Saturday, May 15, 2010
रानभूल- सुबोध भावेसाठी पहा
चेहरा, डोळे आणि कृतीतून सुबोध भावेचा अंगावर येणारा अभिनय. प्रेक्षकांना दीड तास थरारक अमुभव देणारा चित्रपट . संजय सूरकरांनी साकारलेला मराठीतला पहिला सायको चित्रपट. वातावरण निर्मिती आणि पार्श्वसंगीतातून गीटारवर वाजणारी धून .सारेच वातावरण भारून टाकणारे.
रानभूलने त्याचा अनुभव दिला. तो अंगावर आला. मराठीत वेगळ्याविषयावर केलेल्या या निर्मितीचे स्वागतच केले पाहिजे.
रेवाची भुमिका साकारणा-या तेजश्री पंडीत हिने ग्लोबल मराठीशी बोलताना सांगितलेल्या ज्या गोष्टी भावल्या त्यापैकी एक म्हणजे ,आजच्या यूथने काय करू नये हे सांगण्याचा चित्रपटात सहज प्रयत्न होतो.
ओंकार एंटरटेनमेंटची 'आई शप्पथ' नंतरची ही निर्मिती. प्रतिभा मेंढेंकर आणि सहनिर्माते अभय शेवडे यांची ही निर्मिती. आलेला प्रत्येक प्रेक्षक आता पुढे काय होणार. कुणाचा जीव जाणार या दबावाखाली एकेक सिन पहात आसतो. त्याला विचाराची क्षणभरही उसंत न देता गतीमान आणि वेगवान पध्दतीने संजय सूरकर यांनी कथानकाला चित्रीत करून प्रेक्षकांना भूलवित ठेवले आहे.
सायकोथ्रिलरच्या चित्रिकरणाची बाजू पुष्पांग गावडे यांनी सांभाळली. प्रत्येक प्रसंगात कॅमेरातून काय ठसवायचे ते ते बरोबर साधतात. गिरीश जोशीच्या कथानकाला आणि संवादाला साथ मिळाली ती उत्तम कलाकारांच्या अभिनयाने. सुबोधच्या आजवरच्या करियरमधला लोकोश साटमचा हा रोल आजवरच्या कारकीर्दीमधला वेगळा वाटावा असाच आहे. तेजश्री पंडीत, दीक्षा महेंद्रू आणि गार्गी दातार यांच्या भूमिकांनी थरारपट अधिक अंगावर येतो.
शेवटच्या स्मरणशक्तीच्या खेळातला प्रसंग आत्ताही शहारे आणतो.
एकदा चित्रपटगृहाकडे फिरकलेला प्रेक्षक ह्या चित्रपटात गुंतून जाईल अशी भूल गिरीश जोशीच्या लेखनात आणि संजय सूरकरांच्या दिग्दर्शनात आहे. मोहन जोशी, विनय आपटे, मंगला केंकरे याच्या साथीने रानभूल फुलत गेला. ती भूल सहजी उतरत नाही.
माणसा-माणसांच्या संबंधावर आणि आजच्या थोड्या स्वतंत्र जगण्यामूळे कुटुंबात होत असेलेले बदल, त्यातून मुलांवर होणारे विपरीत संस्कार याची जाणीव लेखकाने प्रकर्षाने करून दिली आहे.
मराठी चित्रपटांचे विश्व विस्तारत चालले आहे. फेसबुक, वेबकॅम आणि अधुनिकतेची भूतेही रानभूलचा दरवाजा ठोठावतात.
रहस्यकथा आवडणा-या रसिकालाही रानभूल खेचून आणू शकेल.
subhash inamdar
subhashinamdar@gmail.com
9552596276
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment