Saturday, March 10, 2012

`व्हायोलिन गाते तेंव्हा...`कार्यक्रमाची ऑडिओ




When Violin sings..for the aid of lok biradari of Hemalkasa


आता ह्या सर्व कार्यक्रमाची ऑडिओ आपण You Tube च्या माध्यमातून ऐकता योणार आहे. आपल्या मित्रांनाही सांगा...जरूर पहा आणि प्रतिक्रिया पाठवा...subhashinamdar@gmail.com..Mob.9552596276

http://www.youtube.com/watch?v=MqDVFC7KefM&feature=plcp&context=C49dccb5VDvjVQa1PpcFMgQ3J4bOu27_uYoa0Vz11bJiLbPu1lwI0%3D

Tuesday, March 6, 2012

निसर्गातले रंग


निसर्गाच्या रंगांची उधळण
झाली किती इथ आता..
कुठला रंग कधी खेळी
ठरणार ना एका अवधी..

वेली,फुलांनी डौलदार
बहार आणला
त्यांच्या रंग-रुपांनी
आकार जीवना आला...

प्रत्येक झाड रंगातच सामोरे
कधी एकसारखे
तर कधी वेगळेच भासते..
भूलून जाया काया ती सहज होते
सततचे सन्नीध रहावे जरुर असे वाटते....

निसर्गातले रंग बरेच काही देउन जातात..
तुमचे-आमचे कृत्रिम रंग कधी ओरखडा काढतात..
सारे ठरवून सोडूया हा घात
गाऊया निसर्गाचा रंगीत आलाप..



सुभाष इनामदार,पुणे

Monday, March 5, 2012

होते माझे तरीही


लांबून पहा सजणा
चेहरा तुझा हसरा
लपला गोडवा त्यातला
पाहिन तो केधवा..

आज लोपले ते सारे
मजला दावूनी गेले
होते माझे तरीही
विसरुन कसा गेला गे..

तुझ्या आठवणीत सारे
काळ-वेळ ना उरली
दिसली तरीही मजला
कुठे शोधशी अकेली..

तू दूर दूर तेथे
पळभर आठव येतो
कशी धुंदता जीवाची
क्षणभंगूर जीवनाची.............



subhash inamdar

Sunday, March 4, 2012

ही अशी अवस्था



एक मन धावते जगाच्या पाठीवर
दुसरे बसले घरी
कान लावून...

शरीराचा हा डोलारा
त्या मनाच्या कोंदणाने
भारलेला...नटलेला

जेव्हा जवळ असते
शरीर आणि मन
तेव्हा मात्र
वाचा बनते मूक...

भावना गोठावून जातात
शब्द ओठात येतात
कुठे गुडूप होतात
काय की?

ही अशी अवस्था
फार काळ ठिक नाही
गुंतून घ्यायला हवेय..
मनाला दुस-या कृतीकडे
ओढून नेणे गरजेचे....


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com

अखेर आयुष्य म्हणजे तरी..


तुला जाणून घेतले
वाटले होते मला...
पण..आज लक्षात आले ,
नक्की..ओळखले का तुला...

केवळ आयुष्यात एकमेकांसमवेत
सात फेरी करुन
कळते का सारे?

प्रश्न सुटत नाहीत
गुंतागुंत वाढत रहाते..
एकातून दुसरे प्रश्न
नव्याने आ वासून
उभे ठाकतात.

कांही सुटतात..
काही निसटतात.
काही तर नसतातही..

सारे शंकांचे वादळ
आय़ुष्यभर तुमच्यासमवेत
घोंघावत रहाते...

अखेर आयुष्य म्हणजे तरी..
गुंतून रहाणे...
शब्दांशिवाय समजून घेणे...
काही विसरायचं
काही सोडून द्यायचे....



सुभाष इनामदार, पुणे