चंद्रशेखर फणसळकरांच्या नविन नाटकातली दिलीप प्रभावळकरांची भूमिका पाहल्यानंतर नाट्यरसिकांच्या मनात सहजच एक शब्द घुमतो तो म्हणजे `वा गुरू`. मृत्यूचे भय न बाळगता आयुष्यातल्या जुन्या स्मृतींना जागवत आपल्या मनात सतत असणा-या विचारांना बोलते करणारा हा हाडाचा शिक्षक. पायापासून हळूहळू एकेक अवयव काम न करताना दिवसेंदिवस शरीराने खंगत जातो. ती वेदना हसत हसत झेलताना आयुष्यातल्या अनेक गोष्टी आपल्या एके काळच्या प्रिय विद्यार्थ्याजवळ सांगतात. सगळे नाटकच थोड्याफार फरकाने गंभीर आहे. मूळ ईंगर्जी कथेवरून बेतलेल्या या कथालकातली सारी पात्रे आपले चेहरे घेऊन येतात .अस्सल मराठमोळ्या वातावरणाचा मुलामा देउन एक नवा अनुभव सुयोगच्या या नाटकाने दिला आहे.
ब-याच दिवसांनी या नाटकाच्या निमित्ताने नाटकाचा मूळ प्रेक्षक पुन्हा एकदा खेचला गेल्याचे चित्र पहिल्या प्रयोगाला दिसत होते. दिलिप प्रभावळकर यांच्या अभिनयाचा सुदर आविष्कार पाहण्याची संधी या नाटकाने दिली . त्यांच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांमध्ये ही एक वेगळी छटा पहायला मिळते. ही भूमिका निभावताना त्या व्य़ाक्तिचा बाज. त्याच्या मनाला चटका देणारे अनुभव. आणि प्रेम आणि स्पर्श या दोन भाषेतून माणसाने का बोलावे याचे गुरूजींच्या रूपातले विवेचन अगदी आत रुतुन बसते. शांततेलाही अर्थ देणारा हा हाडाचा शिक्षक जे बोलतो ते खरोखरीच ऐकत रहावेसे वाटते. ती भाषा पेलण्याची आणि संवादता भावार्थ त्यांच्या भूमिकेतून अनुभवायला हवा. ती मानसीकता, ते शव्दातले नाते. तो जिव्हाळा , ती वेदना, ती असाय्यता , ती ओढ, ते आसुसलेले हळवे रुप. सारेच प्रभावळकरांच्या व्यक्तिमत्वातून उलगडत जाते. वेदनेला सोसताना ज्यापध्दतीने बोलण्यातून आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम करणारा एखादा हाडाचा शिक्षक जशी माया लावेल तसे ते व्यक्तित्व दिलीप प्रभालकर यानाटकातून प्रेश्रकांसमोर आणतात. त्यांच्या भूमिकेला अनुभवताना म्हणूनच ओठा शब्द येतो...वा गुरु.
छोट्या-छोट्या प्रसंगातून खुलत जाणारे हे नाटक प्रेक्षकांची उत्कंठा वाढवित नेते. विजय केंकरे यांनी अगदी व्यक्तिरेखेला साजेशी भाषेची ढब कलाकारांच्या उत्तम टिमकडून साकारुन समोर ठेवली आहे. आपण आता यापुढे काय होणार या उत्सुकतेतू प्रत्येक प्रसंग निरिक्षणपूर्वक टिपत रहातो. शिक्षकाच्या व्यक्तिरेखेतून मानवी मनाचे सामान्य वाटणारे असामान्य क्षण नेमके ठळकपणे बाहेर काढून ते प्रेक्षकांसमोर उलगडण्यात केंकरे यशश्वी झाले आहेत.
कोणेएकेकाळी आपल्या हाताखाली शिकून गेलेल्या विद्यार्थ्य़ांच्या आठवणीत रमता रमता जिवनाचे तत्वज्ञानच या नाटकातून लेखकाने नेमके मांडले आहे. त्यात सत्यता तर आहेच पण ते कधी कधी जिव्हारी लागेल इतके झोंहते देखील.
दिलिप प्रभावळकरांच्या जोडीला अतुल परचुरे सारखा हुन्नरी कलावंत या नाटकातून रसिकांसमोर येतो. शब्दांच्या सुरेल मैफलीतील ती नेमकी तान घेतो आणि दादही घेतो तो अतुल परचुरे. व्यवसायाच्या धकाधकीतही भावभावनांचे नाते घट्ट करताना आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व तो करतो. सहजता आणि तेवढीच ओढ निर्माण करून अतुल परचुरे सोळावर्षांनंतर भेटणा-या शिक्षकांविषयींची कृतज्ञताही तेवढ्याच नम्रपणे जेव्हा साकारते तेव्हा टाळ्याही भरभरुन येतात.
ब-याच कालावधीनंतर गिरीजा काटदरे संगीत नाटकांची परंपरा असलेल्या भूमिकातून गद्य नाटकात आल्या. नुसत्याच आल्या नाहीत तर ते सूरही आळवून दाद घेउन गेल्या. पूर्णीमा तळवलकरांनीही साकारलेली तरूणी विविधअंगानी आमच्यासमोर आणली. करीयरकडे लक्ष देता देता लग्नाला वेळच नसणा-या आजच्या पीढीला तीच्याकडून शिकायला मिळते.
स्वतःची छाप पाडणारे. दिलिप प्रभावळकर आणि अतुल परचुरेंच्या आभिनयाने सौंदर्यवान बनविलेले चंद्रशेखर फणळकरांचे हे नाटक विजय केंकरेंच्या दिग्दशर्नातून पहाताना मजा आला.
आजचा प्रगल्भ होत असलेला प्रेक्षक `वा गुरू`ला दाद देईल अशा आशा आहे.
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
mob- 9552596276
www.subhashinamdar.blogspot.com