ज्ञानोबा माऊली तुकारांमांच्या गजराने आज पुणे शहर उत्साहात नटले आहे. पहाटे पासून वारकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यांची स्नानाची, चहा-न्याहरीची सोय करण्यासाठी लहान मोठी मंडळे, संस्था, दुकानदार. मार्केट यार्ड मधले व्यापारी, राजकीय कार्यकर्ते, खासगी व्यक्ती सारेच तयारीत असल्याचे चित्र जागोजागी दिसत होते. "आमच्यावर पुण्यातेल लहान-थोर प्रेम करताना पाहिले की ,मन भरून येते.असा आमचा पाहुणचार इतरत्र होत नाही, 'अशी वाक्ये कांही वारकऱ्यांच्या मुखातून येत होती. ज्या घरात आम्ही मुक्काम करतो तीथली लहान मुलेही अम्हाला पवे-नको ते विचारतात त्याचा आनंद वाटत असल्याचे वारकरी बोलतात.
अभंग आणि भजनांच्या ध्वनीमुद्रीका लावून वारकऱ्यांना आमंत्रण दिले जाते. त्यांची क्षुधा शांत व्हावी यासाठी जणू सारेच पुणे नटले असल्याचे चित्र दिसत होते.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पर्वतीवर दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची स्नानाची, प्रसादाची एवढेच काय "कटींग-दाढीची' सोय केली आहे .त्यांची चप्पल दुरूस्ती ,छत्री, कपड्यांची शिलाई. त्यांना साबण, तेलाची पुडी देणारे कार्यकर्ते दिसत होते. पर्वतीच्या समोर असलेल्या केंजळे परिवाराकडून राजगीऱ्याच्या लाडूंचे वाटप चालू होते.
पर्वतीवर जाणाऱ्या वारकऱ्यांमुळे परिसरीत गजबजाट तर होताच पण नोकरदारांची वाहनेही खोळांबळ्याचे चित्र जाणवत होते.
सारसबागेतल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी मोठ्या भावीकतेने येत होते.
बाजीराव रस्त्यावरच्या "माडीवाले कॉलीनी मित्र मंडळ"ाच्या वतीने उप्पीट-चहा देण्यात येत होते.
बीएसएनएलच्या कर्मचारी संघाने वारकऱ्याच्या भोजनाची व्यवस्था तर केलीच होती पण त्यांच्यासाठी मोफत फोनची सुविधा करण्याचे ते विसरले नाहीत.
आळंदीहून निघालेल्या वारकऱ्यांचा मुक्काम पुण्यात आज होतोय याची खूण शहरातल्या प्रत्येक रस्तावर दिसती आहे.
No comments:
Post a Comment