कविकुलगुरू कालिदासांच्या मेघदूत या काव्यातले निसर्गाचे वर्णन आणि त्यातल्या सौंदर्यात्मक रचनांचा कार्यक्रम पुणेकरांनी अनुभवला. आषाढस्य प्रथमदिवसाच्या निमित्ताने कोथरूडच्या साधना कला मंचाने सादर केलेल्या काय्रक्रमाने रसिक भारावून गेले.. कालिदासाच्या भाषेतील सौंदर्यस्थळे ऐकताना आणि पाहताना मन हरखून जाते. निवेदन, नृत्य आमि संगीत तीनही दृष्ट्या कार्यक्रम वैशिष्ठ्यपूर्ण होता. याची निर्मिती, संकल्पना आणि संगीताची बाजू चैतन्य कुंटे यांनी उत्तम सांभाळली. त्यासाठी त्यांनी कालिदासाच्या काव्याचा केलेला सखोल अभ्यास तो अनुभवताना जाणवत होता. संध्या धर्म यांच्या नृत्यरचनेतले वेगळेपण आणि रचनेचा थाट अधिक खुलवितो.
Saturday, July 5, 2008
Friday, July 4, 2008
कीर्तन महोत्सवाची सांगता
आबासाहेब पटवर्धन स्मृतिदिनानिमित्त तीन दिवस आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवाचा समारोप संस्कृती भूषण पुरस्काराचे मानकरी राष्ट्रीय कीर्तनकार मोरेश्वर नागनाथ जोशी ऊर्फ चऱ्होलीकर बुवांच्या कीर्तनाने झाला. त्यांच्या कीर्तनाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. स्वामी दामोदरानंद सरस्वती (कर्नाटक) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून गुरुवारच्या शेवटच्या सत्राचे उद्घाटन केले गेले. चऱ्होलीकर बुवांनी आपल्याला मिळालेल्या पुरस्काराची रक्कम पटवर्धन स्मृती समितीकडे सुपूर्द केली. कीर्तनप्रेमी पुणेकरांच्या मोठ्या प्रतिसादाने कीर्तनाची रंगत उत्तरोत्तर वाढतच गेली
Thursday, July 3, 2008
परंपरा जपणारे कीर्तनकार आहेत
"संत ज्ञानेश्वर महाराजांनी "विश्वचि माझे घर' आणि "दुरितांचे तिमिर जाओ' या सिद्ध योग मंत्राने जगाला आपलेसे केले. हीच परंपरा पुढे चालू ठेवणारे महान कीर्तनकार आपल्याकडे आहेत'- नारायणकाका ढेकणे महाराज. आबासाहेब पटवर्धन स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा पहिला "संस्कृती भूषण पुरस्कार' बुधवारी पुण्यात भरत नाट्य मंदीरात समारंभपूर्वक देण्यात आला. तीन दिवसांचा कीर्तन महोत्सव यासाठी आयोजित केला गेला होता.
Wednesday, July 2, 2008
तीन दिवस कीर्तनाचा गजर
आबासाहेब पटवर्धन स्मृती समितीच्या वतीने होत असलेल्या तीन दिवसांच्या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन वासुदेवानंद स्वामी महाराज (फुरसुंगी) यांच्या हस्ते मंगळवारी भरत नाट्यमंदिरात झाले. व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. कीर्तन पद्धतीचा वापर व्यवस्थापनशास्त्रात केला, तर विद्यार्थ्यांना अभ्यास लगेच लक्षात राहील, असे मत व्यवस्थापन क्षेत्रातले दीपक आपटे यांनी मांडले. आज शुद्ध मराठी वापरले जात नाही. मराठीचा स्वाभिमान केवळ घोषणांपुरता होता. मराठीची ही अवस्था; तर देव भाषा म्हणजे संस्कृतची काय अवस्था होईल, याची कल्पनाच केलेली बरी, अशी चिंता वासुदेवानंद स्वामी महाराज यांनी व्यक्त केली. तीन दिवस होणाऱ्या या कीर्तन महोत्सवात रोज एक कीर्तन आणि कीर्तनकाराचा सत्कार केला जाणार आहे. पुण्यात देवळा-देवळांत कीर्तनांचा गजर होत असतो. पण आज नाट्यमंदिरात तो होत आहे, हे विशेष.
Monday, June 30, 2008
मल्हाराच्या बंदिशींनी पुणेकर मंत्रमुग्ध !
जयंतमल्हार, चॉंदनी मल्हार, गौडमल्हार, सुहा मल्हार, मियॉं मल्हार, सूरमल्हार अशा विविध "मल्हार' सुरावटींच्या सरींची बरसात रसिकांनी रविवारी २९ जुन २००८ रोजी टिळक स्मारक मंदिरात अनुभवली.
पावसाळ्याचे औचित्य साधून या मैफलीत देवकी पंडित यांनी "मल्हार' रागाचे विविध प्रकार सादर केले.
मैफलीची व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पावसाळ्याचे औचित्य साधून या मैफलीत देवकी पंडित यांनी "मल्हार' रागाचे विविध प्रकार सादर केले.
मैफलीची व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
जन्मभूमीबरोबर कर्मभूमीही महत्त्वाचीः आर. आर. पाटील
"आम्ही सांगलीकर' या पुण्यातल्या संस्थेच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शनिवारी २८ जून २००८ रोजी बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केलेल्या सांगलीकरांच्या मेळाव्याला उपमुख्यमंत्री आणि सांगलीकर आर. आर. पाटील खास उपस्थित होते.
पुण्यात राहताना आपल्या जन्मभूमीची आठवण ठेवली पाहिजे, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
सांगलीकरांच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पुण्यात राहताना आपल्या जन्मभूमीची आठवण ठेवली पाहिजे, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
सांगलीकरांच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Sunday, June 29, 2008
पुणेकरांच्या अन्नदानाने वारकरी तृप्त
ज्ञानोबा माऊली तुकारांमांच्या गजराने आज पुणे शहर उत्साहात नटले आहे. पहाटे पासून वारकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यांची स्नानाची, चहा-न्याहरीची सोय करण्यासाठी लहान मोठी मंडळे, संस्था, दुकानदार. मार्केट यार्ड मधले व्यापारी, राजकीय कार्यकर्ते, खासगी व्यक्ती सारेच तयारीत असल्याचे चित्र जागोजागी दिसत होते. "आमच्यावर पुण्यातेल लहान-थोर प्रेम करताना पाहिले की ,मन भरून येते.असा आमचा पाहुणचार इतरत्र होत नाही, 'अशी वाक्ये कांही वारकऱ्यांच्या मुखातून येत होती. ज्या घरात आम्ही मुक्काम करतो तीथली लहान मुलेही अम्हाला पवे-नको ते विचारतात त्याचा आनंद वाटत असल्याचे वारकरी बोलतात.
अभंग आणि भजनांच्या ध्वनीमुद्रीका लावून वारकऱ्यांना आमंत्रण दिले जाते. त्यांची क्षुधा शांत व्हावी यासाठी जणू सारेच पुणे नटले असल्याचे चित्र दिसत होते.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पर्वतीवर दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची स्नानाची, प्रसादाची एवढेच काय "कटींग-दाढीची' सोय केली आहे .त्यांची चप्पल दुरूस्ती ,छत्री, कपड्यांची शिलाई. त्यांना साबण, तेलाची पुडी देणारे कार्यकर्ते दिसत होते. पर्वतीच्या समोर असलेल्या केंजळे परिवाराकडून राजगीऱ्याच्या लाडूंचे वाटप चालू होते.
पर्वतीवर जाणाऱ्या वारकऱ्यांमुळे परिसरीत गजबजाट तर होताच पण नोकरदारांची वाहनेही खोळांबळ्याचे चित्र जाणवत होते.
सारसबागेतल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी मोठ्या भावीकतेने येत होते.
बाजीराव रस्त्यावरच्या "माडीवाले कॉलीनी मित्र मंडळ"ाच्या वतीने उप्पीट-चहा देण्यात येत होते.
बीएसएनएलच्या कर्मचारी संघाने वारकऱ्याच्या भोजनाची व्यवस्था तर केलीच होती पण त्यांच्यासाठी मोफत फोनची सुविधा करण्याचे ते विसरले नाहीत.
आळंदीहून निघालेल्या वारकऱ्यांचा मुक्काम पुण्यात आज होतोय याची खूण शहरातल्या प्रत्येक रस्तावर दिसती आहे.

Subscribe to:
Posts (Atom)