मे ११ एकोणीसशे ९३ ला देवतेसमान अध्यात्मिक पुरूषोत्तमाचे निधन झाले खरे. पण शाहू मोडकांच्या आठवांनी पुन्हा एकदा एस एम जोशी सभागृहातला प्रत्येक रसिक गहिवरून गेल्याचे दृष्य अनुभवले. माणूस असतानाचा साक्षात्कार वेगळा आणि त्यांच्या जाण्यानंतर सुमारे १७ वर्षानंतर जगलेल्या क्षणांचा साक्षात्कार होणे वेगळे. यातच सुशिलकुमार शिंदेंसारखे रसिक सांस्कृतिक आणि दिलदार व्यक्तिच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन व्हावे. हाही एक योग आगळी होता.
केंद्रात उर्जा मंत्रीपदाची शाल अंगावर घेत सुशिलकुमार यांनी रसिकांनी शाहू मोडकांच्या ज्या आठवणी ज्या सहजतेने रसाळपणे ऐकवल्या त्यामुळे शाहू मोडकांची वेगळी ओळख झाली.
आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीत २९ वेळा श्रीकृष्णाची भूमिका अभिजात आभिनयाने जिवंत करणारे शाहूजी ह्यांचे देवत्व रसिकांनी मान्यच केले होते पण त्यांच्यातल्या भविष्यकाराचे रूप सुशिलकुमारांच्या भाषणातून प्रकर्षाने बाहेर आले. मंत्री असूनही पुस्तक दोनदा वाचून ते भाषणासाठी तयारी करून आले होते. मंत्री येताना वाचून येत नाहीत असा गैरसमज त्यांनी दूर तर केलाच पण आजही असे मंत्री आहेत जे कार्यक्रमांना जाण्यापूर्वी अभ्यास करून जातात. याचाही उल्लेख करायला ते विसरले नाहीत.
शाहू मोडक आणि प्रतिभाताईंची ही प्रेम कहाणी एक अदभूत कहाणी आहे. ती आजच्या प्रेमविरांनी वाचायलाच हवी. यात नाट्यपूर्णता आहे आणि सत्यताही.
सर्वधर्मसमभावाचे उदाहरणही पुस्तकातून सामोरे येते. शाहूराव ख्रिच्शन तर प्रतिभाताई जैन.
ही सारी वाक्ये घेताना सुशिलकुमार मधूनच पुस्तकातल्या उता-यांचा आधार घेत होते. अध्यात्मिक दर्शन घडविणारे हे पुस्तक आहे. ते नुसतेच मराठीत नवहे तर इतर भाषेतूनही निघायला असे असे शिंदेयांनी मुद्दाम सांगितले.
जैन साध्वीचे व्रत झुगारून प्रतिभाताईंनी शाहू मोडक यांच्याशी लग्न करून एक इतिहास घडविला आहे. मात्र ते सांगताना जैन धर्मातील साध्वींच्या मनाचा विचार करण्याची गरज आहे , असे आपले स्पष्ट मतही मांडायला ते विसरले नाहीत.
विषय कलावंताच्या व्यसनावर गेला तेव्हा राजकपूर घराण्यातले सर्वच थोड्याफार प्रमाणात दारूच्या आहारी गेल्याचे उदाहरण सांगताना त्यांनी कलाकारांना त्यांच्या अभिनयातून ओळखले जावे. अभिनय करताना त्यांना किती दिव्याच्या सामना करत भूमिकेत शिरावे लागते याचा विचार करून त्यांच्या इतर बाबींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्लाही रसिकांनी दिला.
पुण्यात झालेला हा पुस्तक समारंभ म्हणजे एक नकळत साधलेली शब्दांची मेजवानीच होती. उपदेशही होता आणि माणसात असलेल्या देवत्वाचे स्वरूपही पुस्तकरूपाने बाहेर येत होते.
- अमेय प्रकाशनच्या सोहळ्याची ही पर्वणी घडवून आणली ती सुधीर गाडगीळ यांनी शब्दांकीत केलेल्या शाहू मोडक... प्रवास..एका देवमाणसाचा या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात
बेबी शकुंतला, प्रतिभाताई मोडक आणि सुशिलकुमारांचे भाषण यातून शाहूरावांच्या कार्याची दिशा आणि अध्यात्माची प्रचिती येत होती.
अर्जूनमय रसिकांना शाहूरावांच्या जीवनातून श्रीकृष्णाने सांगितलेली गीताच प्रतिभाताईंच्या तोंडून रसिक-वाचकांच्या समोर मांडली गेली. प्रश्न एवढाच आहे की कीती जणांच्या वाचनात ही अध्यात्मिक गीता येते ते .आणि किती जण त्यातून प्रत्याक्षात आचरणात आणतात ते ?
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276