Friday, April 2, 2010

मनातले सांगायलाच हवे

साठलेले मनात बोलायचे असते
कधी शब्दात, कधी देहबोलीतून
व्यक्त व्हायचे असते
सतत काहीतरी विसरत असतो
नको तेच आठवत असते
क्धीतरी कुठेतेरी भेटायला हवे
मनातले ते सांगायलाच हवे


सुभाष इनामदार, पुणे

Tuesday, March 30, 2010

साहित्य गर्दीने काय साधले .....


गेली काही महिने पुणे गाजते आहे ते ८३ व्या साहित्य संमेलनामुळे. दोनच दिवस झाले तो धुरळा खाली बसू लागला आहे. प्रत्यक्ष ते पार पडल्यानंतर आता वादावरचे पडदे दूर होत होऊन नेमके यातून काय साधले याची चर्चा होऊ लागली आहे. अजून खर्चाचा आकडा बाहेर यायचाय. पण दोन कोटींचा आकडा पार झाला असावा असा अंदाज आहे. साहित्यप्रेमी आले . वादात उभें राहिलेलें पुस्तकांचे दालनात लाखोंची उलाढाल झाली.
डॉक्टर श्री .सतीश देसाईंचे नाव गाजले. अचानक विंदांचे निधनाने हळवा झालेला रसिक गर्दी करून गेला. त्यांच्या जागी ना धो महानोरांची नियुक्ती झाली.
विंदांच्या एका हाताने त्यांनी या साहित्य सोहळ्याचे दीप प्रज्वलित झाले. अजित पवारांची हजेरी लागली. द भिंचे भाषण झाले. दरबारात उत्साह आला. त्याच त्या परिसंवादाने मंडप डोलू लागले .
काव्य कट्टा ओसंडून वाहत काव्याची तिरंदाजी भिरभिरत होती.परदेशांत तयार होणाऱ्या साहित्यावरच्या चर्चेला रंग भरत गेला.
समारोपाला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे बरोबर अमिताभ बच्चन यांची हजेरी लागणार की नाही याचीही चर्चा प्रसारमाध्यमांनी रंगवत ठेवली .अभिव्यक्तीच्या मुद्यावर बोलायाला एक दिवस आधीच मुख्यमंत्री अशोक चव्हाण मंडपात हजर झाले. कॉंग्रेसच्या दालनात गडबड पाहून मुख्यमंत्री वादात न अडकता विंदांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार जाहीर करून ते परत फिरले .
समारोप समारंभाला पद्मभूषण डॉक्टर सत्यव्रत शास्त्री यांना हजर करून संस्कृत साहित्याचीही थोरवी गायली गेली . अमिताभ बच्चन यांच्या तोंडून हरीवंशराय बच्चन यांच्या हिंदी साहित्याची उदाहरणे ऐकता आली. महानायकाला पाहण्यासाठी आणि त्यांचा आवाज कानात साठवुन ठेवण्यासाठी साहित्यिक रसिक प्रचंड संख्येने जमला होता .
द भि कुलकर्णी यांनी हा समारोप नसून ही तर सुरवात असल्याचे सुतोवाच करून या मराठीतल्या या महाकुंभात सामील झालेल्या सर्वांचे आभार मानले .
झाले साहित्याचा महाकुंभ तर संपला . यातून मराठी भाषेला काय मिळाले ?
यातुन कुणाचा फायदा झाला ? इंग्रजीचे वर्चस्व असलेल्या मराठी मनावर याचा किती असर झालाय ?
यातून मराठी माणसे जोडली गेली . पण मराठी मन जागृत झाले का ?
रोजचे जगणे जिथे कठीण होत आहे त्याला हा साहित्य सोहळा कसा रुचेल ?
मराठी वाढली पाहिजे . तिचे संगोपन झाले पाहिजे . विविध भाषेतील चांगले साहित्य मराठीत आले पाहिजे. त्यासाठी मराठी विद्यापीठ होणे हाच उपाय आहे काय?
सारेच प्रकरण गंभीर आहे. याची उपाययोजनाही तेवढ्या गांभीर्याने करण्यात येते काय ?
खरेच सोहळा पार पडला मात्र यातून काय साधले गेले ?
तुमचे मत मोकळेपणाने लिहाल काय ............

सुभाष इनामदार , पुणे
subhashinamdar@gmail.com