गोल्डन मेमरीज प्रस्तुत.. गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या युगल गीतांचा नजराणा..
चैत्राली अभ्यंकर, शशांक दिवेकर, मिनल पोंक्षे आणि हेमंत वाळुंजकर यांनी अशी काही गायली की रसिक खुष होऊन ती पुन्हा ऐकण्यासाठी उत्सुक होता..
स्नेहल दामले यांचे गाण्याची गोष्ट..आणि बाबूजींच्या जीवनातील प्रसंग. अभ्यासपूर्ण रसाळ भाषेची किमया साधून गाण्यापाठीमागचे सारे पुढे मनात साठत गेले.
राजेंद्र हसबनिस, ऋतुराज कोरे, प्रसन्न बाम आणि केदार परांजपे यांची बंदिस्त साथ.. यामुळे रंगमंच स्वर संगीताच्या तालावर डोलत होता..
बारा वर्षांपूर्वी प्रथमच बाबूजींची ही गाणी तयार झाली..
निर्मिती आणि संकल्पना चैत्राली अभ्यंकर यांनी कार्यक्रमात मांडली..
तपपूर्ती होताना अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ निवेदक आनंद देशमुख आणि विनया देसाई, तसेच जयंत भावे..आणि चैत्राली यांच्या मातोश्री यांच्या हस्ते दीप पूजन करून सुरवात झाली.
मोहित नामजोशी यांच्या उत्तम ध्वनिव्यवस्थेने कार्यक्रमास चार चांद लागले..
अमित अभ्यंकर यांची साथ मिळाल्याने कार्यक्रम सुनियोजित साजरा झाला.
फिटे अंधाराचे जाळे..
धुंद एकांत हा...
रूपास भाळले मी..
नवीन आज चंद्रमा..
स्वप्नात रंगले मी..
बालगीत.. तुझ्या गळा..
हवास मज तू..
धुंदी कळ्यांना ..
शब्दरूप आले मुक्या भावनांना...
आज चांदणे हासले ..तुझ्यामुळे..
मराठी मनाला समृद्ध करणारे दोन भिन्न स्वभावाचे मित्र
जाशील कोठे मुला तू..
विठू माऊली..
तुझी माझी प्रीत जगावेगळी..
तुला न कळले..मला न कळले..
शापित.. दिस जातील.. दिस येतील..
माझ्या रे प्रीती फुला..
डोळ्यात गीत माझे तू गीत भावनांचे..
चंद्र आहे साक्षीला..
वंशाचा दिवा.. ललिता.. फडके..
वसंतराव..देशपांडे..
रंगू बाजाराला जाते ..जाऊद्या..
कानडा राजा पंढरीचा..
सुधीर फडके यांच्या १११ चित्रपटातून काही मोजकीच गाणी ..पण युगल..किंवा..दोन गायकांनी गायलेली रचना निवडण्यात आली..
स्वरांचा.... तालांचा..टाळ्यांचा..नाद करत तो बहरात आला..आणि संपला देखील..
३० जुलै..२०२५..पुण्यात
- Subhash Inmadar, Pune
subhashinamdar@gmail.com