Friday, January 11, 2013
मनोहरी रुप आता रुपेरी झाले..
बदलत्या काळाचे स्विकारणारी नाटके रंगभूमिवर येत नाहीत. योग्य भूमिकांना त्या योग्यतेचा कलाकार नाटकात काम करताना दिसत नाही. वाढत्या मालिकांच्या प्रभावामुळे रंगमंदिराकडे मुद्दाम यावे अशी नाटकेही आज येत नाहीत. जी गोष्ट गद्य नाटकाची तीच संगीत नाटकाची आहे. तरीही सुदर्शन रंगमंचावर होणारी चळवळ . तिथे होणारी आजच्या पीढीने आजच्या प्रेक्षकासाठी केलेली नाटके यातून रंगभूमि तग धरून आहे. काळाप्रमाणे वदतलणा-या `अवघा रंग एकची झाला ``सारखी आपली परंपरा आणि आजचा काळ यांची मेळ घालणा-या संगीत नाटकांचे प्रयोग ह्यातून आशादायी चित्र दिसत आहे. थोडे फार नाव मिळाले की कलाकार मालिकेसाठी जातो. त्याला इकडच्या नाईटपेक्षा तिथे पैसा जास्त मिळतो. मग तो तिथेच रमतो. पुन्हा नाटकाकडे फारसा फिरकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आजची रंगभूमिची स्थिती पाहून निराश आहे. मात्र ती बदलण्याची ताकद तरूणाईमध्ये आहे. त्यांनी नाटकाकडे गंभीरपणे पहावे असे वाटते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेचा `जीवनगौरव` पुरस्कार मिळालेले आणि ज्यांची सारी हयातच नाटकांचे व्यवश्थापन करण्यात गेले ते मनोरंजनचे ८३ वर्षाचे मनोहरपंत कुलकर्णी तळमळीने हे सारे सांगत होते. त्यांना जयंतराव टिळक स्मृती प्रित्यर्थ पंचवीस हजार रुपयांचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. यानिमित्ताने सा-या नाटकवाल्यांचे `आण्णा` आजच्या नाटकांविषयी तळमळीने आणि पोटतिडकीने बोतल होते.
आर एम एस मध्ये सॉरर्टरची नोकरी करून त्यावेळचे आपले मित्र नाना रायरीकर यांच्या साथीने १९५६ पासून भालचंद्र पेंढारकरांच्या ललितकलादर्शच्या व्यवस्थापनाची पुण्यातली जबाबदारी घेणारे भागीदार मनोरंजन यानावाने व्यवसायत आले.. गेली ५४ वर्ष याव्यवसायात अनेक अनुभवांनी समृध्द झाले. अनेक अनुभवातून शिकले. अनेकांना नाटके करण्यासाठी आर्थिक बळ दिले. त्यातल्या कांहीनी पैसे डुबवले ते विसरून आजही ८४च्या उंबरठ्यावर मनोरंजनचा सारा भार आपले पुत्र मोहन कुलकर्णी याच्यावर सोपवून स्वतः क्रियाशिल राहून हिशेबाचा सारा भार पेलत ताठ मानेने आणि नाटकांचे अवलोकन करीत नाट्यव्यवसायाची चिंता करीत आहेत आनंदी जीवन जगत कार्यरत आहेत.
पुण्याबरोबर नाटकांचे दौरे आखणे. त्यासाठी आवश्यक असणारी व्यवस्थापनाची बाजू सांभाळून अधिकाअधिक प्रयोग करण्यासाठी संस्थांना मार्गदर्शन करणे. प्रसंगी त्यांना लागेल तशी आर्थिक मदत करणे. कलावंतांना काय हवे ते पहाणे. त्यांचे स्वभावाप्रमाणे त्यांचा मुड सांभाळत `शो मस्ट गो ऑन `या न्यायाने सारी मदत करण्याचे सौभाग्य यानिमित्ताने मनोरंजनच्या मनोहर कुलकर्णी यांना लाभले. ललितकलादर्श, नाट्यसंपदा, चंद्रलेखा, लता नार्वेकरांची श्री चिंतामणी, दादा कोंडके यांची विच्छा माझी पुरी करा, धनसिंग चौधरी, थिएटर अकादमी, पीडीए. किती नावे घ्यावीत त्यांचे व्यवस्थापनाचे काम त्यांनी केले. अनेकांनी पैशाला टगंग मारली. त्यातूनही तरले. मात्र यातून कित्येकजण मित्र बनले. त्यातिथे मग पैशापेक्षा माणुसकीच्या न्यायाने कायमची साथ केली. त्यांचे तंत्र सांभाळले. त्यांच्या घरातलाच एक सभासद झालो. याचा अधिक आनंद आहे.
वाईसारख्या छोट्या गावातून ४६ साली ते पुण्यात आले. ४७ ला त्यावेळच्या मुंबई विद्यापीठाचे मॅट्रिक झाले. रावसाहेब शिंगरे यांच्याकडे राहून. घरची कामे करून शिकण्याची जिद्द बाळगली. त्यांनी बाहेर काढल्यावर नाना रायरीकरांच्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहिले.. दूधाचे रतीब घातले. सायकल घेवून RMS मध्ये शेवटपर्यत काम केले. भालचेद्र पेढारकर भेटले आणि मनोरंजनचा पाया रोवला गेला. एका खोलीत तीन मुलांसह अठरा वर्ष संसार केला. अनेक वर्षानंतर गुलटेकडीला बंगला बांधला. मी आणि नाना( रायरीकर) नोकरीत म्हणून डॅडी लोणकरांना भागीदार करून घेतले. नाटकांचे दौरे केले. चित्तरंजन कोल्हटकरांसारखे कलावंत मित्र भेटले..काशिनाथ घाणेकरांसारख्या कलाकाराचा सहवास भेटला. नाती द़ढ होत गेली. मनोरंजनची वाटचाल सुरूच राहिली.
`वयानुरून आता सारा भार मोहनवर सोपविला आहे. तो नव्यापध्दतीने मनोरंजनते बळ वाढवित आहे.`
बोलताना ते गत आयुष्याबद्दल सांगताना त्या काळात मलाही घेउन गेले. हौशी कलावंत म्हणून भावबंधनमध्ये मनोहरची भूमिका केली. RMS तर्फे नाटकात भूमिका केली. एका चित्रपटातही छोटी भूमिका केली. कलावंत हापता आले. संगीत नाटकांचा बहर अनुभवला. गद्य नाटकांची पारायणे केली. संस्था पाहिल्या. माणसांचे नमुने पाहिले. अनुभव घेतले. अनेक नाटकवाल्यांना सल्ले दिले. परखड मते मांडली. संगीत नाटके पाहण्याची भारी आवड. तीही पुरी झाली. तो काळ पाहता आजचे चित्र पाहताना विराश होतो. इतकेच.
जयंतरांव टिळकांनी नाट्यपरिषदेला टिळक स्मारक मंदिरात जागा दिली. अनेका नाटकांना प्रेत्साहन दिले. जयंतरावांच्या नावाने पुरस्कार मिळतोय याचा अधिक आनेद आहे. हा व्यवसाय बहरत रहावा. पुन्हा एकदा रंगमंदिर फुलेले पहावे हित इच्छा आहे.
त्यांचे हे काम त्यांचेच चिरंजीव मोहन कुलकर्णी सध्या पुढे नेत आहे...
मनोरंजनाचा सेतू उभारला
कलावंताना दिला आसरा
नाटकवाले म्हणूनच तरले
मनोहरी रुप आता रुपेरी झाले..
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)