शिष्यांनी अर्पण केलेली सत्काररूपी कृतज्ञतेची ओंजळ विनम्रतेने स्वीकारत पं.सुरेश तळवलकर सत्काराला उत्तर देताना म्हणाले, ""गुरूंनी मला "तबला' दिला, शिकवला आणि संस्कार दिले. तबला केवळ वाजवायला नाही, तर पाहायला, ऐकायला शिकवले. ''
शनिवारी सुरेश तळवलकरांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्ताने पं.शिवकुमार शर्मा यांच्या हस्ते त्यांचा निमंत्रित रसिकांच्या आणि चाहत्यांच्या उपस्थितीत पुण्यात जाहिर सत्कार केला गेला. त्यांच्या तबला वादनाचे वैशिष्ठ्य सांगणारी स्मरणिका पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते प्रकाशित केली.
या समारंभासाठी तळवलकरांना जगातल्या ड्रम्स वादकांच्या वतीने शिवमणीने चेन्नईहून उपस्थित राहून खास बुके देऊन शुभेच्या दिल्या.
दृष्ट लागावा असा सत्कार सोहळा या निमित्ताने पुणेकरांनी अनुभवला.
त्याच कार्यक्रमाची झलक अनुभवण्यसाठी इथे क्लिक करा.
कॅमेरा, संकलन- सुभाष इनामदार
No comments:
Post a Comment