ओसरे चेह-यातून तेजाचा झरा
ह्दयी वसला, रुतून बसला
घडीभराचा नाजुक तो मुजरा
नजर घारदार, केसांची ती कुंतले
मनात माझ्या, दाटून बसावी
उभा क्षणभरी, ह्दयात जपली इष्काची छबी
बेभान पुरा होतो, नजर गुंतली इथे
भानावर येतो तरीही स्वप्नात दंगुनी गेलो
इष्काच्या अंगणी रंगूनी कसा ग गेलो
कसे गुंतून गेला, मजवरी होतसे फिदा
करु किती आठवा ,उभी राही तुझी सदा ही अदा
सय बेभान, लय नादान
रुते गुंता ..मनी रंगतो
वाटतो जीवही असा की ग दंगतो
-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments:
Post a Comment