शिष्यांनी अर्पण केलेली सत्काररूपी कृतज्ञतेची ओंजळ विनम्रतेने स्वीकारत पं.सुरेश तळवलकर सत्काराला उत्तर देताना म्हणाले, ""गुरूंनी मला "तबला' दिला, शिकवला आणि संस्कार दिले. तबला केवळ वाजवायला नाही, तर पाहायला, ऐकायला शिकवले. ''
शनिवारी सुरेश तळवलकरांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्ताने पं.शिवकुमार शर्मा यांच्या हस्ते त्यांचा निमंत्रित रसिकांच्या आणि चाहत्यांच्या उपस्थितीत पुण्यात जाहिर सत्कार केला गेला. त्यांच्या तबला वादनाचे वैशिष्ठ्य सांगणारी स्मरणिका पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते प्रकाशित केली.
या समारंभासाठी तळवलकरांना जगातल्या ड्रम्स वादकांच्या वतीने शिवमणीने चेन्नईहून उपस्थित राहून खास बुके देऊन शुभेच्या दिल्या.
दृष्ट लागावा असा सत्कार सोहळा या निमित्ताने पुणेकरांनी अनुभवला.
त्याच कार्यक्रमाची झलक अनुभवण्यसाठी इथे क्लिक करा.
कॅमेरा, संकलन- सुभाष इनामदार
Saturday, July 19, 2008
ताल कीर्तनाच्या आवर्तनाने दुसरा दिवस गाजला
तबल्यावर उमटलेल्या बोटांच्या आर्वतनातून शुक्रवारी गुरूपौर्णिमेचा दिवस आपल्या गुरूला अर्पण करून रसिकांना मनमुराद आनंद देताना नव्या पिढीतले उद्याचे यशस्वी वादक पुढे आले. निमित्त होते पं.सुरेश तळवलकरांच्या शिष्यवर्गाने टिळक स्मारक मंदिरात सादर केलेल्या आवर्तनाचे.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पंडीत सुरेश तळवलकरांनी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंकडून घेतलेल्या शिक्षणाचे महत्व सांगत होते. आजची पिढी आपल्यापेक्षा तरबेज होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. "गुरूने मोकळ्या मनाने विद्या देण्याचा काळ आला आहे. आपल्या पावलांचे ठसे पुसत शिष्याना मार्गदर्शन केले ,तर शिष्य स्वतःची पावले उमटवित कर्तृत्व सिध्द करू शकतील', असे मत मांडले.
कांहीही स्वतः डायबेटिस अणि कॅन्सवर संशोधन करणाऱ्या सुप्रित देशपांडेंची करीअर वेगळी असली तरी गेली वीस वर्षे पंडीतजींकडे तबला वादनाचे शिक्षण घेतलेल्या या शिष्याने तबल्यातल्या बोलांनी उपस्थितांना भारावून टाकले. मुकूल डोंगरेची ड्रम्सवरची कमाल वेळोवेळी टाळ्यांच्या प्रतिसादातच वादनातले कौशल्य सिध्द करत होती.
तळवलकरांच्या षष्ठयब्दपूर्तीच्या कार्यक्रमात आयोजक म्हणून मोठे योगदान असलेले रामदास पळसुले ललित कला केंद्रात तबला गुरू म्हणून शिकवतात. . त्यांचे तबला वादन ऐकण्याचा योग शुक्रवारी आला. त्यांनी मेहनतीने केलेली बैठक इथे सिध्द झाली.
पं.उल्हास कशाळकरांच्या मैफलीने "आवर्तन' या कार्यक्रमाची सांगता झाली. आजच्या कार्यक्रमाचे विविधरंगी शव्दांनी निवेंदन केले होते शांभवी वझे यांनी.
मात्र दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य ठरले ते ताल कीर्तनाच्या आविष्काराचे. सावनी तळवलकर, ईशान कौशल, मयंक बेडेकर, ओंकार दळवी, प्रणव मोघे, नीलेश रणदिवे, अजिंक्य जोशी, रोहित मुजुमदार, चारूदत्त फडके या तरूण वादकांनी दिलेला एक रसरशीत आणि आगळा-वेगळा आनंद. तबल्यावर आठ जण आणि एक पखवाजावर .एका तालावरून दुसऱ्या लयीत जाताना प्रत्येक तालांची आर्वतने सोडून तयार होत आसलेला आकृतीबंध. तो अनुभवताना वादनात तयार असलेली हा तरूण मुले उस्ताही आणि तडफदार.
ताल यात्रेतील हा बोलांचा धागा आणि एका ठेक्यावरून दुसऱ्यात जाताना त्यांनी दिलेला हा सामूहिक आनंद घेत रसिकही तेवढ्याच एकाग्रतेने तो अनुभवत होते.

ताल वाद्याने टिळक स्मारक झंकारले
ज्येष्ठ तबला वादक पं.सुरेश तळवलकर यांच्या शिष्य परिवाराने त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती निमित्ताने गुरूपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचा ताल उत्सव टिळक स्मारक मंदिरात साजरा झाला.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पहिला दिवस गाजवला तो निनो म्युरेस्केच यांच्या कालबाझ या अफ्रिकन वाद्य वादकाच्या आगळ्या वादनाने आणि सत्यजित तळवलकरांच्या सोलो तबला वादनाने.
पं,सुरेश तळवलकरांच्या उपस्थितीत रामदास पळसुले आणि साऱ्याच शिष्यवर्गाने योजलेल्या काय्रक्रमासाठी टिळक स्मारक मंदिर अपुरे पडेल एवढा दर्दी रसिक वृंद पुण्यात एकत्र झाला होता.
गणेशाची मूर्ती आणि त्याच्या समोर ठेवलेल्या तबला आणि डग्ग्याची जागा प्रकाशमान होत होती. पवित्र वाटावे अशा मंदिराचा आणि दिपमाळांचा झगमगाट रंगमंचाला खुलवत होता. कोह्लापूरच्या अमेय कुलकर्णी, अक्षय शुक्ल, शंतनू कुलकर्णी अमि आशय कुलकर्णी यांनी तबला वादनाने
कार्यक्रमाचे नमन झाले. निनो, तालिस, हेल्मेट शॉनलाईटनर अणि वुल्फी या परदेशीय विद्यार्थ्यांनी कालबाझ, बेस गिटार, वेस्टर्न ड्रम्सच्या वादनाने तळवलकरांचा शिष्यवर्ग भारताबाहेरली कुठे विखुरला आहे याची आठवण ताजी झाली.त्यांच्या वादनाला साथ केली ती बासरीवर संदिप कुलकर्णी आणि तबल्यावर अजिंक्य जोशी.
सत्यजित तळवलकारांची बोटे हळूहळू तबल्यावर करामत करू लागली तशी टाळ्यांच्या निनादात दाद वाढत चालत कार्यक्रम त्यांच्याच वादनाने संपला, वाद्यांचा ठेका मात्र रसिकांच्या स्मरणात राहिला.

Monday, July 14, 2008
गायकी, लालित्याचा अनोखा संगम
बुद्धिप्रधान गायकी आणि लालित्याचा अनोखा संगम असणारी
सकाळच्या रागांची मैफल
जयपूर अत्रोली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ. अश्विनी भिडे देशपांडे
यांनी रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगवली.
भरत कामत (तबला) आणि सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) यांनी त्यांना साथ केली.
धनश्री घैसास आणि सायली ओक यांनी स्वरसाथ केली.
(भाग एक)
(भाग दोन)

Subscribe to:
Posts (Atom)