Friday, July 13, 2012
थोडे स्वतःसाठी..थोडे इतरांसाठी..
खरे तर साधेपणाने जगणे ही आजच्या काळाची गरज आहे...स्वतःसाठी नाही तर समाजासाठी..पण प्रत्येकाची साधेपणाची व्याख्या निराळी आहे.
आमचा एक मित्र तर कोकणात...लाईट नसलेल्या घरात...स्वयंचलीत दुचाकी न वापरता..निसर्गात जगतो...त्याच्या दृष्टीने आपण शहरातले लोक फार चैनीत जगतो..
आनंद तुम्ही घेताना पैशाकडे पाहू नका...पैशासाठी काहीच करु नका...तुम्ही कराल त्यातून पैसा मिळाला पाहिजे..तोही सहज...
भूक प्रत्येकाला आहे...चांगले रहावे असेही त्याला वाटत असते...याचे दोन्हीचे परिमाण एकच आहे.
चैन म्हणजे ऐशोआराम नाही...शरीराचे लाड कराल त्याबरोबरच मनाचीही श्रीमंती पहा...तुम्ही घेतलेला आनंदच ते सांगेल..तो आनंद म्हणजे सुख..ते काही दूर नसते...तुमच्यापाशीच असेते. दिसते दूर पण तिथेच असते...फक्त त्याचा शोध घेतला पहिजे...
------------------------------------------
राग घेऊन स्वतःला त्रागा करुन घेण्यापेक्षा ..राग आत ठेऊन वरुन संभावीताचे सोंग आणणे योग्य..
यामुळे बाहेरचे सारे वातावरणही चांगले रहाते. तुमचे मन शांत होते...कदाचित जो तुमच्यावर रागावला असेल..त्याचाही उद्देश तो नसतो...कदाचित तोही इतर विचारांनी आधीच व्यापलेला..म्हणून तो दुराव्याने वागतो....
चांगले हेच की शत्रुला मित्र करणे
कारण तो शत्रु नसतो...तो गैरसमज असतो...
थोडा गर्व असतो...
काहीप्रमाणात स्वार्थही..
आपल्याला परमार्थ गाठायचा आहे....सारेच मिळवायचे आहेत...सा-यांशी संबंध वाढवावयाचे आहेत.
--------------------------------------------
आपले कोण ? एक सतत पडणारा प्रश्न आहे...प्रत्येक घटनेतून वेगवेगळी उत्तर सापडतात...प्रसंगातून हे कळते...खरे आकलन होते. तेही अगदी वेगळे...चेहरे दिसततात..पण त्यामागचे मनाचे डोळे् ओळखणे खरेच कठीण...आजचा जवळ वाटणारा..उद्या तुमच्यापासून दूरावलाही जावू शकतो... कदाचित ज्यांच्या जवळ जायची इच्छा असते...त्यांच्याजलऴ जायचा अपूर्य योग अचानक येतो...आणि सारे बदलू पहाते...तुमचे काय?
------------------------------------------------
चेहरे अनेक फसवतात
हसवतातही...
चेह-यावरुन भावना पसरुन राहतात
विरुनही जातात,,
हेच चेहरे आयुष्यात बोलायला लागतात
खरं सारं..सागंत जातात..
-------------------------------
कोणत्याही वयात तुम्ही विद्यार्थी बनू शकता..फक्त त्यासाठी हवी सच्ची मेहनत. शिकण्याची वृत्ती आणि गुरुच्या मार्गदर्शनावर श्रद्धा...शिक्षणासाठी तेही कलेच्या बाबतीत..गुरु लहान असला तरी चालेल..पण त्याकडे तेवढी कला देण्याची ताकद हवी....गुरुपौर्णिमेच्यामित्ताने अनेक कार्यक्रम विविध ठिकाणी झडताहेत ..वेगवेगळे लोक गुरू म्हणून समोर येत आहे..तसे विद्यार्थीही....आज खरेपणा अधिक आवश्यक आहे.
----------------------------------------------------
माझे म्हणून काही पाहिन आता लवलाही
या देही एकच धागा सुखनैव तो दिसावा
------------------------------------------
खांद्यावरी टाकली घोंगडी
फिरला तो रानोरानी
आसुसला अवघा तो
नाही मिळे कोठे गुरु
तरी सावरे रे....
---------------------------
जातानाही कधी कोणाला दुखवू नका रे..
कोणाची कशी मदत होते कसे सांगू रे..
दूरचा शत्रुही वेळेला मित्र बनतो रे..
खाल्ल्या अन्नाला जागणाराही कधी उलटा पडतो रे.......
--------------------------------------------
आयुष्य घडण्यासाठी योग्य गुरुची आवश्यकता नक्कीच असते..तो शिक्षक, आई-वडील, साथीदार नाहीतर मित्रही असू शकतो...मित्र कोणाला म्हणायचे...जो सुख-दुःखात तुमच्या सोबत असतो....आयुष्याच्या प्रत्येक वळणावर..जो तुम्हाला योग्य वाटेकडे घेऊन जातो...तो तुमचा गुरु म्हणायला हरकत नाही..आज असे मित्र फार कमी असतात..जे सतत तुमच्या तुमचे हित...तुमची चिंता याची सतत त्यालाच जाणीव असते..
मित्राची साथ तोच दाखवितो आयुष्याची दिशा...तोच घडवितो..तो बिघडवितोसुध्दा ..आज चैनिच्या जमान्यात मित्र भेटतात ते स्वतःची शान मिरविणारे..स्वतःची हौस भागविण्यासाठी दुस-याची साथ घेणारे...सच्चा मित्र तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा धरत नाहीत.ते फक्त मित्राचे हित पहतात..
आज गुरूच्या आठवणी आळविण्याच्या त्यांची पूजा करण्याचा दिवस... ज्याची करावी सेवी..त्याचा खावा मेवा... आज ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही...सल्ला देणारे खूप आहेत..पण तुमची इच्छा..तुमचे शिक्षण आणि तुमचा अनुभव या सर्वांचा विचार करुन तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी तुमचा विचार करतो...तुमचे हित पहातो....म्हणूनच तो गुरू म्हणून संबोधणे योग्य होईल...
गुरूचा विश्वास आणि गुरूची शाबासकी मिळविणे फार कठीण..तो मवाळही हवा...पण प्रसंगी कठोर व्हायला हवा..दिशा देता देता...स्वतःघडतो आणि तुम्हालाही घडवितो...
असावे गुरूचे ते ज्ञान..
परि असावे सारे सज्ञान..
करुनी दिव्यदृष्टीचे आकलन...
सर्वांसाठी..
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
इति...
.सुभाष इनामदार,पुणे
Subscribe to:
Posts (Atom)