Saturday, July 19, 2008

ताल कीर्तनाच्या आवर्तनाने दुसरा दिवस गाजला

तबल्यावर उमटलेल्या बोटांच्या आर्वतनातून शुक्रवारी गुरूपौर्णिमेचा दिवस आपल्या गुरूला अर्पण करून रसिकांना मनमुराद आनंद देताना नव्या पिढीतले उद्याचे यशस्वी वादक पुढे आले. निमित्त होते पं.सुरेश तळवलकरांच्या शिष्यवर्गाने टिळक स्मारक मंदिरात सादर केलेल्या आवर्तनाचे.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

पंडीत सुरेश तळवलकरांनी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंकडून घेतलेल्या शिक्षणाचे महत्व सांगत होते. आजची पिढी आपल्यापेक्षा तरबेज होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. "गुरूने मोकळ्या मनाने विद्या देण्याचा काळ आला आहे. आपल्या पावलांचे ठसे पुसत शिष्याना मार्गदर्शन केले ,तर शिष्य स्वतःची पावले उमटवित कर्तृत्व सिध्द करू शकतील', असे मत मांडले.
कांहीही स्वतः डायबेटिस अणि कॅन्सवर संशोधन करणाऱ्या सुप्रित देशपांडेंची करीअर वेगळी असली तरी गेली वीस वर्षे पंडीतजींकडे तबला वादनाचे शिक्षण घेतलेल्या या शिष्याने तबल्यातल्या बोलांनी उपस्थितांना भारावून टाकले. मुकूल डोंगरेची ड्रम्सवरची कमाल वेळोवेळी टाळ्यांच्या प्रतिसादातच वादनातले कौशल्य सिध्द करत होती.

तळवलकरांच्या षष्ठयब्दपूर्तीच्या कार्यक्रमात आयोजक म्हणून मोठे योगदान असलेले रामदास पळसुले ललित कला केंद्रात तबला गुरू म्हणून शिकवतात. . त्यांचे तबला वादन ऐकण्याचा योग शुक्रवारी आला. त्यांनी मेहनतीने केलेली बैठक इथे सिध्द झाली.


पं.उल्हास कशाळकरांच्या मैफलीने "आवर्तन' या कार्यक्रमाची सांगता झाली. आजच्या कार्यक्रमाचे विविधरंगी शव्दांनी निवेंदन केले होते शांभवी वझे यांनी.
मात्र दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य ठरले ते ताल कीर्तनाच्या आविष्काराचे. सावनी तळवलकर, ईशान कौशल, मयंक बेडेकर, ओंकार दळवी, प्रणव मोघे, नीलेश रणदिवे, अजिंक्‍य जोशी, रोहित मुजुमदार, चारूदत्त फडके या तरूण वादकांनी दिलेला एक रसरशीत आणि आगळा-वेगळा आनंद. तबल्यावर आठ जण आणि एक पखवाजावर .एका तालावरून दुसऱ्या लयीत जाताना प्रत्येक तालांची आर्वतने सोडून तयार होत आसलेला आकृतीबंध. तो अनुभवताना वादनात तयार असलेली हा तरूण मुले उस्ताही आणि तडफदार.
ताल यात्रेतील हा बोलांचा धागा आणि एका ठेक्‍यावरून दुसऱ्यात जाताना त्यांनी दिलेला हा सामूहिक आनंद घेत रसिकही तेवढ्याच एकाग्रतेने तो अनुभवत होते.

No comments: