्वा संजय करंदीकर दिसत होते.





यावेळी कै.माधवराव करंदीकर स्मृती ढोलकी साधक पुरस्कार `कृष्णा मुसळे `यांना  अशोक पत्की आणि संजय करंदीकर यांच्या मातोश्री मंदाकिनी हस्ते या वेळी प्रदान करण्यात आला.





लोकवाद्याचा अभ्यास करण्यासाठी संजय करंदीकर यांना केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्याचे गौरवाने सांगत डॉ. विकास कशाळकर यांनी  इतर तालवाद्याची भाषा तयार करण्याचे काम तुम्ही करा अशी सूचना योवेळी केली. ते काम झाले तर ही वाद्ये शिकण्याची भाषाही होइल आणि तरूण कलावंतांना यातून पदवी घेणे शक्य होईल.
यावेळी डॉ. चैतन्य कुंटे यांच्या हस्ते विद्यालयाच्या वेबसाईटचेही लोकप्रत्यार्पण करण्यात आले.




कार्यक्रमाच्या पूर्वार्धात विद्यार्थ्यांनी आपले वादन विविध वाद्यावरील आपली हुकमत सिद्ध केली.



यात शंख, पखवाज, तबला, संबळ, दिमडी, चौंडक, पंजाबी ढोल, कच्छी ढोल, चंडा, ताशा, टाळ, झांजा, चिपळ्या, घुंगरू खंजिरी, जेंबे, दर्बुका, काहोन, शेकर्स, सिंबल्स, एकतारी, तूणतूणे आदी वाद्यांची प्रात्यक्षिके सादर करून या उभरत्या तालवादकांनी रसिकांची दाद मिळविली.





ही विविध वाद्ये तयारीने वाजविणारे कलाकार उद्याचे भावी कलावंत म्हणून संगीत क्षेत्रात दिसले तर त्यात काहीच नवल नाही.यात रोहित जाधव, पवन अवचरे, नितिन सातव, विनित तिकोनकर, सचिन माईणकर, मुक्ता रास्ते-मालशे, प्रथमेश देवधर, गणेश बोज्जी, अोंकार घाटगे, मयुर जोशी, अवधूत काशिद, सौरभ बिर्जे, निनिद कांबळे,स्वराज वाघोले, अभिनव जोशी यांचा समोवेश होता.
ताल वाद्य कचेरीचा अतिशय विरळा अनुभव यावेळी घेता आला.

या सर्वकलावंताच्या कलेला सार्थ संगतकार दिप्ती कुलकर्णी ( होर्मोनियम)आणि विनायक पोवार ( सांथेसायझर) यांची लाभली. तर त्यात्या वाद्याचा वापर कोणत्या गाण्यात झाले ते दाखविण्यासाठी  अभिजित पंचभाई आणि चित्रा आपटे यांची विविध गीतातून उत्तम साथ लाभली.


कार्यक्रमात उत्तरार्धात पं. शौनक अभिषेकी यांचे बहारदार गायन रसिकांना तृप्त करून गेले.

या सर्व कार्यक्रमाचे अभ्यासू निवेदन मंगेश वाघमारे यांनी करून रसिकांची आणि पाहुण्याची वाहवा मिळविली. कार्यक्रमाची संहिता प्रविण जोशी यांनी लिहली होती..तर सर्व वाद्यांची एतिहासिक महती , परंपरा आणि त्याचा कसा वापर केला जातो याबाबात तपशिलवार मांडणी संजय करंदीकर यांनी केली होती.

आजपर्य़त कित्येक हजार विध्यार्थी या संस्थेमार्फत शिकुन बाहेर पडले. अनेक पुढेही घेत राहतील.
संजय करंदीकर यांची स्वर ताल साधना अशीच अव्याहत सुरु राहिल असा विश्वास वाटतो.






सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com




4 comments:

Sanjay Karandikar said...

सुभाषजी, तुम्हाला खूप धन्यवाद
अतिशय वस्तुनिष्ठ परीक्षण, उत्तम फोटो
संजय करंदीकर

Sanjay Karandikar said...

https://youtu.be/jkdRlqDnu9Y
आपण हे इथेही ऐकू आणि पाहू शकता

Sanjay Karandikar said...

https://youtu.be/jkdRlqDnu9Y

आपण हे इथेही ऐकू आणि पाहू शकता

सुभाष इनामदार...culturalpune.blogspot.com said...

धन्यवाद, आपले कामच तसे दिसले.. खूप शुभकामना