Friday, December 31, 2010
साहित्य संमेलनाने काय कमावले
ठाण्यात तीन दिवसांचा अखिल भारतीय म्हणावणारा साहित्य संमेलनाचा उरूस पार पडला. नाताळाच्या सुट्टीतच ..२५ ते २७ डिसेंबर.. तारखा आल्याने अपेक्षित अशी गर्दी लाभली नाही. नाही म्हणायला. ग्रंथदालनांची संख्या आणि त्यातील विविधता अधिक ठळकपणे नजरेत भरत गेली.
दादोजी कोंडदेव यांच्या नावाने पुण्यात जो गोंधळ उडवला त्याच नावाच्या क्रीडासंकुलात ठाण्यात हा उत्सव पार पडला. ... मात्र शेकडो पोलिसांच्या साक्षीने.
आरंभी पासून गाजत चाललेल्या या संमेलनात मराठीची काळजी करणारे परिसंवाद चर्चिले गेले. मराठी भाषकांसाठी नवीन तंत्रज्ञानात काय आहे...यावरही भर दिला गेला. साहित्याला नाट्यमंदीराची जोड मिळाली. गडकरी रंगायतनमध्ये चित्रपट समीक्षा, आणि मराठी चित्रपटांची संख्या वाढली पण दर्जाचे काय़ ? सारखे परिसंवाद झाले.. (ज्याची कधीही इतर साहित्य संमेनात दखलही घेतली गेली नव्हती) महाराष्ट्राच्या सर्वागीण ऐक्याची चर्चा रंगली. तर दुसरीकडे जागतीकीकरण, ग्रामीण समाज आणि मराठी भाषा यावर चर्चा तर दुसरीकडे मराठी भाषेच्या अधोगतीवर अभिरूप न्यायावयात खटला...असे परस्पर विरोधीही कार्यक्रम झाले. ठाणे शहराचा सांस्कृतिक इतिहास दृकश्राव्य माध्यमातून दाखविला गेला. वाचन संस्कृती आणि ग्रंथालयांची स्थिती याविषचीही चर्चा झडली. कधी नव्हे तो महत्वाच्या म्हणजे प्राईम टाईममध्ये कवींचा दरबार मुख्य मंडपात रंगला. लोकसाहित्याची दखल घेतली गेली. आदिवासींच्या साहित्याचेही गोडवे बोलले गेले.
हे सारे झाले.. संपले....पण यातून मराठी भाषेला काय मिळाले....भाषा विस्तारण्यास य़ाचा किती उपयोग झाला...
वाचक वाढला की गंभीरपणे मराठी भाषेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मत मांडले... समारोप समारंभात बृहनमहाराष्ट्रातल्य़ा मराठी भाषीकांसाठी काम करणा-या संस्थाना महाराष्ट्र सरकारने आर्थिक हातभार लावण्याची मागणी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांवी केली... याशिवाय अनेक ठराव त्याच चाकोरीबद्ध पध्दतीने मांडले गेले..सूचक अनुमोदक..जाहिर केले गेले...
पण समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याचा साधी दखलही घेतली नाही..आपण लिहून आणलेले भाषण वाचले...ना कोणतेही ठोस अश्वासन..ना कोणती नेमकी भूमिका...केवळ सांस्कृतीह दहतवादाचा उल्लेख केला गेला...
संमेलनात उपस्थित राहिलेल्या वाचकांनी वा रसिकांनी काय आठवणीत घेऊन जायचे..
ते तीन दिवसांत शुध्दलेखनाच्या चुकांचे प्रवेशद्वारावरील चित्र ( जिथे भारतीय...नव्हेच भरतीय शेवटपर्यत होते) की मराठी पुस्तकांच्या यादीतले ना.सी.फडके यांच्या ऐवजी लिहलेले न. सी फडकेयांचे अशुध्द नाव?
खेबुडकरांची मुलाखत की कवी अशोक बागवे यांची काव्यातली तडफ.
बरे, पुस्तकांच्या दालनात न ओळखला येणारा रस्ता की जो तुम्हाला कुठेही, कुठल्याही स्टॉलवर घेउन जाणरा.. ना कसले क्रमांक की ना नाही नेमकी व्यवस्था. प्रत्येक स्टॉलचे भाडे प्रत्येक गाळ्याला रुपये पाच हजार फक्त. काय ठाऊक काहीच्या स्टॉलचे भाडे तरी निघाले का नाही? नाही म्हणायला प्रकाशन समारंभासाठी व्यासपीठाची निर्मिती संकल्पना उत्तम..पण तीही संयोजकांना राबवीता आली नाही...भकास... निष्क्रिय....
वाचकांनी मात्र या सर्वाच आनंद घेतला तो या ग्रंथ दालनात. मनसोक्त भटकून... क्वचित काही सीडी.. मराठी तंत्रांच्या स्टॉलला भेट देउन.
मोठ्या अशा प्रांगणात भली मोठी दालने... खूर्च्यीही रिकाम्याच.. वेळेवर न सुरू झालेले कार्यक्रम.. न उपस्थित राहिलेले मान्यवर... आणि फारच थोड्या साहित्यिकांचा सहवास.
खरेच आशा मोठ्या पण उत्सवी संमेलनाच्या ऐवजी छोटेखानी पण विषयाला त्या समस्येंची सोडवणूक करणा-या साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल हवी.. गर्दीचा नव्हे तर विषयात रस घेणारा श्रोता हवा. प्रसंगी विकत घेऊन वाचणारा आणि मराठीवर खरेच भाषा म्हणून प्रेम करणारा वाचक हवा.
आता कोटींच्या घरात खर्च करणारी ही संमेलने हवीत काय़.....काय म्हणाल....
सुभाष इनामदार,पुणे
www.subhashinamdar.blogspot.com
subhashinamdar@gmail.com
mob- 9552596276
Subscribe to:
Posts (Atom)