Wednesday, September 8, 2010

sada_parijatakacha_New_kavita

देवकरांच्या गणेश मुर्ती

नयनमनोहर डोळे. सुबकता आणि कलाकुसरीने नटलेल्या श्री गणेशाच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी गावोगावचे अनेक जण पुण्यात येतात ते शनिवारवाड्याजवळच्या देवकरांच्या गणेश मुर्तीच्या दुकानात.
गेली १२७ वर्षे कसबा पेठेतील सरदार मुजुमदार वाड्यात गणेशाची मनोभावे विधीवत स्थापना केली जाते. त्याजवळ देवकरांच्या गणेश मूर्तींचे दालन एकदम नजरेत भरते. छोट्यांपासून ते भव्य अशा विविध आकाराच्या मोहक रूपातील आकर्षक मूर्तींमुळे सहजी पाय तिकडे वळतात.

या दालनात थोडी अधिक चौकशी करता जे कळाले ते अधिक वेगळे वाटले. आज जे या दुकानाची धुरा सांभाळतात ते दुकान केवळ राखीपौर्णिमेपासून गणपती पर्यंतच असते. तेही मुजुमदार बोळातल्या विरशैव माहेश्र्वरी मंडळाच्या पुणे जिल्हा कार्यालयात थाटले जाते.

अहमदनगरच्या दिपक आर्टच्या देवकरांनी विविध कारखान्यात तयार होत असलेल्या गणेश मूर्ती खरेदी करून त्या पुण्यातल्या भक्तांसाठी विक्रीसाठी आणायची प्रथा १९७५ पासून सूरु केली. आज गेली ३५ वर्षे तीच प्रथा कायम असून देवकरांचे चिरंजीव लक्ष्मण देवकर ती कसोशीने पाळताहेत.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती. रंगाचे चार हात. आणि प्लॅस्टीक रंगाने मढविलेल्या सूबक मूर्ती घेण्यासाठी दरवर्षी देवकरांच्या मूर्तीची अनेक जण वाट पहात असतात.

लक्ष्मण देवकरांच्या मते पुण्यातल्या चोखंदळ लोकांना आमच्या मूर्ती पसंत पडतात. त्यासाठी जाहिरातही करावी लागत नाही. ऐंशी टक्के आमचे ग्राहक कायमचे बंधले गेलेले आहेत.

सैनिकांकडूनही या मूर्तींची मागणी येते. यंदा दोन मूर्ती चायना सिमेवर सैनिकांनी नेल्याचे ते आवर्जून सांगतात.

पुण्यात अनेक कारागीर मूर्ती करतात. पण अहमदनगरवरून येवून गेली ३५ वर्षे हा व्यवसाय करणारे देवकर हे एकमेव असावेत.


सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276