पुण्याच्या नावारुपाला आलेल्या एक व्हायोलीनवादिका सौ. चारुशीला गोसावी...यांनी साधारणपणे वर्षापूर्वी आपल्या स्वतंत्र कार्यक्रमाला सुरवात केली. सतंत्र स्वतःचे सोलो वादनाचे कार्यक्रम त्यांनी यापूर्वी खूप केलेत. सुमारे ३००० विविधरंगी गाण्यांच्या कार्यक्रमाला साथही केली आहे.. पण शेवटी स्वतःचा ठसा ..आणि वाद्यावरची आपली तयारी रसिकांच्या पसंतीस उरतावी यासाठी संच तयार केला ..आजकालच्या प्रसिध्दीच्या जंजाळात त्यांच्या इतर वादनाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही..तरीही त्यांनी व्हायोलीन गाते तेव्हा..चा कार्यक्रम सुरुच ठेवला. यात हिदी मराठी विविधढंगी गाणी त्या व्हायलीनवर सादर करतात.
रविवारी २६ मे २०१३ ला कोल्हापूरला याचा सहावा प्रयोग सादर होत आहे.
१२ फेब्रुवारी २०१२ ला पुण्यात हेमलकसातल्या डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याला मदतीसाठी पहिला प्रयोग सादर केला..सांस्कृतिक पुणे या सुभाष इनामदार यांच्यामार्फत व्हायोलीन गाते तेव्हा..ला भरघोस दाद मिळाली.. त्यातून जमा झालेली रक्कम सुमारे ७० हजार रुपये आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करणा-या आमटे कुटंबियांच्या कार्याला देऊन झाले.
कलेसाठी कला हे जरी खरे असले तरी आपल्या कलेची पावती या ना त्या परीने मिळावी अशी सर्वच कलावंतांची सुप्त इच्छा असते.
व्हायालीन गाते तेव्हा..य़ा कार्यक्रमात
चांदणे शिंपीत जा`, `अशी पाखरे येती`..नंतर बरसलेले `श्रावणात घननीळा`ने वन्समोअरची दाद मिळते `काहो धरीला मजवरी राग` सारखी बैठकीची लावणीही रंगत जाते. `जांभुळ पिकल्या झाडाखाली` या जैत रे जैत सारख्या अवघड शब्दांना लिलया व्हायोलीनवर झुलवकत गोसावी ते रंगवत जातात...तेव्हा श्रोते त्यांच्या वादनातल्या कौशल्याने भारावून जावून दाद देतात. `बोलो रे पपी`, `बैय्या ना धरो.`.`बाबुजी धीरे चलना` गाण्यांवर ठेका धरायला रसिक उत्सुक असतो...त्या सुरांवटींच्या हिंदोळ्यावर असेच तरंगत रहावे असेही वाटू लागते.
पं. भीमसेन जोशी ( माझे माहेर पंढरी) या भारतरत्नांच्या तोंडून गायल्या अभंगाला पेलण्याची ताकद गोसावी यांच्या वादनातून प्रकटपणे दिसते.
शेवची एवढेच म्हणावेसे वाटते..
व्हायोनीन गाते तेव्हा...
टाळ्यातून प्रतिसाद उमटतो ..
लोक डोलू लागतात..
भारावलेल्या मनातून सहजपणे दाद येते..
कलावंताचे कौतूक होते..
शब्दांचे सूर बनून ते बोलू लागतात.
ताल आणि लयींचा एकजीव होतो..
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते...
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276