Friday, September 9, 2011

तुम्ही प्रेरणा बना..प्रेरणा द्या..

देशात आणि काही राज्यात सावधानतेचा ईशारा दिला असताना...तुम्ही सार्वजनिक ठीकाणी कसे वागायचे...
कसे उत्सव साजरे करायचे....हे तुम्ही तुमच्यातल्या स्वतःलाच विचारा..आणि तसे उद्या

आणि पुढेही वर्तन कायम ठेवा...

तुम्ही प्रेरणा बना..प्रेरणा द्या..


श्री गणेशाच्या या मंगलमयी वातावणात कुठल्याही पध्दतीने दुषीत वातावरण होऊ नये हीत ईच्छा..

Thursday, September 8, 2011

आले श्री गजानन


श्री गणेशाच्या आगमनाने आनंदीत झालेल्या आमच्या कवी मित्राने लिहले्ल्या या ओळी..


आले आले श्री गजानन
आनंद आशा सवे घेऊन
मुखी मोरया नाव बोलून
करू स्वागत उत्साहानं

त्याचे आहे गजवदन
हेच आसे वेगळेपण
सर्व कलात तो निपुण
किती करावे गुणगान

असे देवात प्रथम मान
म्हणून करू आधी वंदन
विघ्नाना ते दूर करून
करी सुखाची ती उधळण

प्रसाद लागे मोदक म्हणून
लाल फुलांचा हार गळ्यातून
जो जोई त्यासी शरण
करीता त्याचे सदैव रक्षण

अनेक रूपे, अनेक नावातून
ह्दयी वसे श्री गजानन
बुध्दीवान तो सामर्थ्यवान
दिसे जगासी इतिहासातून

आला घरी पाहुणा म्हणून
सुख, शांती, आनंद घेऊन
करी प्रबोधन, देई ज्ञान
जाई हूर हूर मागे ठेऊन

.....


श्रीकांत आफळे, पुणे
श्रीकांत आफळे, सी-१--९, गुरुराज सॉसा. पद्मावती, पुणे-४११०३७..फोन- (०२०) ४३६७५३२. मोबा.९८९०३४८८७७


shrikantmaitreya@gmail.com

Wednesday, September 7, 2011

घर..मंगलमूर्तीचे..उत्सवाचे...



गेले काही दिवस तो मंगलमय स्वरूप घेऊन दाखल झाला. आरूढ झाला. घरातल्या मुख्य दिवाणखान्यात. रोज ओवाळून घेऊन मंगलकामना करीत आम्ही त्याची आरती केली. त्या मंगलमय मूर्तीच्या पार्थीव मूर्तीला प्रतिष्टीत केले. सकाळ-संध्याकाळ मूर्तीपूजनाची तयारी होत होती.

नैवेद्याने मूर्तीमय घर बहरून गेले. त्याच्या जोडीला आम्हीच सारे एका मोहरलेल्या धार्मिक वातावरणात होतो. घरात गोड-धोड होत होते. कधी उकडीचे मोदक तर कधी पुरणाची पोळी. रोज वेगळा नैवैद्य दाखवून त्याची यथासांग पूजा सारेच कुटंबीय करीत होतो.

आमच्या प्रथेप्रमाणे गौरीबरोबर विसर्जन होऊन सातव्या दिवशी या मंगलमय पार्थिव मूर्तींचे विसर्जन केले.
हे झाले प्रथेप्रमाणे...

पण यंदा पावसाने म्हणजेच.. निसर्गाने कमाल दाखविली. आमच्या समोरच्या सा-या परिसरात याच मंगलमूर्तींच्या वास्तव्याच्या काळात पावसाने जोर केला.पालिकेच्या म्हणा किंवा राजकीय लोभातून, गेली तीन-चार वर्ष ज्या रस्त्याचे शुक्लकाष्ठ सुरू आहे. त्या रस्त्याचे काम पूर्णच काय अपूर्ण राहून गेले आहे. त्याचा पहिला धक्का सा-या नागरिकांना बसला. घरात पाणी शिरले. प्रतिष्ठापना केलेल्या मंगल गणेशाचे उच्चाटन करून कुणी इतरांच्या घरात तर कुणी शहरातल्या नातेवाईकांचाय घरात घेऊन गेले.

खरं म्हटले तर एकदा बसलेल्या मूर्तीला हलवायचे नसेत. इथे तर स्वतःचा जीव- जीच वस्तू जायची वेळ तर तरीही मंगलमूर्तींना सोबत घेऊन हे सारे भाविक डळमळीत होऊन गेले.

कालच ब-याच घरातले गणेश नदीत. तलावात किंवा पालिकेने बांधलेल्य़ा चौकोनी टाक्यात विसावले आहे. पुढल्या वर्षी परत येण्यासाठी..

संकष्टी पावावे..म्हणून प्रार्थना करणा-या गणरायाला ही आपत्ती निवारण करायची बुध्दी का नाही झाली ... राज्यात सर्वत्रच पावसाने धुमाकूळ घातला. रस्ते जलमय झाले. नद्या, धरणे भरून वाहू लागले. निसर्गिक आपत्तीतही न डगमगता सारा डोलारा पुन्हा सुरू झाला...

एकीकडे लोकांच्या घरात पाणी. उद्याची चिंता असताना बाकीजण आनंदाचा उत्सव साजरे करून आनंदात न्हाऊन निघाले. कुणी आपल्या आरोग्याच्या काळजीत आहेत. तर कांहीना हा त्रास वाटून हा उत्सव संपण्याची वाट पहात बसलेत..
लाखोंची उधळण होत असताना..जुनीच कामे पुन्हा काढून त्यातून मलीदा कसा खाता येईल याच्या दिशेने झटताहेत.. उत्सवाची दोन रूपे..मंगलमूर्ती..तुझ्याच दारात बसलीत.. ह्यांना न्याय कधी देणार रे बाबा...
जलमय अशा वातावरणाची भिती मनात ठेऊन..आमच्या परिसरात रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार यांच्या चिंतेत बसलाय.

आता दोन दिवसांवर रविवारी सार्वजनिक गणेशांचे विसर्जन होईल. पुण्यात त्यासाठी भाविकांनी रस्ते भारून जातील.
तुडुंब गर्दीत सारे रस्ते गुलालाच्या ,ढोल-ताशा आणि स्पीकरच्या भिंतीनी छातीत धडकी भरणारे आवाज घुमू लागतील.
आपली दुखेः विसरून उत्सवात न्हाऊन निघालेल्या भक्तीला तू गणेश देवा.. प्रतिसाद दे.. मंगलमय कर.....


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com

Monday, September 5, 2011

पायवाटा गेल्या मागे


मित्रहो, एका विशिष्ठ वयानंतर कुणालाच कसलीच अपेक्षा नसते. हवी असते ती खरी मैत्रीची नाती..आणि शोधला जातो आपल्या माणसाच्या चार चांगल्या भावना....अशीच भावना घेऊन...मी माझ्या पत्नीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी अशा ओंजळभर शब्दातून भावनांचे कवडसे..दिले..तेच तुमच्यासमोर व्यक्त करीत आहे...

तिच्या मनातल्या कोंदणातून..


नव क्षितीजावर

पायवाटा गेल्या मागे..आज उजळली नवी झळाळी
पन्नाशीच्या लाटा अलगद..दिसू लागल्या नव क्षितीजावर
रंग नवा तो दिसे आता मज.. जीवनाच्या नव जाणीवांचा
उसळे मनही..धाव घेतसे..विसरती..झरती..माझे मीपण
संसाराच्या सारीपटावर..फडकू लागे..दोन तिलोत्तम
कधी निवारा..हवा सहारा..सारे भासे माझे मीपण
जीवन म्हणजे..सारीपाट..सोंगट्यांचा एकच ध्यास
चाकरी..भाकरी..निवारा...दमला..भासला..एकांतवास
भासातून..त्रासातून..विसाव्याच्या धुंदीतून
मनाच्या कोप-यातून..प्रेमाच्या ओलाव्यातून
गंधीत वा-यातून.. धुंद त्या श्वासातून..
गुंतलेल्या जाणीवातून..
वारे वहात होते.. काळ सरकत होता..
वर्ष कधी पुढे गेली आणि वय वाढत गेले
कळलेच नाही....
विसाव्याला तुम्ही होता..तरीही भरकट सुरूच होती
आज माझ्या देहातून..शरीराच्या पेशीतून..
संसाराच्या चौकटीतून.. डोकावताना पहाते आहे
माझे मलाच ते भासमय भासत आहे
---------------------------------------------------------------------------------

माझे थोडक्यात उत्तर..असे

सखी, तुझ्या वाटेवर आलो
तुझ्या चित्तात रमलो
तुझ्या सुखात न्हालो
बहरलो.. नादावलो..

तुला कष्टवित.. तुझ्या श्वासात
माझ्याच धुंदीत..विसरलो ..गेलो
तु पन्नाशीत शिरलीस..
आणि
भानावर आलो..तुला नाही दिले..
हवे ते बालपण
तुला नाही अनुभवता आले..
सारे मीपण..
आता मात्र निश्चिंत अस
विसावलेल्या माझ्यात..
भांबावू नकोस..
आता खरी ओढ
वाढत आहे..
दूरवर गेल्यावर
बिंदूच्या किरणातून
मी आता झिरपतो आहे..
तुझ्या संगतीने पुन्हा बहरतो आहे..

नको करू खंत
आहे ते खरे..
हेचि चित्ती उरे
तुझ्या नी माझ्या

वयाची ही किमया
दावी ती सहाया
आता विठुराया
ठेवी मज


subhash inamdar
9552596256
subhashinamdar@gmail.com