Sunday, March 4, 2012

ही अशी अवस्था



एक मन धावते जगाच्या पाठीवर
दुसरे बसले घरी
कान लावून...

शरीराचा हा डोलारा
त्या मनाच्या कोंदणाने
भारलेला...नटलेला

जेव्हा जवळ असते
शरीर आणि मन
तेव्हा मात्र
वाचा बनते मूक...

भावना गोठावून जातात
शब्द ओठात येतात
कुठे गुडूप होतात
काय की?

ही अशी अवस्था
फार काळ ठिक नाही
गुंतून घ्यायला हवेय..
मनाला दुस-या कृतीकडे
ओढून नेणे गरजेचे....


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com

No comments: