
आमच्या स्फूर्तिदेवतेला हा शब्दांचा खेळ करून स्वतःच्या मनातल्या भावनांना असे व्यक्त व्हावेसे वाटले...
त्यांची इच्छा..
त्यांच्याच शब्दात वाचा...जरूर वाटल्यास कांही तुम्हाही म्हणा...स्वागत आहे.
सुभाष इनामदार..
---------------------------------------------
अंतरीच्या कळीचे
फूल कधी होईल का.?
बोथट झाल्या भावना
धार त्यांना लागेल का?
काय करावे, किती करावे
गणित कुणी सांगेल का?
असंतोषाचे चेहरे किती
काही केल्या लपेल का?
राग-लोभ यांचे चक्र
काय केल्या थांबेल का?
दुष्टचक्रात फिरता फिरता
गुंतूनी बाजूला होशील का?
हातचे राखून ठेवीत
द्यायचे ते दिलेस का?
आता ऊरला अहंपणा की
तोही केव्हा जाईल का?
मंत्र गड्या य़शाचा
सांग तुला सापडेल का?
सौ. सरोज इनामदार, पुणे
No comments:
Post a Comment