व्यंगचित्राच्या दुनियेत आपले नाव कोरलेले मंगेश तेंडूलकर यांनी व्यंगचित्र
कागदावर उमटतात कशी ?
"आयुष्याच्या प्रवाहात तुम्ही जर सतर्क उभे राहिलात की
एखादी विनोदी कल्पना माशासारखी चटकन क्लिक होते.
ती तिथून उचलायची आणि थेट कागदावर उतरायची',
मंगेश तेंडूलकर सांगतात.फोटो आणि कॅरिकेचर मधला फरक सांगताना ते म्हणतात,
फोटो हा चेहऱ्याची कॉपी असते. व्यंगचित्रातला चेहरा त्या व्यक्तिच्या स्वभाव
वैषिष्ठ्यासह कागदावर रेखाटता येते.
हेच क्ररिकेचरचे वेगळेपण आहे.
वयाच्या १८ व्या वर्षा पासून व्यंगचित्रे काढणारे तेंडूलकर वयाच्या ७२ व्या वर्षीही
तेवढ्याच उत्साहाने नविन कल्पना कागदावर रेखाटताहेत.
त्यांच्या समीक्षात्मक लेखनातही ते वारंवार अनुभवता येते.
दिसताना तेंडूलकर गंभीर दिसतात.
पण त्यांच्यातला मिश्किल भाव त्यांच्या व्यंगचित्रातून उमटतो.
कुठलेही व्यंगचित्र वास्तवतेची सीमा ओलांडून क्रिएटिव्ह बनून
तुम्हाला जे म्हणायचे आहे ते अचूक सांगते .
वास्तवतेला इतके भव्य स्वरूप व्यंगचित्रातूनच अंगावर येते.
आपल्या व्यंगचित्राच्या दुनियेत वावरताना पहाणे आणि