हे आकाशात विहरणा-या
पावसाच्या ढगांनो
तुझ्या थोड्याश्या
पृथ्वीवरच्या बरसण्याने
उल्हसित झालेली ही
प्राणीमात्रे..तुझी आभारी आहेत..
खरयं, आम्ही तझ्या
आगमनाकडे डोळे लख्ख उघडे ठेऊन वाट पहातो
पण तो बरसावा यासाठी
पर्यावरणाचे नियम पाळत नाही
झाडे तोडून उंच सिमेटच्या
इमारती बांधतो
त्यावर आपली स्वप्ने
साकारावी म्हणून कुंड्यातून छोटी रोपे लावतो
पण तुझा निसर्ग नष्ट
करत..स्वतःचे महत्व सिध्द करतो..
खेड्यातही काहीसे
असेच चित्र तुला दिसेल..
शेतीची जमीन कमी होत
चालली आहे..
पिढ्या-पिढ्यांची
जमीन राखण्यापेक्षा त्यातून पैसा अधिक येईल
लौकिक अर्थाने सुख
अधिक कसे मिळेल
कमी श्रमात अधिक दाम
हेच आमचे सूत्र बनले
आहे...
डोंगरही नष्ट होऊन
तिथे वाहनांसाठी रस्ते बनताहेत
तुकडे करुन त्यावर
आपली छपरे उभारण्याचे बळ वाढते आहे
तू दिलेले निसर्गाचे
वरदान नष्ट होत चालले पाहून तू रुसला असशील
कदाचित शहरांकडे वाढणारी
प्रचंड गर्दीही तुला सतत दिसत असेल
पण अधिच मेटाकुटीला
आलेला हा देह क्षमविण्यासाठी आम्हालाही दुसरा मार्ग नाही
पण तू मात्र सारे
पहातो आहेस..
आमच्या शहरी
भागाकडे..थोडे दुर्लक्ष केलेस तरी चालेल
जिथे शेती आहे..आणि
जे तुझ्या प्रतिक्षेत बीजरोपण करून तुझ्या आगमनाची
डोळ्यात प्राण आणून
वाट पहात आहेत
तिथे मात्र आवश्य
बरस
तुझा आर्शीर्वाद
त्या बिचा-या लेकरांवर नक्की असू देत..
आता थोडा तू
दिसतोसस.भासतोस..अस्तित्वाच्या खूणा धरतीवर दाखवितोस
म्हणून तर
अस्तित्वाच्या आनंदाने ..तुझे स्वागत करतानाही मन भरून येते
थोडा सूर्य झाकला
गेला तरी चालेल..
आभाळ भरलेले हवे
नवे अंकूर फुललेली
नवी बीजे जमीनीतून वर डोकवायलाच हवीत..
हे आकाशस्थ ढगांने
तुझी महती महान आहे
तुझ्या छायेत
राहण्यातही आनंद समाधान आहे
पुन्हा एकदा तुझी
प्रार्थना करतो
तुला साकडे घालतो
तू ये..आणि आमच्यावर
वर्षाव कर
- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com