Saturday, May 15, 2010
रानभूल- सुबोध भावेसाठी पहा
चेहरा, डोळे आणि कृतीतून सुबोध भावेचा अंगावर येणारा अभिनय. प्रेक्षकांना दीड तास थरारक अमुभव देणारा चित्रपट . संजय सूरकरांनी साकारलेला मराठीतला पहिला सायको चित्रपट. वातावरण निर्मिती आणि पार्श्वसंगीतातून गीटारवर वाजणारी धून .सारेच वातावरण भारून टाकणारे.
रानभूलने त्याचा अनुभव दिला. तो अंगावर आला. मराठीत वेगळ्याविषयावर केलेल्या या निर्मितीचे स्वागतच केले पाहिजे.
रेवाची भुमिका साकारणा-या तेजश्री पंडीत हिने ग्लोबल मराठीशी बोलताना सांगितलेल्या ज्या गोष्टी भावल्या त्यापैकी एक म्हणजे ,आजच्या यूथने काय करू नये हे सांगण्याचा चित्रपटात सहज प्रयत्न होतो.
ओंकार एंटरटेनमेंटची 'आई शप्पथ' नंतरची ही निर्मिती. प्रतिभा मेंढेंकर आणि सहनिर्माते अभय शेवडे यांची ही निर्मिती. आलेला प्रत्येक प्रेक्षक आता पुढे काय होणार. कुणाचा जीव जाणार या दबावाखाली एकेक सिन पहात आसतो. त्याला विचाराची क्षणभरही उसंत न देता गतीमान आणि वेगवान पध्दतीने संजय सूरकर यांनी कथानकाला चित्रीत करून प्रेक्षकांना भूलवित ठेवले आहे.
सायकोथ्रिलरच्या चित्रिकरणाची बाजू पुष्पांग गावडे यांनी सांभाळली. प्रत्येक प्रसंगात कॅमेरातून काय ठसवायचे ते ते बरोबर साधतात. गिरीश जोशीच्या कथानकाला आणि संवादाला साथ मिळाली ती उत्तम कलाकारांच्या अभिनयाने. सुबोधच्या आजवरच्या करियरमधला लोकोश साटमचा हा रोल आजवरच्या कारकीर्दीमधला वेगळा वाटावा असाच आहे. तेजश्री पंडीत, दीक्षा महेंद्रू आणि गार्गी दातार यांच्या भूमिकांनी थरारपट अधिक अंगावर येतो.
शेवटच्या स्मरणशक्तीच्या खेळातला प्रसंग आत्ताही शहारे आणतो.
एकदा चित्रपटगृहाकडे फिरकलेला प्रेक्षक ह्या चित्रपटात गुंतून जाईल अशी भूल गिरीश जोशीच्या लेखनात आणि संजय सूरकरांच्या दिग्दर्शनात आहे. मोहन जोशी, विनय आपटे, मंगला केंकरे याच्या साथीने रानभूल फुलत गेला. ती भूल सहजी उतरत नाही.
माणसा-माणसांच्या संबंधावर आणि आजच्या थोड्या स्वतंत्र जगण्यामूळे कुटुंबात होत असेलेले बदल, त्यातून मुलांवर होणारे विपरीत संस्कार याची जाणीव लेखकाने प्रकर्षाने करून दिली आहे.
मराठी चित्रपटांचे विश्व विस्तारत चालले आहे. फेसबुक, वेबकॅम आणि अधुनिकतेची भूतेही रानभूलचा दरवाजा ठोठावतात.
रहस्यकथा आवडणा-या रसिकालाही रानभूल खेचून आणू शकेल.
subhash inamdar
subhashinamdar@gmail.com
9552596276
Monday, May 10, 2010
Dog travel from Bike
मोटारसायकलचे वेड तरूणांपासून सा-यांनाच असते हे मान्य. पण मोटारसायकलच्या मागे मस्त मजेत चार पाय घेऊन फिरणारा कुत्रा पाहिला आणि वेगळे वाटले. सिंहगड रोडवरच्या गोपाळ दौंडकर यांच्या मागच्या सिटवर डी.जे (कुत्र्याचे नाव बरका)) आरामात फिरत चाललेला होता. बसण्याची स्टाईलही भारीच. गोपाळरावांनी गाडीला किक मारली की डीजे त्यांच्या मागोमाग धावतो. आणि गाडी थांबली की छानपणे तो गाडीवर स्वार होतो.
माॅडर्न महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत घाटे यांच्या सांगणायवरून कारवानी जातीचा हा कुत्रा जानेवारी २००९ ला त्यांनी घरी आणला. त्याला गाडीवर फिरायची आता सवयच लागली आहे.
हळूहळू गल्लीत. नंतर आनंदनगरच्या रस्त्यावर आणि आता तर चिंचवड पर्यंत तीस-चाळीस किलोमिटर प्रवास डीजे न त्रास देता करतो. इ तर वाहन चालक हा प्रवास कुतूहलाने पहात असतात
पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयाच्या झुलॉजीच्या लॅबमध्ये ते लॅब असिस्टंटचे काम करतात. पण प्राण्यांची आवड. गेली कांही वर्षे दोन पोपट पाळले होते. चवथ्या मजल्यावरच्या गच्चीत त्यांची सरबराई करण्यात सारे कुटंबीयच गुंतलेले असते. आता ह्या डीजेचा लळा लागलाय.
डीजेलाही फिरायची सवय झाली आहे. घरात कुत्रा असूनही त्याला ते कधी बांधत नाहीत. घरात येणा-याचा तो वास घेतो. घरातले एकदा ओरडले की शांत बसतो.
तसा तो दिसायला धिप्पाड. पण तेवढाच प्रेमळ. ड ोळ्यात तेज. चालण्यात डैाल.
आता रोजच डीजे ला अशी चक्कर लागते.
शिवाजीमहारांच्या काळात त्यांच्यावर प्रेम करणा-्या इमानी कुत्र्याची आजही आठवण केली जाते. त्यांची समाधीही रायगडावर आहे.
http://khattamitha.blogspot.com/2008/02/blog-post_09.html
ह्यावर त्या इमानी कुत्र्याचा इतिहास सांगितला आहे.
आजच्या विज्ञानाच्या काळातही बाईकवर स्वारी करणारा हा कुत्राही तुमच्या लक्षात राहील.
असे कांही तुमच्याकडे असले तुम्हीही पाहिलेत तर ते आम्हाला फोटोद्वारे किंवा व्हिडीओ करून पाठवा . आम्ही ते नक्कीच ग्लोबल मराठीवर प्रसिध्द करू.
आमचा मेल आहे.
subhash.inamdar@myvishwa. com
blogers लेखकांना global मराठीचा आधार
कवीता, अनुभव आणि विविध विषयावरच्या लेखनातून blog ची संख्यां वाढती आहे. इतर भाषेतले साहित्य मराठीत आणण्यासाठी blog vishwa विस्तारण्याची गरज आहे. मराठी लेखकांनी या माध्यमाचा फायदा घेउन वाचकांना विविधअंगी भांडार उपलब्ध करून दिल्याने विश्वासहार्यता वाढणार आहे. वेळ जाण्याचे माध्यम म्हणून हा भाग नाही. तो अधिक गंभीर व परिणामकारक भाग आहे. रंजकता नसून त्यात चिंतनशिलता असावी.
हे सारे मुद्दे रविवारी मुंबईत झालेल्या ब्लाॅगर्सच्या मेळाव्यात व्यक्त झालेले मुद्दे आहेत.
मराठीत लिहिणा-या ब्लाॅगर्सच्या मेळाव्याला शंभराहून अधिक जण वेगवेळ्या ठिकाणाहून एकत्र आले होते.
वेगवेगळ्या नावांनी लेखन करणारी ही उद्याची लेखक मंडळी. स्वतःचे भावविश्व रंगविणारे आणि आपण काय लिहले ते इतरांनी वाचावे आणि त्यावर प्रतिक्रिया द्यावी एवढाच त्यांचा माफक हेतू.
मात्र या blogspot and wordpress वर लेखन करणारे केवळ तरूणच असे नाहीत तर आर्यनची दुनिया सांगणा-या दोन वर्षाच्या आर्यन पासुन ते ७६ वयाच्या विलेपा्र्लेच्या आजोबांपर्यत सारेच इथे होते.
भेटीगाठीच्या स्वरूपाला अखेरच्या सत्रात मराठी लिपीबाबात च्रर्चा झाली. काही मार्गही सुचविले गेले.
काॅपीराईटचा मुद्दाही स्पर्शून गेला.
एकेक जण तीन -चार विषयावर आपल्या प्रतिभेचे कोंदण जपत लेखन करूत असते. एवढेच नाही तर लिना मेहेंदळे सारख्या विदुषी सरकारी सेवेत असूनही ३२ विषयाच्या वर्गीकरणानुसार लेखन करूत असतात ते ऐकून अनंद झाला आणि वयाने लहान असलो तरी काैतूक वाटले.
www.globalmarathi.org या वेबसाईटकडून आम्ही दस्तूर खुद्द या लेखकांनी हमी देउन आलो की तुमच्यातले चांगल्या लेखकानी मराठीच्या विश्वपीठावर नक्की ओढून घेऊ.
तसे पाहिले तर हे विश्व छोटे. त्यात मराठी. भाषा समृध्द पण तीला ओढ आहे ती परकीय भाषेची.
म्हणूनच लेखक वाढावावेत. त्यांच्यात सातत्या यावे आणि हा लेखनप्रकार दीर्घ काळ लिहता रहावा यासाठी या मेळाव्याचे आयोजकांचे आभारच मानले पाहिजेत.
लेखन करावे ही उर्मी यावी लागते. ता या मंडळींना आहे. तीचे स्वरूप गंगेच्या प्रवाहासारखे विस्तीर्ण व्हावे हिच अपेक्षा आणि तोच प्रयत्न.
शेवटी हि संकल्पना कांचन कराई, महेंद्र कुलकर्णी व रोहन चौधरींची. त्यांच्या पुढील संमेलनाच्या वेळीही यापेक्षा ही संख्या हजारावर पोचावी ही इच्छा.
मेळावा मुंबईत असला तरी पुणे, नाशिक हैद्राबादपासूनचे लेखक आले. त्यांचा आत्मपरीचय झाला. हेच यश.
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Subscribe to:
Posts (Atom)