अखेर आयुष्य म्हणजे तरी..
तुला जाणून घेतले
वाटले होते मला...
पण..आज लक्षात आले ,
नक्की..ओळखले का तुला...
केवळ आयुष्यात एकमेकांसमवेत
सात फेरी करुन
कळते का सारे?
प्रश्न सुटत नाहीत
गुंतागुंत वाढत रहाते..
एकातून दुसरे प्रश्न
नव्याने आ वासून
उभे ठाकतात.
कांही सुटतात..
काही निसटतात.
काही तर नसतातही..
सारे शंकांचे वादळ
आय़ुष्यभर तुमच्यासमवेत
घोंघावत रहाते...
अखेर आयुष्य म्हणजे तरी..
गुंतून रहाणे...
शब्दांशिवाय समजून घेणे...
काही विसरायचं
काही सोडून द्यायचे....सुभाष इनामदार, पुणे
No comments:
Post a Comment