Friday, March 1, 2013

नवं निर्माण


पाना पानातून आता फळे आपली छबी दाखविताहेत..
गळती सुरु होण्याआधीच परिपक्वतेची साद घालताहेत...
चैत्राच्या आगमनाने चैतन्याचा अंकूर फुटणार आहे
जुन्या फांद्यानाही नवी पालवी तिच्यातूनच डोकावणार आहे..

नव्याचा वेध घेताना जुनी परंपरा तेही सांभाळणार
आहेत
नव्याच्या बढेजावात जुनी वस्त्रे गाठोड्यात बदिस्त असणार आहेत
काळ, वेळ आणि निसर्ग सारे तसेच राहणार आहे
जुनी ऊर्मी आता नवतेज खुडून सर्वत्र पसरवणार आहे..

चटके उन्हाचे सोसत ती सारी चिडिचुप्प भक्कम उभी आहेत
डांबरांच्या संगतीने मुळेही माती-पाणीचा शोध घेत आहेत
पिवळ्यापानांचे रंग होऊन तीही गळून पडणार आहेत
कोवळी हिरवी पाने स्वच्छंदीपणे त्यातूनच निर्माण होणार आहेत


-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com

No comments: