Saturday, July 19, 2008

ताल वाद्याने टिळक स्मारक झंकारले

ज्येष्ठ तबला वादक पं.सुरेश तळवलकर यांच्या शिष्य परिवाराने त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती निमित्ताने गुरूपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसाचा ताल उत्सव टिळक स्मारक मंदिरात साजरा झाला.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

पहिला दिवस गाजवला तो निनो म्युरेस्केच यांच्या कालबाझ या अफ्रिकन वाद्य वादकाच्या आगळ्या वादनाने आणि सत्यजित तळवलकरांच्या सोलो तबला वादनाने.
पं,सुरेश तळवलकरांच्या उपस्थितीत रामदास पळसुले आणि साऱ्याच शिष्यवर्गाने योजलेल्या काय्रक्रमासाठी टिळक स्मारक मंदिर अपुरे पडेल एवढा दर्दी रसिक वृंद पुण्यात एकत्र झाला होता.
गणेशाची मूर्ती आणि त्याच्या समोर ठेवलेल्या तबला आणि डग्ग्याची जागा प्रकाशमान होत होती. पवित्र वाटावे अशा मंदिराचा आणि दिपमाळांचा झगमगाट रंगमंचाला खुलवत होता. कोह्लापूरच्या अमेय कुलकर्णी, अक्षय शुक्‍ल, शंतनू कुलकर्णी अमि आशय कुलकर्णी यांनी तबला वादनाने
कार्यक्रमाचे नमन झाले. निनो, तालिस, हेल्मेट शॉनलाईटनर अणि वुल्फी या परदेशीय विद्यार्थ्यांनी कालबाझ, बेस गिटार, वेस्टर्न ड्रम्सच्या वादनाने तळवलकरांचा शिष्यवर्ग भारताबाहेरली कुठे विखुरला आहे याची आठवण ताजी झाली.त्यांच्या वादनाला साथ केली ती बासरीवर संदिप कुलकर्णी आणि तबल्यावर अजिंक्‍य जोशी.
सत्यजित तळवलकारांची बोटे हळूहळू तबल्यावर करामत करू लागली तशी टाळ्यांच्या निनादात दाद वाढत चालत कार्यक्रम त्यांच्याच वादनाने संपला, वाद्यांचा ठेका मात्र रसिकांच्या स्मरणात राहिला.

No comments: