Sunday, February 28, 2016

केरळ- निसर्गाची उधळण..एक साठवण


बारा दिवसाची करेळ स्पेशल सहल सुमारे ५५०० कि.मि. करून २२ जानेवारी १६ ला पुण्यात स्थिरावलो खरे..पण आजुनही तो निरसर्गसंपदा डोळ्यासमोरून जात नाही. पुन्हा एकदा जर कुणी केरळात जाता
का म्हणून सांगितले तर आधी चहाच्या मळ्यांनी सजलेल्या केरळच्या लोकांनी राखलेलेल्या मुन्नारकडे धाव घेईन.

गुरुनाथ ट्रॅव्हल्सच्या उत्तम व्यवस्थापनाच्या संगीतीने बारा दिवस कसे भुरकन निघून गेले कळलेही नाही..त्यातही गरम जेवणाचा आस्वाद..रोज नवा गोड पदार्थ पोटात पडत होता..
खाण्याची मौज घेत पहाटे सारे जण विविध स्थळांकडे निघत होतो.. त्यासाठी पांडुरंग बटावले, कृष्णा भोईर,धोंडू शेडगे आणि उद्याचा व्यवस्थापक संजय जाधव यांची नावे घ्यावी लागतील.
संतोष कोंढाळकर यांच्या मार्गदर्शनाने केरळ अनुभला. कन्याकुमारी गाठली. त्यांचे स्मरण झाले की मन मोहरून उठते.. कोचीन ते त्रिवेंद्रम हा प्रवास करविणारा बसचा चक्रधर महारज साजी याचीही आठवण झाल्याशिवाय रहात नाही.


आजच्या जमान्यात त्यांचे स्मरण ही केवळ मनात नाही तर मोबाईलच्या चौकोनात टिपत सारी दृष्ये पुन्हा अनुभवण्याचे भाग्य आहे..
जे मी अनुभवले ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा हा प्रयत्न ..


https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153558887143172.1073741914.739823171&type=3&pnref=story

भाग दौन.
पहिला भाग पाहिलेल्या कांहीनी फोन करून सांगितले आम्ही केरळला गेलो नाही..पण तिथे गेल्याचा भास तुमचे फोटो पाहून आला..

ये तो छॉॅकी है..पिक्चर अभी बाकी है..

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153561076433172.1073741915.739823171&type=3

भाग -३ मुन्नारच्या वाटेवर..हिरवळीवरून
मुन्नारकडे बस धावत होती तेव्हा सारे डोळे बाहेरच्या हिरवाईकडे खूलून होते. सारा निसर्ग जणू आपल्या दोन डोळ्यात साठविण्याची एकच घाई झाली होती.

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153564725878172.1073741916.739823171&type=3&notif_t=like

भाग.४. ..आणि मुन्नारचा मुक्काम

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153573444623172.1073741917.739823171&type=3

भाग- ५..मुन्नार ते टेक्कडी..निसर्गसहल..
मुन्नार ते टेक्कडीचा हा प्रवास आहे खास दोन थंड हवेची ठिकाणे..पण एक उंचावर..तर दुसरा उतरता होत गेलेला..पण पाणी,मुबलक हिरवीगार जेमीन आणि मसाल्याच्या पदार्थानी फुललेली हिरवीगार डोंगरउतावर बेतली गेलेली शेती.. सारेच निसर्गरम्य..

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153575446408172&type=3&pnref=story

भाग- ६ पेरियार उद्यानाची सफर- विलक्षण

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153579289783172.739823171&type=3
भाग(७)..
खरं तर किती फोटो टाकावेत याचे भान राहिले नाही हे खरे..पण टेक्कडीचे वैशिष्ठ्य सांगताना एक सांगणे आवश्यक आहे..की रस्त्याच्या डाव्या बाजुचे केरळ तर उजवीकडे जाणारा रस्ता म्हणजे तामिळनाटू..ही विभागणीच वेगळी वाटते.. करळ मध्ये पान. तंबाखूला कस्त बंदी..तर तामिळनाडून सारे काही स्रर्रास मिळते..
मात्र खरी मौज आहे..ती शबरीमला आणि पेरियार दोन जागतिक कीर्तीची ठिकाणे इथून अगदी जवळ..म्हणून पर्यटकांची वर्दळ सतत असते..
टेक्कडी ते् आलेप्पी भॅक वॉटरचा हा प्रवास म्हणून अगदी वेगळा..एका बाजुला थंड हवा..तर उतरतीला समुद्र जवळ असणारी गरम ऊबदार गरम हवा..

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153594698283172.1073741925.739823171&type=1

भाग (८)—केरळ—आलेप्पी वॉटर पाण्यावरचा तरंगता प्रवास
आलेप्पी बॅक वॉटरमधली बोट घेतल्या पासून पाण्यावर आम्ही चार तास सुमारे ४० मैल अंतर कापत निघालो..पाण्यावर तरंगत होणार हा प्रवास निसर्गाचे वरदान लाभलेल्या केरळच्या सौंदर्याच्या सा-या खुणा साठविणार हे आता नक्की झाले हेत..ते सारे डोळे भरून पाहिले..मन आणि डोळे ते सारे पाहून समाधानाने भरून पावले..एवढेच मी सांगेन..

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153596836243172&type=1

केरळ.(९)—निसर्गाची सौंदर्यानुभूती
केरळच्या विविध ठिकाणचे सौंदर्य मनाला भुलविते..पुरवाच एक जण सांगत होते..की रेल्वेने जाताना केरळ आला की दुतर्फा दिसणारी नारळाची नवसंपदा..आणि त्याकडे केरळवासींयांनी दिलेले लक्ष मनाला आनंद देते..पण रेल्वेचा प्रवास इतका होतो..की कीति वेळ तेसारे पहात बसणार..डोळे थकून जातात...
हे जरी खरे असले तरी तिथे या परिसरात गेल्यावर तुम्ही निसर्गाच्या अधिन होता हेही तितकेच सत्य आहे..
तेच सत्य दाखविण्याचा मोह मलाही पडलाय..

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153608501508172.1073741931.739823171&type=3&notif_t=like

केरळ (१०)—कन्याकुमारी एक अनुभूती
केरळ पाहण्यातला आनंद घेत घेता तामीळनाडूत कधी दाखल झालो हे कळलेदेखील नाही..खर तर केऱळ संपून तामिळनाडूच्या सीमेत दाखल झालो..ते कळाले नागरकोविल, सुचिंद्रमचा अनुभव घेतल्यावर..मात्र भारताचे दक्षण टोक कन्याकुमारी..जिथे तिन समुद्रांचा एकत्र प्रवाह अथांगता..एवढ्या एका शब्दातच वर्णन करावे लागेल.. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर या तिघांच्या संगमावरील टोक कन्याकुमारी . कन्याकुमारीचं विशेष आकर्षण म्हणजे भर समुद्रात स्वामी विवेकानंद यांनी तपस्या केलेल्या खडकावर उभारलेलं त्यांचं अप्रतिम स्मारक. निसर्ग आणि मानवनिर्मितीच्या अथक प्रयत्नांची वेगळीच सुखद अनुभूती तेथे पाऊल टाकताच येते. स्मारकाचा सर्व परिसर अतिशय संत, स्वच्छ, उदात्त, प्रसन्नस्वामी विवेकानंदांचा साडेसात फूट उंचीचा तेज:पुंज धीरोदात्त पुतळा जणूकाही विश्वबंधुत्व, संतीचा संदेश देत अढळपणे उभा आहे. असं वाटतं समोरच्या एका खडकावर पावलाच्या आकाराचा ठसा उमटला त्यावर पद्ममंडपाची उभारणी केली आहे. हे पार्वतीच पाऊल असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. घंटांचे घणघणते आवाज नसलेल्या पवित्र, शुचिर्भूत वातावरणात एखाद्याला शांतपणे ध्यान करावसं वाटल्यास त्यासाठी येथे खास ध्यानमंडपही बांधण्यात आलेला आहे. विराट सागरामधील हे स्मारक मानवाला निसर्गदेवतेपुढे नतमस्तक व्हायला लावत.
कन्याकुमारीला विवेकानंदपुरम चा सुंदर परिसरही नक्कीच पहावा ..अनुभवा असा आहे..एकनाथजी रानडे यांनी केलेल्या कामाचे यथार्थ दर्शन त्यांच्या चित्रप्रदर्शनीतून होते..तर १०० एकराच्या परिसरात फिरत असेलेले मोरांचेआवाजही..आणि एकनाथजी रानडे..स्वामी विवेकानंद यांची समाधी पाहून सागराच्या या प्रवाहात एका महामानवाने केलेल्या कार्याची प्रचिती येते..


https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153623230958172.739823171&type=3


केरळ (११)-तिरूअनंतपुरम्..अखेरच्या टप्प्यात

केरळ सहलीचा हा अखेरचा टप्पा..म्हणजे त्रिवेंद्रम..अर्थात तिरुअनंतपुरम्..केरळची ही राजधानी..अतिशय प्रसिध्द असे पद्मनाभ मंदिर..तिथले..प्राणीसंग्रहालय..राजा रविवर्मा आर्ट गॅलरी..आणि कोवल्लम बीच...
सारेच प्रेक्षणीय..मनोबल उंचावणारे..शहरातल्या साड्यांचे विलोभनिय दालन..मोठाले रस्ते..वेगवान तशी श्सतबध्द वाहतूक..भव्य विधानभवन..आणि अगदी स्वच्छ असे रेल्वे स्थानक..
तिथूनच पुण्याकडे येण्याचा परतीचा प्रवास घडतो..
ही सहल केवळ विस्मयनीय अशीच होती..
त्यातल्या कांही त्रुटीही पुणेरी पध्दतीने गुरुनाथच्या पुण्याच्या कार्यालयात दप्तरी नोंदविल्या..त्याचे उत्तरही आले..

भरून पावले....पाहू या पुढचा प्रवास कुठे होतो ते..

https://www.facebook.com/subhash.inamdar/media_set?set=a.10153624664613172&type=3&pnref=story


(वाचकहो..या मधल्या लिंक या फेसबुकच्या आहेत..त्या तशाच्या तशा उचलल्या तर तु्म्ही फेसबुकवर हे सारे अल्बम पाहू शकाल...त्या लाईव्हा झाल्या नाहीत याबद्दल क्षमस्व..)

- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276