Wednesday, April 24, 2013
शेक्सपीअर,,,चरित्र मराठीतून
ज्याच्या जन्माची योग्य नोंद नाही. त्याचे शिक्षण कुठे आणि किती झाले याचीही फारशी माहिती अस्तित्वात नाही. तो नेमका काय करीत होता. वडीलांचा व्यवसाय करीत होता की उमरावांचे घोडे राखीत होता किंवा काय याचेही निटसे संदर्भ नाहीत. त्यांने नाटके कधी लिहली..त्यानी नेमके कुणाशी लग्न केले. त्याच्या मृत्यूचा नेमका दाखला नाही...
एकूणच आजही सा-या जगावर नाटककार म्हणून आणि त्याने निर्माण केलेल्या पात्रांविषयी उत्सुकता लागून राहिलेल्या शेस्कस्पीअर याची चारशे वर्षांनतर मोहिनी कायम असली तरी त्याच्यावरची चरित्रात्मक कादंबरी लिहणे हा संदर्भ शोधून केलेला हा व्याप खरोखरीच जगाच्या साहित्यविश्वात आणि त्यातही मराठीत पहिला आहे. परशुराम देशपांडे यांनी ही महाकादंबरी लिहली याचे अधिक स्वागत करायला हवे. या कादंबरीचे इंग्रजीभाषेत भाषांतर होणे गरजेचे असल्याचे मत प्रा. के. रं. शिरवाडकर यांनी सोमवारी मांडले.
कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या वतीने या ग्रंथाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ पत्रकार आणि शेस्कस्पीअरच्या नाटकाचे अभ्यासक यांनी या पुस्तकाचे महत्व सांगताना असा पध्दतीची कादंबरी इंग्रजीमध्येही उपलब्ध नसल्याचे सांगून हा मान मराठी भाषेला मिळाल्याने हा दिवस ऐतिहासिक दिवस असल्याचे अभिमानाने सांगितले. अनेक ठिकाणी असलेल्या संदर्भातून आणि दंतकथांमधून परशुरामदेशपांडे यांनी कादंबरीच्या रुपाने एक महाकादंबरीचा हा भव्य प्रकल्प सार्थपणे आकारात आणल्याबद्दल आणि ती प्रसिध्द केल्याबद्दल प्रकाशकांना धन्यवाद दिले.
नेमके चरित्रात्मक लेखन मराठीमध्ये फार नाही..परशुराम याने या महान नाटककारावरची कादंबरी लिहिताना अनेक बारीक सारीक तपशील समजून घेऊन वाचकांना शेक्सपिअरच्या जीवनाचे अनेकविध माहित नसलेले पैलू स्पष्ट करुन दाखविले आहेत.
या महाकादंबरीला रसिकही भरभरुन दाद देतील आणि आपल्या संग्रही ठेवतील अशी आशा प्रकाशिका देवयानी अभ्यकर यांनी व्यक्त केली.
Subscribe to:
Posts (Atom)